नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने आशय–विषयाची नवता घेऊन नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ 17 जूनला दु. 4 वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एण्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर (Amol Bavdekar), अश्विनी जोशी (Ashwini Joshi), श्रद्धा पोखरणकर (Shraddha Pokhrankar), प्रसाद दाणी (Prasad Dani) हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.
कौटुंबिक आशय फँटसी दिसणार
या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देणार हे नक्की. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची 49 वर्षे पूर्ण झाली असून 50 व्या वर्षातले हे पहिलेच नाटकआहे. नुकताच सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बऱ्याच वर्षानी ते विनोदी नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना ही त्यांचीच आहे. पुरुषोत्तम बेर्डे संगीत देत आहेत. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे 25 वे नाटकं आहे. एकंदरीतच विषयापासून ते सादरीकरणापर्यंत चांगली भट्टी असल्यामुळे ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
बरेच दिवसांनी प्रियदर्शन दिसणार
प्रियदर्शन जाधव हा असा कलाकार आहे जो दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हीची भट्टी अप्रतिम जमवून आणतो आणि प्रेक्षकांना प्रियदर्शनचा अभिनयही तितकाच भावतो, जितके त्याचे दिग्दर्शन. नाटकातून अभिनेत्याचा खरा कस लागतो असं नेहमीच म्हटलं जातं आणि प्रत्येक अभिनेत्याचं नाटक हे पहिलं प्रेम असतं असंही म्हटलं जातं. त्यामुळे बरेच दिवसाने बरेच दिवसांनी प्रियदर्शन पुन्हा एकदा रंगमंचावर दिसणार आहे याचा नक्कीच प्रेक्षकांना आणि त्याचा चाहत्यांनाही आनंद झाला आहे. याशिवाय एक वेगळा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळण्यात आल्यामुळे या नाटकाकडून प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळे मिळणार आहे असा विश्वास या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना आणि दिग्दर्शकालादेखील आहे. तर प्रियदर्शन जाधव, कुमार सोहोनी आणि अभिराम भडकमकर ही त्रयी नक्की काय कमाल दाखवणार हे लवकरच आता रंगमंचावर दिसून येणार आहे आणि प्रेक्षकांनीही या नाटकाला भरभरून प्रेम द्यावे असंच कलाकारांनाही वाटत आहे. दरम्यान प्रेक्षकांना प्रियदर्शनने पुन्हा एकदा मालिकांमधूनही काम करावे असंही वाटत आहे आणि लवकर प्रियदर्शनने यावर विचार करावा असंही त्याच्या चाहत्यांचं मत आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक