Advertisement

मनोरंजन

या कारणामुळे निआ शर्मा होऊ लागलीय ट्रोल

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jan 11, 2022
निआ शर्मा

Advertisement

अभिनेत्री निआ शर्मा तिच्या हॉट फिगर आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. ती चर्चेत नसेल तर ती कुठे असा शोध घ्यावा लागतो. पण आता निआ शर्मा ट्रोल होण्यामागे कारणही एकदम वेगळे आणि विचित्र आहे. तिने नुकताच एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल होतानाच तिने जिथे डान्स केला आहे.त्यामुळे तिला अत्यंत घाणेरड्या उपमा देत लोकांनी ट्रोल केले आहे. खूप जणांनी तिला भारतीय पॉर्नस्टार असे देखील म्हटले आहे. जाणून घेऊया काय म्हणाले नेटकरी निया शर्माला.

BB15: अभिजित बिचुकलेचा माज, सलमानच्या बोलण्यानेही पडला नाही फरक

फुंकले म्हणत केला डान्स

निया शर्मा सुंदर नाचते हे खूप जणांना माहीत आहे. तिचे आलेले अनेक म्युझिक व्हिडिओ आतापर्यंत चांगलेच व्हायरल झालेले आहेत. पण आता तिचा एक नुकताच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये निया शर्माने लोव्हर वेस्ट स्कर्ट घातला आहे.  तिने व्हाईट रंगाची चोळी घातली असून ती एका पान टपरीच्या बाहेर उभी दिसत आहे. टपरीच्या बाहेर उभी राहून ती नाचताना दिसत आहे. आता हा डान्स तिने खरंतर एका नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी केलेला आहे. पण असे असले तरी देखील लोकांना तिचा असा डान्स अजिबात पटलेला नाही. त्यामुळेच तिची तुलना ही थेट पॉर्नस्टारशी केली जात आहे. एका दुसऱ्या पेजवरुन शेअर झालेल्या या व्हिडिओच्या खाली निया शर्माला अत्यंत वाईट कमेंट करुन ट्रोल करण्यात आले आहे. 

निया शर्माचे गाणे ठरते नेहमी हिट

हिंदीमधील सगळ्यात बोल्ड अशी अभिनेत्री कोणी असेल तर ती निया शर्मा आहे. तिच्या पोस्ट पाहिल्यानंतर ती किती बिनधास्त आहे ते दिसून येते. उत्तम शरीर आणि सुंदर फिगर असल्यामुळे ती कायमच एकदम चांगल्या आणि हॉट आऊटफिटमध्ये दिसून येते. तिच्या इन्स्टा पेजवर एकापेक्षा एक असे हॉट फोटो आहेत. केवळ ट्रेंड म्हणून ती फोटो शेअर करत नाही. तर ती त्यामध्ये सुंदर आणि चांगली सुद्धा दिसते. त्यामुळेच तिचा एक चाहतावर्ग आहे. नियाचे फोटो खूप जणांना आवडतात. कारण ते अधिक ग्लॅमरस असतात.

सर्जरीनंतर या अभिनेत्रीला झाला होता खूप त्रास

आता नव्या गाण्याचे माजवेल धूम

 दो घुंट… या गाण्याच्या भन्नाट यशानंतर आता हे नवे गाणे आता खूप लोकपसंतीला उतरेल असे दिसून येत आहे. अद्याप हे नवे गाणे आलेले नाही. पण लवकरच ते येईल अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही नियाचे चाहते असाल तर तुम्ही हे गाणं नक्की पाहायला हवं. 

आता नियाचे ट्रोल होणे तुम्हाला रास्त वाटते का? हे आम्हाला नक्की कळवा.