ADVERTISEMENT
home / आरोग्य
मूळव्याधासारख्या समस्येवर आता होतील वेदनारहीत उपचार

मूळव्याधासारख्या समस्येवर आता होतील वेदनारहीत उपचार

लॉकडाऊन काळात बदललेली जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयीं, काढ्यांचे सेवन या सा-यांमुळे मुळव्याधीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पारपंरिक उपचारांनंतरही आजार डोके वर काढत असल्याने तसेच त्या उपचारांमुळे होणा-या वेदना टाळण्यासाठी नवीन तंत्रांचा अवलंब केले जात असून त्याला लेसर हेमोरायडायप्लास्टीच्या असे म्हटले जाते. याबाबत आम्ही डॉ. दिलीप भोसले, जनरल सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून अधिक माहिती घेतली. 

मूळव्याधाचे कारण

मूळव्याधाचे कारण

Freepik

लॉकडाऊन कालावधीत घरबसल्या लोक तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करणे. बैठी जीवनशैली आणि शारीरिक हलचालींचा अभाव यामुळे अनेकांना छातीत जळजळ, पोटा संबंधी तक्रारी, मळमळणे, उलट्या, अपचन, बद्धकोष्ठता आणि इतर जठरासंबंधी आजारांनी ग्रासले आहेत.

ADVERTISEMENT

या आजाराचे मुख्यत्वे तीन प्रकार असतात. पहिल म्हणजे मूळव्याध किंवा पाइल्स. यात कोंब येतात. त्यातून रक्तस्राव होतो. काही वेळेस वेदना नसू शकतात. दुसरा प्रकार म्हणजे गुदभ्रंश किंवा फिशर. या प्रकारात गुदमार्गाजवळ जखम होते. रक्तस्राव कमी असतो. मात्र, वेदना प्रचंड असतात. तर तिसऱ्या प्रकाराला फिश्चुला किंवा भगंदर म्हणतात. यात गुदमार्गाच्या बाजूला गाठ येते. त्यात पस तयार होतो. पस वाहून गेला की वेदना कमी होतात. त्यामुळे याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आधुनिक उपचारपद्धतीत सकाळी दाखल होऊन सायंकाळी घरी जाता येते. त्रासही कमी असतो. मात्र रुग्ण बरेचदा, शस्त्रक्रियाच सांगतील म्हणून किंवा संकोच वाटल्याने डॉक्टरांकडे जात नाही. या आजारासंबंधी उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या आहेत. त्याच पद्धती नक्की काय आहेत हे या लेखातून डॉक्टरांनी अधिक स्पष्टपणे सांगतिले आहे. 

 

लेसर हेमोरॉइडोप्लास्टी बद्दल जाणून घ्या

नक्की ही काय पद्धत आहे आणि मूळव्याध असणाऱ्या याच काय फायदा होऊ शकतो याची माहिती या लेखातून देण्यात आली आहे. 

लेसर हेमोरॉइडॉइडोप्लास्टी हा ग्रेड 2 आणि ग्रेड 3 पाईल्सच्या प्रारंभिक अवस्थेसाठी प्राधान्य देण्यात आलेली उपचार पध्दती आहे. ही प्रक्रिया लहान जंतुनाशक अंतर्गत केली जाते आणि यास कमी कालावधी लागतो. नैसर्गिक गुदद्वाराच्या उघडण्याद्वारे, लेसर ऊर्जेचा वापर विशिष्ट त्रिज्यात्मक उत्सर्जक फायबरद्वारे केला जातो. लेझर ऊर्जेचे नियंत्रित उत्सर्जन हॅमरोहाइडल वस्तुमानास आकुंचन करणाऱ्या बाष्पीभवनास कारणीभूत ठरते.

ADVERTISEMENT

इंट्रा-हेमोरॉइडल लेसर कोग्युलेशन किंवा लेझर हेमोरहाइडोप्लास्टी (एलएचपी) ही 30 मिनिटांची नवीन उपचार पध्दती आहे. ही उपचारपध्दती तांत्रिकदृष्ट्या सोपी, कमीतकमी हल्ल्याची, सुरक्षित आणि प्रभावी अशी प्रक्रिया आहे. पारंपारिक ओपन सर्जिकल हेमोरॉइडक्टॉमीच्या तुलनेत लेझर पध्दतीला अधिक प्राधान्य दिले जाते. प्रक्रियेनंतर लवकरच काम पुन्हा सुरू केले जाऊ शकते.

रक्तस्त्राव, वेदना, स्टेनोसिस आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे सुरक्षित तंत्र आहे. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाची भेट कमी संसर्गाची शक्यता कमी आहे, तर मूळव्याधांकरिता ओपन शस्त्रक्रिया रक्तस्त्राव ही गुंतागुंत, वेदना आणि संसर्गाशी संबंधित आहे ज्यामुळे रुग्णालयात दीर्घकाळासाठी दाखल करावे लागू शकते. तुम्ही याबाबत अधिक तुमच्या डॉक्टरांकडूनही जाणून घेऊ शकता. तुम्हाला जर हा त्रास जाणवत असेल तर वेळीच उपचार करणे योग्य. कोणताही संकोच न बाळगता आपल्या डॉक्टरांना संपर्क साधा. 

मुळव्याध वर घरगुती करा आणि लवकर आराम मिळवा (Piles Treatment At Home In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
09 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT