मराठीतील क्वचितच अशा मालिका असतात ज्या पहिल्याच दिवशी मनात घर करतात. कारण तोच तोच ट्रॅक, त्याच लव्हस्टोरी आणि क्लायमॅक्स याचा आता अनेकांना कंटाळा आला आहे. थोडी नवी कथा, वेगळी मांडणी आणि थोडे वेगळे कलाकार दिसले की, ती मालिका पाहण्याची इच्छा होते. अशीच एक नवी मराठी मालिका अनेकांच्या मनात घर करुन बसली आहे ती म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेचे ट्रेलर आल्यानंतर अनेकांना ही मालिका वेगळी असणार हे कळले होते. पण आता या मालिकेचे दोन भाग प्रसारीत झाल्यानंतर अनेकांनी ही मालिका बेस्ट असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने एकदम ग्रँड ओपनिंग केले आहे असेच म्हणायला हवे.
कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा
नवी जोडी नवी स्टोरी
एका सर्वसाधारण घरातली मुलगी आणि श्रीमंत घरातील मुलगा अशी तिच तिच वाटणारी स्टोरी वाटली तरी त्याला सादर करण्याचा अंदाज हा वेगळा आहे. ओंकार (शाल्व किंजवडेकर) त्याची आई (शुभांगी गोखले) श्रीमंत असूनही अगदी दिलखुलासपणे जगणारे आहेत. पण त्याच घरात त्याची बहीण( आदिती सारंगधर) आणि वडील यांना मात्र त्या श्रीमंतीची हवा आहे. या घरात फक्त काही कारणासाठी येणारी अवनी ( अन्विता फलटणकर) हिच्या प्रेमात या मालिकेचा हिरो अर्थात ओंकार पडणार आहे. आता तुम्हाला वाटेल यात नवल ते काय? पण जाड असणं हे आजही अनेकांना नकोसे वाटते किंवा इतरांच्या चिडवण्याचा विषय ठरते. पण असे असून देखील ओंकार या गोड अवनीच्या प्रेमात पडून तिला घरी कसा घेऊन येईल आणि त्या घरची सून बनवेल हे दाखवणारी ही कथा आहे. पण पहिल्याच दिवशी या मालिकेने अनेकांची वाहवा मिळवली. त्यामुळे मालिकेकडून बरीच अपेक्षा आहे.
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण
शाल्व आणि अवनी ठरतायत हिट
प्रत्यक्ष आयुष्यात अशा अनेक जोड्या आहेत. ज्या प्रेमाने बनवल्या आहेत. ज्यामध्ये जाडीचा कुठेही समावेश होत नाही. शाल्व आणि अवनीची जोडी पाहून अनेकांना त्यांच्या निवडीवर नक्कीच अभिमान वाटेल अशी ही मालिका आहे. त्यामुळे अगदी ट्रेलरपासूनच या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. चॉकलेट बॉय शाल्व आणि क्युट अशी अवनी सध्या सोशल मीडियावर जास्त सर्च केले जात आहे. एखाद्या मालिकेची अशी दणक्यात सुरुवात होणे चांगलेच असते. शिवाय मल्टी स्टारर अशी ही मालिका असल्यामुळे शुभांगी गोखले, आदिती सारंगधर, दिप्ती केतकर, निखिल राऊत असे काही तगडे कलाकार यामध्ये असल्यामुळे ही मालिका नक्कीच पाहावीशी वाटतेय.
‘रंग माझा वेगळा’ म्हणत अभिज्ञा रंगतेय मेहुलच्या रंगात, मेंदीचे फोटो व्हायरल
फक्त भरकटू नये
या मालिकेबद्दल लोकांनी त्यांची मतं मांडताना मालिकेने ट्रॅक अजिबात सोडू नये असे वाटते. अनेकदा मराठी मालिका या चांगले मुद्दे घेऊन सुरु होतात. पण त्यांचा ट्रॅक इतका भरकटत जातो की,त्या संपवायच्या कुठे असा कदाचित मालिका निर्मात्यांनाही प्रश्न पडतो. टीआरपीच्या खेळात अनेक मालिका झपकन वर जातात. पण मालिकेमधील बदल अनेकांना मुळीच आवडत नाही. इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन बनवण्यात आलेल्या या मालिकेने अशा प्रकार आपला ट्रॅक सोडू नये असेच सगळ्या प्रेक्षकांना वाटत आहे.
दरम्यान तुम्ही अजून मालिका पाहिली नसेल तर आजच पाहा आणि मालिकेचे तुमचे मत आम्हालाही कळवा.