ADVERTISEMENT
home / Uncategorized
‘इश्क विश्क’च्या सीक्वलमधून निपुण धर्माधिकारीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

‘इश्क विश्क’च्या सीक्वलमधून निपुण धर्माधिकारीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. सध्या यासाठी जुन्या चित्रपटांचा सीक्वल तयार करण्याचा ट्रेंड आहे. एखादा गाजलेला चित्रपट नव्या कथेसह पुन्हा येतोय म्हटलं की त्याबद्दल  आपोआपच उत्सकुता निर्माण होते. त्यातही प्रेमाचा त्रिकोण असलेले चित्रपट चांगले चालतात त्यामुळे तोच मसाला पुन्हा वापरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आता ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा सीक्वल येत आहे. 2003 साली शाहिद कपूर, अमृता राव आणि शेहनाज ट्रेजरीवाला असा लव्ह ट्रॅंगल दाखवण्यात आला होता. आता याच चित्रपटाची पुढची कडी अकरा वर्षानंतर पुन्हा उलगडण्याचा बेत निर्मात्याने आखला आहे. इश्क विश्कच्या सीक्वलमधून नव्या जोडीला प्रेक्षकांसमोर आणलं जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

‘इश्क विश्क’च्या सीक्वलमधून नवी जोडी येणार प्रेक्षकांसमोर

इश्क विश्क रिबाउंड नावाने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटातून रोहीत सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान आणि नैला ग्रेवाल हे नवे कलाकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्याचसोबत मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीसाठीही हा चित्रपट खास असणार आहे. चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी आणि जया तौरानी यांच्या मते जेन जेड डेटिंग कल्चरवर एका वेगळ्या दृष्टीकोनातून हा चित्रपट तयार केला जाणार आहे.सहाजिकच प्रेम कहाणी असली तरी आता प्रेमाची स्टाईल मात्र आताच्या काळानुसार असेल. थोडक्यात इश्क विश्क रिबाउंडमध्ये अपग्रेटेड प्रेम दाखवण्यात येणार आहे. निर्माताच्या मते चित्रपटाची कास्टिंग बेस्ट झालेली असून शूटिंगमध्ये खूप धमाल येत आहे.

‘इश्क विश्क’ रिबाउंडचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी

इश्क विश्कचा सीक्वल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी असणार आहे. मराठीमधून आपलं दिग्दर्शन कौशल्य जगासमोर आणल्यावर आता निपूण पहिल्यांदा हिंदीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. निपुणने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर इश्क विश्कचं पोस्टर शेअर केलं आहे. यासोबत कॅप्शन दिली आहे की, पहिलं नेहमीच खास असतं ” या चित्रपटाच्या निमित्ताने आता निपुणचं बॉलीवूडमध्ये पदार्पण होत आहे. त्यामुळे निपुणसाठी हा चित्रपट नक्कीच खास आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT