प्रियांकाच्या लग्नाच्या विधींची तयारी २८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. प्रियांका आणि निकचं लग्न हा सध्या सर्वांचाच चर्चेचा विषय आहे. त्यामुळे प्रियांका आणि निक नक्की काय घालणार इथपासून ते दोघंजण कसे दिसणार इथपर्यंत सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. प्रियांका आणि निकची लग्नघटिका जवळ आली आहे. सर्वात पहिल्यांदा प्रियांकाच्या घरी पूजेपासून लग्नाच्या विधीला सुरुवात झाली असून नुकतेच तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या मुंबईतल्या घरी विधींना सुरुवात झाली. इतकंच नाही तर प्रियांक आणि निकव्यतिरिक्त प्रियाकांचा दीर आणि जाऊ अर्थात जो जोनास आणि सोफी टर्नरदेखील पारंपरिक वेषामध्ये बघायला मिळत आहेत. भारतीय वेषामध्ये सर्वच जण अप्रतिम दिसत आहेत.
काय परिधान केले आहे जोडप्याने?
प्रियांका आणि निकने भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान केली असून प्रियांकाने गुलाबी रंगाची फुलं असलेला आकाशी सूट घातला आहे. तर निकने गुलाबी रंगाचा शेरवानी घातला असून संपूर्णतः भारतीय वेषामध्ये असलेला निक खूपच सुंदर दिसत आहे. त्याशिवाय निकचा भाऊ जो यानेही निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली असून त्याची बायको सोफी टर्नरने लाल रंगाचा सूट घातला आहे. सर्वच कुटुंब पारंपरिक वेषामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. आजपासून विधींना सुरुवात झाली असून २९ तारखेला प्रियांकाचे सर्व वऱ्हाडी जोधपूरला उमेद भवन पॅलेसमध्ये रवाना होतील.
गुरुवार २९ ला होणार मेंदीचा कार्यक्रम
मुंबईतून गुरुवारी जोधपूरला रवाना झाल्यानंतर प्रियांका आणि निक जोधपूर विमानतळावरून हेलिकॉप्टरनेच उमेद भवन पॅलेसमध्ये जाणार आहेत. त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली असून गुरुवारी २९ नोव्हेंबरला मेंदीचा कार्यक्रम पार पडेल. यामध्ये प्रियांका आणि निक कोणते कपडे घालणार आणि कसे दिसतील याची त्यांच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे पण त्यासाठी किती वाट पाहावी लागणार याचा अंदाज कोणालाही लावता येणार नाही. रणवीर आणि दीपिकाप्रमाणेच सर्व विधी झाल्यानंतर प्रियांका आणि निकचे फोटो पाहायला मिळणार की, त्याआधी त्यांचे फोटो व्हायरल होणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान सध्या सर्व फोटोग्राफर्स आणि मीडियादेखील या दोघांचे फोटो मिळवण्यासाठी धडपडत आहे. असं असलं तरीही या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला १८ लाखांना विकल्याचं वृत्त आहे. मात्र आता त्यांच्या लग्नानंतरच हे स्पष्ट होईल. तरीही या दोघांचा प्रत्येक कार्यक्रमाला नक्की कोणता लुक असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली असून जमेल तिथून या दोघांचा फोटो काढण्यासाठी सध्या मीडियादेखील सज्ज झाली आहे.
इमेज सोर्स – मानव मंगलानी इ्न्स्टाग्राम, Manav Manglani instagram