महिला गरोदर असताना तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. शरीरातील हार्मोनल बदलामुळे शरीराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हे बदल घडत असतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, आपल्या त्वचेचा रंग हा मेलेनिन नावाच्या पिगमेंटवर आधारित असतो. आपल्या शरीरामध्ये जितके मेलेनिनचे प्रमाण अधिक तितका आपल्या त्वचेचा रंग अधिक गडद होतो. गरोदरपणामध्ये महिलांच्या शरीरात अॅस्ट्रोजन, प्रोजस्ट्रोन आणि एमएचएस नावाच्या हार्मोन्सची वाढ होते. शरीरामध्ये एमएसएचची पातळी जितकी जास्त वाढते तितके मेलेनिन वाढते. त्यामुळेच गरोदरपणामध्ये निप्पल काळे होतात. पण यामुळे आपल्याला किंवा आपल्याला बाळाला काही धोका नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. तर त्यामुळे कोणताही धोका नाही. मात्र काही काळजी नक्कीच घ्यावी लागते. याची कारणे आणि नक्की यादरम्यान कसे वागायचे ते आपण जाणून घेऊया.
गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार
गर्भावस्थेदरम्यान निप्पल काळे का पडते?
Shutterstock
गरोदर हार्मोन्समुळे शरीरामध्ये मेलेनिन अधिक तयार होते. हे एक प्रकारच्या पिगनेंटच्या कारणामुळे होते आणि त्यामुळे त्वचेच्या रंगामध्ये फरक दिसू लागतो. जास्त मेलेनिनमुळे त्वचेचा रंग गडद होते. विशेषतः त्वचेचा तो हिस्सा ज्यावर आधीपासूनच पिगमेंट असतात. निप्पल (Nipple) च्या आसपासच्या जागेवर आधीपासूनच पिगमेंट असतात. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसात छातीच्या आकारासह निप्पलच्या आकारातही वाढ होते कारण निप्पल अशावेळी बाळासाठी लागणाऱ्या ब्रेस्टफिडिंगसाठी तयार होत असते. अशावेळी तुम्हाला निप्पलवर लहान लहान आकाराचे दाणेही दिसतील जे अशावेळी ग्लँड वाढवत असतात. हे ग्लॅंंड्स निप्पलना कोरडे होऊ देत नाही. त्यामुळेच ते अधिक काळे पडतात. पण त्याचा बाळावर अथवा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. गरोदरपणानंतर हळूहळू याचा रंग पुन्हा पहिल्यासारखा होतो. तसंच तुम्ही निप्पल काळे पडत आहेत म्हणून अस्वस्थ होण्याची अथवा त्यासंदर्भात घाबरून जायची अजिबातच गरज नाही. काहीही अन्य प्रश्न असतील तर अशावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून कोणत्याही प्रकारचा त्यावर उपचार करायला जाऊ नका.
‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
निप्पलचा हा गडद काळा रंग कधीपर्यंत टिकतो
गरोदरपणाचे शेवटचे दिवस जसजसे जवळ येतात तसतसा निप्पलचा काळा रंग अधिक गडद होत जातो. डिलिव्हरी झाल्यानंतर याचा रंग पुन्हा पहिल्यासारखा होण्यास सुरूवात होते. कारण डिलिव्हरी नंतर पुन्हा एकदा हार्मोन्स संतुलित होण्यास सुरूवात होते. त्यामुळे त्याची जास्त काळजी करण्याची गरज भासत नाही. तज्ज्ञ आणि डॉक्टर्सच्या मते गरोदरपणादरम्यान निप्पलना मसाज करणे योग्य नाही. त्यामुळे उत्तेजितपणा वाढून लेबर सुरू होऊ शकते. निप्पल उत्तेजित झाले तर ऑक्सिटोसिन स्राव वाढतो जो हार्मोन लेबर पेनसाठी मारक ठरतो. यामुळे तुम्हाला अबॉर्नशनचा धोकाही होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात निप्पल कितीही काळे झाले अथवा तुम्हाला काहीही वाटत असेल तरीही निप्पलला मसाज (nipple massage) करणे टाळाच. या दिवसांमध्ये निप्पल काळे होतातच ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तसंच यामुळे कोणताही धोका नाही. पण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या वर सांगितल्या आहेत, त्या नक्की सांभाळा आणि स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या.
सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय – How To Increase Breast Size In Marathi
गरोदरपणानंतर कशी काळजी, जाणून घ्या
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक