मराठी मालिका या आता जास्त लांबल्या जात नाहीत. योग्य वेळी मालिका संपवल्या जात आहेत. ‘देवमाणूस’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्या जागी आता नवी मालिका येणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो आला आहे. ही मालिका गूढ आणि रहस्यमयी असणार यात काही शंकाच नाही. १६ ऑगस्टला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सस्पेन्स आणि गूढ अशा गटातील असल्यामुळे ही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काहीही शंका नाही. जाणून घेऊया या मालिकेविषयी अधिक
प्रेक्षकांना घाबरवणार मालिका
झी मराठीवर येणाऱ्या या नव्या मालिकेचे नाव ‘ती परत आलीये’ असे असून या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम दिसत आहे. ते रात्रीचा पहारा देण्यासाठी सगळीकडे काठी ठोकत आजुबाजूच्या परिसरात गस्त ठेवत आहेत. आजुबाजूला वाढलेल्या हत्यांमुळे ते असे करत आहे ते यामुळे कळून येत आहे. पण ही मालिका सरळ सोपी नाही तर या मालिकेमध्ये हाँटेंट असं काहीतरी नक्कीच असणार आहे. विजय कदम खूप वर्षांनी मालिकेत दिसणार आहेत. त्यांची कमबॅक असलेली ही मालिका असणार आहे. दरम्यान, या मालिकेत अन्य कोण कलाकार असणार आहेत याचा कोणताही उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुढचा प्रोमो येईपर्यंत तरी हा सुद्धा सस्पेन्स राहणार आहे.
रितेश देशमुख पुन्हा मराठीत , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस “अदृश्य”साठी एकत्र
देवमाणूस मालिका घेणार निरोप
देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हे आतापर्यंत सगळ्यांनाच कळले आहे. पण आता अखेर ही मालिका आता पुढच्या महिन्यात संपणार आहे आणि या मालिकेच्या जागी ‘ती परत आलीये’ ही मालिका येणार आहे. अजून ही मालिका येण्यासाठी बराच वेळ आहे. त्यामुळे त्या दरम्यान या मालिकेचे वेगळे प्रोमोज नक्कीच येतील. त्यामुळे मालिका नक्की काय आहे ते नक्की कळेल.पण अजून तरी मालिकेविषयी फक्त एकच व्हिडिओची माहिती आहे.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘विठ्ठला विठ्ठला’ प्रेमगीत प्रदर्शित
प्रेक्षकांना प्रतिक्षा
झी मराठीवर या आधी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरु होती. या मालिकेने आतापर्यंत अनेक प्रेक्षकांची मते जिंकली आहे. पण ही मालिका कोरोनामुळे थांबली. या मालिकेने चांगला वेग घेतला असताना अचानक शुटींग बंद झाल्यामुळे ही मालिका बंद झाली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्यानंतर त्या वेळेमध्ये अनेक मालिका आल्या आणि गेल्या. देवमाणूस ही मालिका सुरु झाल्यानंतर ही सत्य घटनेवर आधारीत अशी मालिका असल्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आत ही मालिका क्लायमॅक्सवर आलेली आहे. या मालिकेतील मुख्य गुन्हेगार देवी सिंग याला आता शिक्षा होणार आहे त्यामुळे या मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढला आहे.
पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री
मराठी मालिका आणि प्रेक्षक
मराठी मालिका या कायमच प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. कोणताही मुद्दा मालिकेत खूप चांगल्या पद्धतीने मांडल्यामुळे या मालिका लगेचच टीआरपीच्या घरात येतात. सध्या झी मराठीवर सुरु असलेली मालिका ‘माझा होशील ना’ ही चांगल्या रंजक वळणावर आलेली आहे. तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका देखील रोमांचक वळणावर आहे. आता त्यामध्ये या मालिकेची भर पडणार आहे. मुळात याची वेळ ही एखाद्या हॉरर आणि सस्पेन्सपटासाठी योग्य असल्यामुळे ही मालिका प्रतिक्षेत आहे.
आता काही दिवस वाट पाहा कारण लवकरच ही मालिका प्रदर्शित होणार आहे.