खमकी, सासूचे दुसरे लग्न लावून देण्यास समर्थ असलेली ‘अग्गंबाई सासूबाई’ मधील शुभ्रा आता या नव्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या पर्वामध्ये बुजलेली आणि घाबरलेली शुभ्रा होऊन गेली आहे. या मालिकेतील नव्या शुभ्राला पाहून काही काळासाठी सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण मालिकेच्या या नव्या ट्रॅकमध्ये शुभ्रा पुन्हा एकदा तशीच कशी होईल हे दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत बदलण्याचे नाटक केलेला सोहम आता पुरताच चांगला अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता शुभ्रासमोर त्याचा पर्दाफार्श झाला आहे. पण एक नवा चेहरा या निमित्ताने या मालिकेत सगळ्यांना पाहायला मिळायला आहे. अनुराग गोखले नावाचे हे पात्र नव्याने या मालिकेत दिसले असून आता शुभ्राच्या आयुष्यात नेमकं काय वळण येणार ते फार रोमांचकारी असणार आहे.
सलमानचा ‘राधे’ होणार थिएटरमध्ये रिलीज, बुकिंगला झाली सुरुवात
अनुराग गोखले बदलणार का शुभ्राला
चिन्मय उद्गगीरकरच्या रुपात हे पात्र या मालिकेत आले आहे. ज्या दिवशी शुभ्रा- सोहमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. नेमकं त्याच दिवशी सुझेन सोहमसोबत असलेल्या तिच्या नात्याचा खुलासा करण्यासाठी एक बनाव रचते. जिथे सोहम सुझेनसमोर प्रेमाची कबुली देतो. सुझेनला अशा प्रकारे पाहून शुभ्रालाही काय करावे हे सुचत नाही. तिच्या पायाखालची जमिन सरकून जाते. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. अशातच ती एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेते. पण तितक्यात त्या ठिकाणी अनुराग गोखले येतो. शुभ्राला आत्महत्या करताना पाहून तोही त्या कठड्यावर तिच्यासमोर उभा राहतो आणि तिला ते करण्यापासून थांबवतो. अनुराग गोखले या मालिकेत पुन्हा एकदा दिसेल का? असा प्रश्न नक्कीच त्याच्य फॅन्सनाही पडला आहे. त्या निमित्ताने या मालिकेत थोडा बदल हा नक्कीच जाणवला आहे.
शुभ्राच्या आयुष्यात येईल अनुराग
अनुराग हे पात्र नेमकं कशापद्धतीने शुभ्राच्या आयुष्यात येईल याचा नेमका अंदाज अजिबात येत नाही. आताशी या मालिकेत त्याची एंट्री झाली आहे. पण अनेकांना त्याने सोहमचा चांगला समाचार घेण्यासाठी मालिकेत यावे असे वाटते. पण आता हे पात्र नेमकं कशा पद्धतीने या मालिकेत येणार आहे त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. कारण अद्याप हा ट्रॅक नेमका कसा असेल याची माहिती मालिकेनेही प्रोमोतून दिलेली नाही.
मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार
आसावरीच्या हाती सूत्र
पहिल्या पर्वामध्ये आसावरीचा आसावरी अभिजीत राजे असा प्रवास दाखवण्यात आला. आपल्या सासूला दुसऱ्या लग्नाला तयार करुन तिला सक्षम करणारी शुभ्रा दाखवण्यात आली. आसावरी आता बिझनेस वुमन झाली आहे. तिची स्वत:ची कंपनी असून ती खूप वेगळी मॉडर्न अशी सासू दाखवण्यात आली आहे. सगळी काम ती करताना दाखवण्यात आली आहे. पहिल्या भागात सोहमला आपली चूक कळते आणि त्यानंतर तो पूर्णपणे बदलतो असे दाखवण्यात आले. पण या भागात तो बदलण्याचे केवळ नाटक करतो असे दिसत आहे. पैशांसाठी कसेही व्यवहार करणे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून दूर पळणारा असा सोहम या पर्वात पाहायला मिळत आहे. शुभ्राच्या या अशा वागण्यामागेही काही कारणं दाखवण्यात आली आहेत. शुभ्राच्या आई-बाबांचा अचानक अपघातात मृत्यू झाल्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे. त्याचाच परिणाम ती तिच्या मुलाबाबत अधिक नाजूक आणि काळजीवाहू दिसून आली आहे.
आता या नव्या पात्राचे शुभ्राच्या आयुष्यात काय स्थान असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
आमिर खान लडाखमध्ये करत आहे शूटिंग,असा रंगणार ‘लाल सिंह चड्ढा’चा वॉर सीन