ADVERTISEMENT
home / आरोग्य
Nua-Cramp-Comfort-Review

Nua Cramp Comfort Review – मासिक पाळीच्या कळा होतील कमी

मासिक पाळी आणि त्या कालावधीत पोटातून येणाऱ्या कळा हे अतिशय सर्वसामान्य आहे. मासिक पाळीच्या दिवसात अनेक महिलांना खूपच त्रास होतो. काही जणींना वेदना होतात तर काही जणांना असह्य वेदना होतात. काही मुलींना मासिक पाळीच्या दिवसात पोटातून येणाऱ्या कळांमुळे पहिले दोन दिवस काम करणेही कठीण होते. तर काही जणींना पीसीओडीचा त्रास असल्यास, हे प्रमाण अधिक असते. बऱ्याच महिलांना या कालावधीदरम्यान ओटीपोटात वेदना येतात. मासिक पाळीच्या वेदनेवर घरगुती उपाय म्हणून गरम पाण्याची बाटली ठेवणे अथवा ओवा खाणे असे उपाय करण्यात येतात. पण Nua या कंपनीने मासिक पाळीदरम्यान होणारा हा त्रास कमी व्हावा यासाठ ‘POPxo मराठीकडे’ हा क्रँप कम्फर्ट पाठवले होते. याचा अनुभव आम्ही घेतला आणि त्याबाबत आमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही प्रतिक्रिया वाचून तुम्हीही याचा उपयोग करून नक्कीच पाहू शकता. माझा हा अनुभव तुम्हालादेखील फायदेशीर ठरेल.

कंपनीचा दावा 

गरम पाण्याची पिशवी आणि त्यानुसार तुमच्या मासिक पाळीच्या कालावधीत याने फरक पडले असा ब्रँडचा दावा आहे. साधारण 8 तासापर्यंत तुम्हाला क्रँपपासून मुक्तता मिळेल असा याचा वापर करता येतो. हा एक पॅच आहे. ओटीपोटाला तुम्ही हा लावल्यानंतर मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या वेदनांपासून तुम्हाला आराम मिळतो. हा पॅच स्नायूंना आराम देण्यास मदत करतो आणि जास्तीत जास्त वेळ सक्रिय राहतो. यामध्ये नैसर्गिक आणि प्रभावी घटक असण्याचे सांगण्यात आले आहे. 

अधिक वाचा – मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

पॅकेजिंग 

एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये तीन पॅचेस देण्यात आले आहेत. तुमच्या अंडरवेअरवर हे पॅच टिकटवायचे आहेत. याच्या दुसऱ्या बाजूला कॉटन असून तुम्हाला याचा कोणताही रॅश येण्याचा त्रास होऊ नये याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच यावर तुम्ही याचा कसा वापर करावा याबाबत मार्गदर्शन आणि इशारादेखील देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचा कोणताही गोंधळ उडू नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही कुठेही येता जाता हे सहजपणाने आपल्या बॅगमध्ये ठेऊ शकता. याचे वजनही जास्त नाही. तुम्हाला हे घेऊन सहज प्रवास करता येतो आणि तसंच हे निसर्गासाठी हानिकारक नसल्यामुळे तुम्हाला सहज नष्ट करता येते. 

ADVERTISEMENT

किंमत 

नुआ क्रँप कम्फर्टच्या या हिट पॅचेसची किंमतदेखील खिशाला परवडण्यायोग्य आहे. 3 पॅच असणारे हे पाकिट 299 रूपयांना बाजारात मिळते. तसंच हे ऑनलाईनदेखील उपलब्ध आहे. तुम्हाला बाजारात जाऊन घेण्याइतका वेळ नसल्यास, तुम्ही ऑनलाईन ऑर्डरदेखील करू शकता.

अधिक वाचा – मासिक पाळीदरम्यान पॅड्स निवडताना घ्या काळजी, होणार नाही त्रास

माझा अनुभव 

माझा बराचसा वेळ कामात आणि बाहेर जातो. त्यामुळे पोटातून कळा येत असतील तर दिवसभर चिडचिड होणं साहजिक आहे. पण बाहेर जाताना कायमस्वरुपी गरम पाण्याची बाटली अथवा पिशवी सोबत ठेवणे शक्य नाही. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी मला पोटात प्रचंड दुखतं आणि कळाही असह्य होतात. हे वापरण्यापूर्वी मनात अनेक शंका होत्या पण वापरून बघायचं मी ठरवलं कारण यामध्ये नुकसान काहीच होणार नव्हतं. याचा वापर करणं हे अत्यंत सोपं आहे आणि मुळात हे वापरल्यावर तुम्हाला त्वचेला कोणत्याही प्रकारे खाज येणे अथवा रॅश येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. तुम्हाला यावर स्टिकर पेपर काढून केवळ तुमच्या अंडरवेअरवर चिकटवायचे आहे. पॅच स्वतःच उष्णात शोषून घेते आणि तुम्हाला एका तासाच्या आत अगदी आरामदायी वाटते. चालताना अथवा कोणतेही काम करताना त्रास होत नाही. माझ्या मते दिवसासाठी एक पॅच योग्य आहे. हे साधारण 7 तास व्यवस्थित काम करते. 

फायदे 

  • प्रवासातही वापरता येणे शक्य
  • मीठ, अॅक्टिवेटेड कार्बन, लोह यासारख्या नैसर्गिक घटकांचा यामध्ये वापर करण्यात आला आहे 
  • इको-फ्रेंडली (निसर्गाला घातक नसणारे)
  • खिशाला परवडण्यायोग्य किंमत

तोटे 

माझ्या अनुभवानुसार तरी काहीच नाहीत

ADVERTISEMENT

अधिक वाचा – मासिक पाळी…समज कमी गैरसमज जास्त

काय करावे 

तुम्ही हे उत्पादन नक्कीच वापरून पाहू शकता. आपण अनेक घरगुती उपाय मासिक पाळीच्या दुखण्यावर करत असतोच. पण तुम्ही अधिक काहीतरी शोधत असाल तर कदाचित तुमचा शोध नक्कीच थांबू शकतो. मी नक्कीच माझ्या मैत्रिणींना याबाबत सांगेन आणि वापरण्यासाठी प्रवृत्त करेन. तुम्हीही वापरून पाहू शकता. 

रेटिंग 
* 5/5

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT