ADVERTISEMENT
home / आरोग्य
non dairy calcium sources

मिल्क ऍलर्जी आहे, मग या पदार्थांतून मिळवा भरपूर कॅल्शियम

आपल्या शरीराच्या संपूर्ण वाढीसाठी व निरोगी विकासासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते.आपल्या आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ते तुमची हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील मज्जातंतू आणि स्नायूंच्या क्रियाकलापांसाठी देखील महत्त्वाचे आहे. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध आणि दही हे कॅल्शियमचे समृद्ध स्त्रोत आहेत. म्हणूनच वाढीच्या वयात मुलांना आणि गरोदरपणात स्त्रियांना भरपूर दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांच्या  सेवनाने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. शाकाहारी किंवा दुग्धजन्य पदार्थ न खाणाऱ्यांसाठी मात्र आवश्यक प्रमाणात कॅल्शियम मिळवणे आव्हानात्मक असू शकते. ज्यांना दूध आवडत नाही ते निदान दही, ताक, पनीर असे पदार्थ कुठल्या न कुठल्या स्वरूपात खाऊ शकतात. पण ज्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे म्हणजेच लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनी अशावेळी कॅल्शियम मिळवण्यासाठी काय खावे असा प्रश्न पडतो. ज्यांना लॅक्टोजची ऍलर्जी आहे अशांना कॅल्शियमसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त इतर कोणते पर्याय आहेत हे शोधावे लागते. तुम्हालाही हे पर्याय जाणून घ्यायचे असतील तर पुढे वाचा. 

भेंडी

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

बऱ्याच लोकांना चिकट होते म्हणून भेंडीची भाजी आवडत नाही. पण भेंडीत फायबर, मॅग्नेशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन बी 6 हे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. सुमारे 100 ग्रॅम भिंडीमध्ये 86 मिलीग्राम कॅल्शियम असते. तसेच ब्रोकोली आणि काही पालेभाज्यांमध्येही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते.म्हणूनच पालेभाज्या व ब्रोकोली, भेंडी या भाज्या नेहेमी खाव्यात. 

तीळ

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

तीळ हे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. तिळामध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, जस्त आणि सेलेनियम असते. तुम्ही तीळ कोरडे भाजून त्यांची चटणी करून खाऊ शकता किंवा ताहिनी पेस्टच्या स्वरूपात सेवन करू शकता. पण तिळात चरबीचे प्रमाणही जास्त असल्याने, ते रोज फक्त 2-3 चमचे घ्या.

चणे 

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

असे म्हटले जाते की सुमारे 100 ग्रॅम चण्यांमध्ये 150 मिलीग्राम कॅल्शियम असते. चणे हे शाकाहारी प्रथिनांच्या उत्तम स्रोतांपैकी एक आहे. ते लोह, तांबे, फोलेट आणि फॉस्फरसने समृद्ध आहे. तुम्ही चण्याचे विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकता आणि उत्तम स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता.

ADVERTISEMENT

सुके अंजीर

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

दीड कप सुक्या अंजीरमध्ये  320 मिलिग्रॅम कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात आरोग्यदायी अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोज अंजिराचे सेवन केले पाहिजे. 

राजगिरा आणि नाचणी 

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

राजगिरा आणि नाचणी सारख्या निरोगी आणि ग्लूटेन-मुक्त धान्यांमध्ये कॅल्शियमसह अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. म्हणून, त्यांना आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. अधे-मध्ये भूक लागली तर राजगिऱ्याच्या लाह्या , राजगिऱ्याची चिक्की किंवा लाडू तुम्ही खाऊ शकता. किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा करू शकता. तसेच नाचणी पोटात जावी म्हणून नाचणी सत्व किंवा नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे लाडू खाऊ शकता. 

सोयाबीन 

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. तसेच सोयाबीनमध्ये कॅल्शियमदेखील भरपूर प्रमाणात असते. 100 ग्रॅम सोयाबीन मधून आपल्याला  239 मिलीग्राम कॅल्शियम मिळते. सोयाबीनमध्ये लोह देखील असते. तुम्ही कॅल्शियमसाठी टोफू, सोया मिल्क व सोया नगेट्स खाऊ शकता. 

ओट्स

Non Dairy Calcium Sources
Non Dairy Calcium Sources

ओट्स हे अतिशय हेल्दी धान्य म्हणून ओळखले जाते. त्यात फायबर, बी जीवनसत्त्वे आणि इतर महत्त्वाची पोषणमूल्ये तर असतातच, पण त्यात कॅल्शियमचे प्रमाण देखील लक्षणीय असल्याचे आढळले आहे. तज्ज्ञांच्या मते मते, फक्त अर्धा कप ओट्समध्ये 200 मिलीग्राम कॅल्शियम असते. तुम्ही ओट्स  सोया मिल्क किंवा बदामाच्या दुधासह खाऊ शकता. हे दोन्ही गाईच्या दुधासाठी स्वादिष्ट पर्याय आहेत आणि कॅल्शियमचे समृद्ध स्रोत आहेत.

ADVERTISEMENT

कॅल्शियम मिळवण्यासाठी या पदार्थांचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

18 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT