ADVERTISEMENT
home / लग्नसराई
#Nickyanka च्या लग्नाचा ‘स्वप्नवत’ फर्स्ट लुक

#Nickyanka च्या लग्नाचा ‘स्वप्नवत’ फर्स्ट लुक

ज्या फोटोजची आपण वाट पाहात होतो, ते अखेर आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा पाहा निकयांकाच्या हिंदू लग्नाचा फोटो. ज्यामध्ये देसी गर्ल प्रियांकाने सब्यसाचीने डिझाईन केलेला लाल लेहंगा घातला आहे तर परदेसी बाबू निकही सेहरा बांधून अगदी भारतीय दुल्हा शोभतोय. 

#Nickyanka च्या लग्नाचा हा खास पहिलावहिला फोटो खास POPxo Marathi च्या वाचकांसाठी.

फोटो सौजन्य : People Magzine

दुसरा व्हायरल झालेला लुक म्हणजे ख्रिश्चन वेडींग लुक, ज्याची बरीच चर्चा होती. कारण हे आऊटफिट डिझाईन केलंय प्रसिद्ध डिझायनर राल्फ लॉरेनने. पाहा त्यांच्या ख्रिश्चन लग्नातील हा स्वप्नवत लुक.

फोटो सौजन्य : People Magzine 

#Nickyanka चं लग्न ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस येथे थाटामाटात पार पडलं. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ने आणि हॉलीवूड पॉप स्टार निक जोन्स (Nick Jonas) यांनी 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न केलं तर 1 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने ह्या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नासाठी त्यांचे नातेवाईक तर आलेच होते. पण त्यासोबतच देशाविदेशातून ही बरेच पाहुणे आले होते.

ADVERTISEMENT

खरंतर निक जोन्स हा अमेरिकेतील ख्रिश्चन कुटुंबातून आहे आणि प्रियांका पंजाबी हिंदू कुटुंबातून आहे. त्यामुळेच या दोघांच्या कुटुंबियांनी दोन्ही पद्धतीने लग्न करण्याला पसंती दिली.

बॉलीवूड जगतात #DeepVeer च्या लग्नानंतर आता प्रियांका आणि निकच्या लग्नाबाबत क्रेझ दिसतंय. प्रत्येकालाच तिच्या संगीत आणि लग्नाचे फोटो बघण्याची उत्सुकता होती. त्यामुळेच तिच्या संगीत आणि मेंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडीयावर येताच अवघ्या काही मिनिटात व्हायरल झाले.

प्रियांका आणि निकचं बहारदार संगीत

#Nickyanka च्या संगीताचे फोटो आणि व्हिडीओज अगदी नजरेचं पारणं फेडणारे होते. ही संगीत सेरेमनी अगदी एखाद्या सूरज बडजात्याच्या चित्रपटासारखी होती. दोन्ही कुटुंबीयांनी अगदी त्यांच्या परफॉर्मन्सनी बहार आणल्याचं प्रियांकाने तिच्या इन्स्टा अकांउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओत दिसलं. अगदी देसी गर्ल प्रियांकाच्या विदेसी बाबू निकने ही जबरदस्त डान्स केला आणि देसी गर्ल प्रियांकाच्या ठुमक्यांनी तर अजूनच मजा आली. संगीत सेरेमनीबाबतची एक भावनिक पोस्टसुद्धा तिने शेअर केली. पाहा हा व्हिडीओ –

ADVERTISEMENT

मेंदी आणि क्रिकेट

#Nickyanka च्या लग्नातील अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे क्रिकेटचा सामना. हो..मेंदी सेरेमनीच्या वेळी पुरूषांनी काय करावं, हा प्रश्न या लग्नात मस्तपैकी सोडवला होता. एकीकडे मेंदी सेरेमनी तर दुसरीकडे सुरू होता क्रिकेटचा सामना. चोप्रांच्या जावयाने सिक्स मारल्याची पोस्ट ही देसी गर्लने शेअर केली. पाहा हा फोटो-

WhatsApp Image 2018-12-02 at 3.53.45 PM

WhatsApp Image 2018-12-02 at 3.52.26 PM
प्रियांका आणि निकने त्यांच्या मेंदी सेरेमनीसाठी अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेले आऊटफिटस घातले होते. प्रियांकाचा लेहंगा तर एकदम कलरफुल होता आणि निकने ही भारतीय परंपरेला साजेशी शेरवानी घातली होती.

ADVERTISEMENT

prinick-mehandi-fi

असंही कळतंय की, प्रियांका आणि निकचं ग्रॅंड रिसेप्शन 4 डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. त्यामुळे हे नवविवाहीत जोडपं कुटुंबासमवेत रविवारी दिल्लीला रवानाही झालं. पाहा त्यांचे जोधपूर एअरपोर्टवरचे फोटोज –

3-nickyanka-airport-looks-feelings

#Nickyanaka शी निगडीत अजून अपडेट्ससाठी वाचत राहा POPxo Marathi

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य : Instagram

AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!

02 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT