ADVERTISEMENT
home / मनोरंजन
नोरा फतेही आहे धकधक गर्लची फॅन, करायचं आहे माधुरीच्या बायोपिकमध्ये काम

नोरा फतेही आहे धकधक गर्लची फॅन, करायचं आहे माधुरीच्या बायोपिकमध्ये काम

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचे जगभरात चाहते आहेत. मात्र बॉलीवूडमधील एक सेलिब्रेटीही माधुरीच्या प्रेमात आखंड बुडाली आहे. बॉलीवूडमध्ये हाय हाय गर्मी म्हणत ‘गर्मी गर्ल’ असं स्वतःचं स्थान निर्माण  करणारी नोरा फतेही माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. नोरा माधुरीला अभिनय आणि नृत्यामध्ये आदर्श मानते. एवढंच नाही तर नोराला माधुरीच्या बायोपिकमध्ये कामही करण्याची इच्छा आहे. माधुरीप्रमाणे दिसण्यासाठी नोराने खूप मेहनत घेतली आहे. सोशल मीडियावर नोराने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

शेरशाहसाठी कियारा अडवाणीने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

नोराला व्हायचं आहे माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दिवाने 3’ मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे. अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री असलेली माधुरी दीक्षित आजही अनेकांच्या ह्रदयाची स्पंदने वाढवताना दिसते. माधुरीचे नाव घेताच समोर येतात तिच्या दिलखेचक अदा, अफलातून अभिनय आणि अप्रतिम नृत्य… एवढंच नाही तर खऱ्या आयुष्यातही माधुरीने तिचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य इतकं संतुलित ठेवलं आहे की अनेकांना माधुरी दीक्षितप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा आहे. माधुरी खाजगी जीवनाबाबत जाणून घेण्यासाठीही चाहते नेहमीच उत्सुक असतात. माधुरीचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोव्हर्स आहेत. आता तर चक्क बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही म्हणतेय की, “मला माधुरी दीक्षित व्हायचं आहे” याचा खुलासा तिने चक्क सोशल मीडियावर केला आहे. या पोस्टमध्ये नोराने माधुरी दीक्षितप्रमाणे पेहराव केलेला आहे आणि ती ‘डान्स दिवाने 3’ या शोमध्ये माधुरी दीक्षित समोर  ‘डोला रे डोला’ हे गाणं रिक्रिएट करणार आहे.

माधुरी समोर नोरा झाली भावूक

नोराने सोशल मीडियावर माधुरीसोबत घालवलेला अनुभव शेअर केला आहे. नोरा म्हणाली की आता तिची आदर्श आणि डान्स दिवानेची परिक्षक माधुरी दीक्षित सोबत आहे. एकाच फ्रेममध्ये आपल्या आदर्श व्यक्तीसोबत असणं यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट काय असणार. तिने शेअर केलं की ती एक होपलेस ड्रिमर आहे कारण तिला माधुरी दीक्षितच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे नोराने तिच्या चाहत्यांना कंमेट करण्यासाठी सांगत ते नोराला माधुरीच्या भूमिकेत पाहू शकतात का यासाठी प्रतिक्रिया देण्याची इच्छा व्यक्त केली. नोराला बॉलीवूडमध्ये येऊन फार काळ गेलेला नाही. पण तरिही तिच्या अदा आणि डान्सचे अनेक चाहते आहेत. स्ट्रीट डान्सर 3डीमध्ये नोराने गर्मी डान्स करून सर्वांना घायाळच केले होते. आता ती ‘भुज दी प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये झळकणार आहे. मात्र त्याआधी डान्स दिवाने 3 मधून ती माधुरीच्या एका लोकप्रिय डान्समधून प्रेक्षकांसमोर आपल्या अदा  दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तारक मेहता मधील बबीता अफवांमुळे झालीय नाराज, शो सोडण्याबाबत केला खुलासा

ADVERTISEMENT
28 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT