बाळ जन्माला आले की त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या करणे अत्यंत गरजेचे असते. ज्याला स्क्रीनिंग टेस्ट देखील (Newborn Screening Tests) म्हणतात. या चाचणीद्वारे बाळाला कुठलाही गंभीर आजार आहे का? याची माहिती मिळते. जेणेकरून आजार असल्यास तातडीनं बाळावर उपचार करता येऊ शकतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की बाळ जन्माला आल्यावर अशा कोणत्या टेस्ट करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आम्ही डॉ. प्रेरणा अग्रवाल, मॅनेजर टेक्निकल ऑपरेशन अपोलो डायग्नोस्टिक्स, पुणे यांच्याकडून अधिक जाणून घेतले आहे. तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील तर या लेखातून नक्कीच त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही नक्कीच महत्त्वाची माहिती ठरू शकते.
बाळाच्या जन्मानंतर वैद्यकीय तपासणी अत्यंत अनिवार्य
बाळाच्या जन्मानंतर वैद्यकीय तपासणी करणं अत्यंत अनिवार्य आहे. नवजात मुलांची तपासणी ही काही घातक वैद्यकीय परिस्थिती शोधण्यासाठी एक चांगली पद्धत आहे. ज्यांचे जन्मादरम्यान निदान केले जाऊ शकत नाही. या चिंताजनक परिस्थिती तुमच्या बाळाच्या वाढ आणि विकासात अडथळा आणू शकतात. स्क्रिनिंग बाळामध्ये समस्या असल्यास ओळखण्यात मदत करेल. जन्मजात हृदय दोष, अनुवांशिक परिस्थिती, हार्मोनल आणि चयापचय स्थिती आणि फुफ्फुसाचा विकार यासारख्या काही गंभीर या तपासणीत आढळून येतात. या परिस्थितींवर उपचार करून, मानसिक मंदता, थायरॉईड समस्या, ऑटिझम आणि आकस्मिक मृत्यू यासारखे नुकसान वैद्यकीय लक्ष देऊन त्वरित हाताळले जाऊ शकते. नवजात स्क्रिनिंग परवडणारी आणि जीव वाचवणारी आहे. जर काही गंभीर परिस्थिती आधी ओळखल्या गेल्या नाहीत आणि त्यावर उपचार केले गेले नाहीत, तर नंतरच्या टप्प्यात उपचाराची किंमत जास्त असू शकते. जन्मजात समस्या जाणून घेण्यासाठी स्क्रीनिंग केले जाते. परंतु निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि योग्य प्रकारचे उपचार सुरू करण्यासाठी अतिरिक्त निदान चाचण्या अनिवार्य आहेत. असे कोणते आजार आहेत ते आपण जाणून घेऊया –
या आजारांमुळे वेळेवर उपचार करणं गरजेचं
• चयापचय विकार हे दुर्मिळ अनुवांशिक विकार आहेत जे शरीरातील गहाळ किंवा सदोष एंजाइममुळे बाळामध्ये दिसून येतात
• संप्रेरक समस्या: जेव्हा ग्रंथी जास्त प्रमाणात किंवा पुरेशी संप्रेरक तयार करत नाहीत तेव्हा उद्भवतात. तर, बाळाला जन्मजात हायपोथायरॉईडीझम किंवा जन्मजात एड्रेनल हायपरप्लासिया असू शकतो.
• सिकलसेल रोगासारख्या हिमोग्लोबिन समस्या सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येतात.
• इतर त्रासदायक समस्या: जसे की सिस्टिक फायब्रोसिस, गंभीर संयुक्त इम्युनोडेफिशियन्सी (SCID), आणि श्रवणशक्ती कमी होणे. अशा स्थितीत पालकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. आपल्या लहान मुलांमध्ये काही बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा
नवजात बालकांना काहीही दुखत असेल अथवा काहीही होत असेल तर ते सांगता येत नाही. रडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे आई अथवा वडील म्हणून आपल्यालाच त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे आहे. बाळाला एखादी गोष्ट वारंवार होत असेल अथवा त्रास होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष पुरवायला हवे. कोणती लक्षणं जाणवत आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाच्या डॉक्टरांना व्यवस्थित वर्णन करून सांगायला हवे. यामुळे डॉक्टरांनाही निदान करण्यास सोपे जाते. बाळांच्या या समस्यांची चाचणी वेळीच करून घेतल्यास, त्यांनाही भविष्यात त्रास होणार नाही हे तुम्ही मनाशी पक्के करा आणि त्यानुसार चाचण्या करून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक