प्रियंका लवकरच तिचा आगामी प्रोजेक्ट सिटाडेल (Citadel) मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक फोटो ती सेटवरून चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर तिचा कार ड्राईव्ह करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने निक बेस्ट पती असल्याचं चाहत्यांना कळवलं आहे. यामागचं कारण ती ड्राईव्ह करत असलेली आकर्षक आणि महागडी कार तिला निकने गिफ्ट केली आहे. हे गिफ्ट मिळाल्यामुळे प्रियंका निकवर खूपच खूष झाली आहे.
निकने प्रियंकाला गिफ्ट केली खास कार
प्रियंकाने शेअर केलेली कार खूपच आकर्षक आणि खास आहे. कारण या गाडीवर मिसेस जोनस असं लिहिलेलं आहे. प्रियंकाने गाडीसोबत पहिला फोटो शेअर करताना गाडीच्या रंगाला मॅचिंग आऊटफिट परिधान केले आहेत. तिने या फोटोसोबत शेअर केलं आहे, ” ही आहे राईड, निक जोनस माझी नेहमी मदत करण्यासाठी धन्यवाद, तू बेस्ट नवरा आहेस ” कारण निकने प्रियंकाला तिच्या सेटवर सुरक्षित आणि लवकर पोहचण्यासाठी ही खास गाडी भेट दिली आहे. कारण तिची सिटाडेलच्या शूटिंगसाठी सध्या खूप दगदग होत आहे. ही गाडी ऑल टेरेन व्हिकल आहे, जी तिला तिच्या नवऱ्याने खास भेट केली आहे. या एटीव्हीला निकने प्रियंकाच्या आवड आणि गरजेप्रमाणे कस्टमाईज केलेलं आहे. प्रियंकावर निकचं खूप प्रेम आहे. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं त्याला वाटतं. नुकतंच निक आणि प्रियंका सरोगसीच्या मदतीने आईबाबा झाले आहेत. त्यामुळे प्रियंकाला आता करिअरसोबत आईपण ही जबाबदारीदेखील सांभाळायची आहे. एक बेस्ट नवरा आणि पिता म्हणून निक प्रियंकाची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
काय आहे सिटाडेल
सिटाडेल ही एक अमेझॉन प्राईमची वेबसिरीज आहे. प्रियंका अनेक दिवसांपासून या सिरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिरिजमध्ये तिच्यासोबत गेम्स ऑफ थ्रोन्सचा अभिनेता रिचर्ड मॅडनपण असणार आहे. ही वेबसिरिज एक सायंन्स फिक्शन असणार आहे. याव्यतिरिक्त प्रियंका फरहान अख्तरच्या जी ले जरा या बॉलीवूड चित्रपटातूनही झळकणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक