मराठीतील ‘देवमाणूस’ या मालिकेत सध्या बरंच काही घडतंय. या मालिकेतील मुख्य कलाकार डॉ. अजिकुमार देव याच्या गुन्ह्याचा पर्दाफार्श झाला आहे. आता शिक्षा मिळण्याच्या एक पाऊल पुढे जात अजित कुमारच्या गुन्ह्याचा पाढा हा कोर्टासमोर वाचला जात आहे. पण आता आणखी एका नव्या चेहऱ्यामुळे अजितकुमार उर्फ देवीसिंग हा अजूनही सुधरलेला नाही. त्याला आपल्या कोणत्याही गुन्ह्याचा पश्चाताप नाही हे दिसून येत आहे. हा नवा चेहरा कोण? देवीसिंग त्याला सुद्धा आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी होईल का? ही व्यक्ती त्याला शिक्षा मिळवून देईल का? अशा अनेक प्रश्नांभोवती सध्या मालिका फिरताना दिसत आहे. जाणून घेऊया सध्या ‘देवमाणूस’ या मालिकेत काय सुरु आहे.
राधे’ चित्रपटाच्या कमाईपेक्षाही चर्चेत आहे हा पॅरडी व्हिडिओ
देऊ शकेल का शिक्षा ?
सध्या या मालिकेत कोर्टात देवीसिंगची ट्रायल सुरु आहे असे दाखवण्यात आले आहे. त्याच्या विरोधातील सगळे पुरावे सादर करण्यात येत आहे. आता ही केस लढवण्यासाठी एक सरकारी वकील बोलावण्यात आला आहे. हा सरकारी वकील आर्या देशमुख दाखवण्यात आली आहे. हे पात्र अभिेनेत्री सोनाली पाटील साकारात आहे. तिने या मालिकेत एंट्री केली असून अगदी पहिल्यात दिवशी देवीसिंगची विकेट उडवली आहे. पण देवीसिंग महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढवून त्यांना फसवण्यात फारच हुशार असल्याचे या आधीही झालेल्या मर्डरवरुन सिद्ध झालेले आहे. आता तो आर्याला देखील अशाच पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो तिची स्तुती करताना देखील दिसला आहे. पण आर्या त्याच्या जाळ्यात सहसा फसेल असे दिसत नाही. पण देवीसिंगने ते जाळ तिच्याभोवती फेकायला नक्कीच सुरुवात केली आहे.
डिंपल अडकणार का?
देवीसिंगच्या गुन्ह्याबाबत माहीत असलेली त्याची एकमेव साथीदार डिंपल या मालिकेतील महत्वाची कडी आहे. पण ती यामध्ये अजिबात अडकलेली नाही. तिला डॉक्टरांनी केलेल्या सगळ्या गुन्ह्याची अगदी पहिल्यापासून माहिती आहे. त्यामुळे ती प्रत्येकवेळी केवळ पैशांसाठी डॉक्टरांच्या मागे आहे. पण डॉक्टरला अटक झाल्यापासून म्हणजेच देवी सिंगला अटक झाल्यापासून तिचे धाबे दणाणले आहेत.पळून जाण्याचे तिचे स्वप्न देखील धुळीला मिळाले आहे. आता डिंपल महत्वाचा साक्षीदार बनून पुढे येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण या मालिकेत तिच्या एवढे ढोस पुरावे कोणाकडेच नाही.
प्रेक्षकांसाठी अभिनयाची ‘अजूनही बरसात आहे’ मुक्ता आणि उमेश एकत्र
मालिका लवकरच घेणार निरोप
देवमाणूस ही मालिका लॉकडाऊननंतर सुरु झाली होती. या आधी या वाहिनीने अनेक कमी भागांच्या मालिकाही प्रसारीत केल्या होत्या. पण ही मालिका सत्य घटनेवर आधारीत असून या मालिकेविषयी खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. या मालिकेच्या सुरुवातीला किरण गायकवाड याला या रुपात पाहून ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल या विषयी कोणतीही शंका नव्हती. आा या मालिकेने सगळे महत्वाचे टप्पे पार केले असून देवीसिंगला शिक्षा देत ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
अनेक मालिका खोळंबल्या
महाराष्ट्रात काही मालिकांचे शूटिंग बंद झाल्यानंतर मुंबईपासून आणि महाराष्ट्रापासून दूर जात काही मालिकांनी आपले चित्रीकरण योग्य पद्धतीने सुरु ठेवले. पण काही मालिका या अडकून पडल्या. रात्रीस खेळ चाले ही मालिका रंजक वळणावर आलेली असताना सिंधुदूर्गातील लॉकडाऊनमुळे ती बंद झाली आता अनेकांनी ती मालिका पुन्हा कधी सुरु होईल याची प्रतिक्षा आहे.
पहिल्यांदाच एकत्र काम करणार सारा अली खान आणि अमृता सिंह, फोटो झाले व्हायरल