टेलिव्हिजनवर सतत नवनवीन विषय आणि आशय असलेले शो दाखवण्यात येतात. ज्यामधून वाहिन्यांना टीआरपी तर मिळतोच शिवाय प्रेक्षकांना प्रेरणाही मिळत असते. असाच एक आगळा वेगळा आणि महिलांसाठी प्रेरणादायी शो सध्या झी युवा या वाहिनीवर सुरू झाला आहे. या शोमध्ये एक अनोखी संकल्पना मांडण्यात आली आहे. शिवाय या शोच्या दोन्ही परिक्षकही नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. महाराष्ट्रातला हा पहिलाच वजनदार डान्स रिऍलिटी शो असणार आहे. ज्यात सर्व ‘डान्सिंग क्वीन’ या वेगवेगळ्या साईजच्या असतील.ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन या कार्यक्रमाने सर्व स्टिरिओटाइप प्रकारच्या शोचा रेकॉर्ड तोडून एक दमदार सुरूवात केली आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सोबत पहिल्यांदाच परीक्षकाच्या खुर्चीत मुंबईची मुलगी आर जे मलिष्का दिसणार आहे. शिवाय नेहमीप्रमाणे अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून यात एकूण सोळा वजनदार स्पर्धक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत.
सोळाही स्पर्धक आहे टॅलेंटेड
झी मराठीवर सुरू झालेल्या या नवीन आणि उत्सुकता वाढवणाऱ्या शोचं नाव आहे ‘डान्सिंग क्वीन अनलॉक’. या शोची कॉन्सेंट खूपच छान आहे. सध्याच्या काळात प्रत्येकजण सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी वजन कमी कसं करायचं याचाच विचार करत असतो.पण या शोमधून वजन आणि शरीराची तमा न बाळगता सोळा वजनदार स्पर्धक त्यांची नृत्यकला सर्वांसमोर सादर करत आहेत, या स्पर्धक जितक्या वजनदार आहेत त्याहून जास्त त्यांचे परफॉर्मन्सेस दमदार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमातील स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत अधिक जाणून घ्यायची उत्सुकता नक्कीच लागली आहे. या सर्व वजनदार स्पर्धकांचा डान्सिंग क्वीनच्या मंचापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाही आहे. त्यामुळे त्यांच्या डान्सची सुरुवात कशी झाली आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.
शोची धमालमस्ती
या शोची दमदार सुरूवात झाली असून झी युवावर हा शो प्रेक्षकांना दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडे आठ वाजता पाहता येणार आहे. शिवाय त्यासोबतच स्पर्धकांची रिहर्सलची जय्यत तयारी, कोरिओग्राफरसोबत होणारी जुगलबंदी, परीक्षकांसोबत स्पर्धकांची ऑन सेट चालणारी धमाल मस्ती या आणि अशा असंख्य कॅमेरा मागे घडणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी प्रेक्षकांना खास या कार्यक्रमात पाहायला मिळतील. हा विशेष कार्यक्रमप्रेक्षकांसाठी सादर करणार असून डान्सिंग क्वीन अनलॉकच्या पहिल्याच भागात परीक्षक सोनाली कुलकर्णी, मलिष्का आणि शोचा संचालक अद्वैत दादरकर त्यांच्या आवडत्या स्पर्धकांबद्दल आपापली मतं मांडली आहेत. सोनालीच्या मते या सोळा डान्सिंग क्वीनपैकी दिप्ती नायर ही स्पर्धक तिला शोस्टॉपर वाटते म्हणते ती सुंदर नाचतेच पण ती जेव्हा बोलायला सुरुवात करते ते ही तिच्या मल्याळम मराठीमध्ये तेव्हा अवघा शोच स्टॉप होऊन जातो. तर अपुर्वा उंडाळकर ही स्पर्धक अद्वैतसाठी खास आहे कारण तो तिला कॉलेजपासून ओळखतो रुपारेल कॉलेजमध्ये अगदी चवळीची शेंग असल्यापासून ते साईज लार्ज होईपर्यंतचा तिचा प्रवास अद्वैतने पाहिलाय. ती कॉलेजमध्ये असतानाही खुप सुंदर नाचायची आणि आताही या लार्ज साईजमध्ये ती जबरदस्त नाच करत असल्याचा दावा अद्वैतने केलाय. शोची दुसऱी परीक्षक मलिष्काही या डान्सिंग क्वीनचं कौतुक करताना सांगते की डान्स हा फक्त बारीक आणि लवचिक कंबर असलेल्या मुलींसाठीचं नसून सर्व साईजच्या मुलींसाठी आहे आणि त्यामुळेच मी हा शो जज करताना खुप एन्जॉय करते. डान्सिंग क्वीन हा शो नुकताच जोरदार प्रतिसादामध्ये सुरु झालाय आणि आता यासोबतच दर आठवड्याला डान्सिंग क्वीन अनलॉकचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणारे ज्यामध्ये हा शो बनताना घडणाऱ्या गमती जमती किंवा बिहाईन्ड सीन किस्से दाखवण्यात येतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
कपिल शर्माने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, असा घालावा मास्क
Good News: अजून एका अभिनेत्रीने गरोदर असल्याचे केले जाहीर, फोटो व्हायरल
Big Boss 14: या कारणासाठी सलमान खान करणार स्वतःच्या बिग बॉसमधील मानधनात कपात