सध्या भडक लिपस्टिक शेड्स (Dark Lipstick Shades) पेक्षा न्यूड लिपस्टिकचा (Nude Lipstick Shades) ट्रेंड आला आहे. कोणत्याही कार्यक्रमात जाताना तिथली थीम काय आहे हे लक्षात घेऊन आणि तुम्ही कोणती फॅशन फॉलो करत आहात हे लक्षात घेऊन तुमच्या लिपस्टिकची शेड तुम्हाला निवडता यायला हवी. पण तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाताना विशेषतः ऑफिसला जाताना सटल लुक (Subtle Look) हवा असेल तर तुमच्यासाठी न्यूड लिपस्टिक शेड्स अधिक उत्तम ठरतात. पण काही जणींना नक्की कोणत्या न्यूड लिपस्टिक शेड्स वापरायच्या याचा अंदाज येत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही अशा काही न्यूड लिपस्टिक शेड्स सांगत आहोत, ज्या तुम्ही तुमच्यासह कॅरी करू शकता आणि वापरू शकता.
बऱ्याचदा न्यूड लिपस्टिक शेड्स जास्त वेळ टिकत नाहीत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला जास्त काळ टिकणारी न्यूड शेड हवी असेल तर तुम्ही MyGlamm वरून न्यूड बॉम्बशेड लिक्विड लिपस्टिक मागवू शकता. यामध्ये 10 पेक्षा अधिक शेड्स असून ही लिपस्टिक 8 तास तरी किमान तुमच्या ओठांवर टिकते. याशिवाय ही स्मजप्रूफ (Smudge Proof) असून यामध्ये विटामिन ई चा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमचे ओठ काळे पडत नाहीत. ही लिपस्टिक विगन असून क्रुएल्टी फ्रीदेखील आहे. तुमचे ओठ अधिक काळ हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही या लिपस्टिकचा वापर करू शकता आणि याशिवाय तुमचा लुकही यामुळे सटल दिसतो.
यामध्ये तीन न्यूड शेड्स असून हे मिनी लिप किट पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे सध्या अधिक ट्रेंडमध्येही आहे. तुम्ही जर ऑफिसला जाताना अथवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना भारतीय पेहराव करणार असाल अथवा तुम्हाला साधा पण तरीही आकर्षक असा लुक हवा असेल तर तुम्ही या न्यूड शेड्सचा वापर नक्कीच करू शकता. केवळ लिपस्टिक म्हणूनच नाही तर तुम्ही याचा गालासाठी हायलायटर म्हणूनही तात्पुरता उपयोग करू शकता. तुमचे ओठ कोरडे न पडू देण्याचे काम ही लिपस्टिक करते. तसंच या अत्यंत लहान असल्यामुळे तुम्ही प्रवासतही सहजपणाने ने – आण करू शकता.
रिनेच्या 5 in 1 FAB न्यूड शेड्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या लिपस्टिक क्रिमी असल्यामुळे ओठ कोरडे होत नाहीत आणि 5-6 तास आरामात या ओठांवर टिकून राहतात. तसंच भडक शेड्स नसल्यामुळे तुम्ही कोणत्याही रंगाच्या कपड्यांसह या कॅरी करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाच शेड्स एकत्र असल्यामुळे तुम्ही कुठेही हे पटकन कॅरी करू शकता आणि तुमचा पेहराव ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे तुम्ही यापैकी एका शेडचा वापर करू शकता. त्यामुळेच एका स्टिकमध्ये पाच शेड्स मिळत असल्यामुळे सध्या ही न्यूड शेड्सची लिपस्टिक खूपच ट्रेंडमध्ये आहे. ही लिपस्टिक क्रुएल्टी फ्री असल्यामुळेही वापरणे सोपे होते. वापरण्यास सोपी असून ओठांना मॉईस्चराईज ठेवण्यास याचा चांगलाच फायदा होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्समध्ये या न्यूड शेड्सचा नक्की समावेश करून घेऊ शकता.
यामध्ये साधारण 20 न्यूड शेड्स तुम्हाला उपलब्ध आहेत. याच्या शेड्स आणि कव्हरेज अत्यंत उत्तम असून ओठांवर या अधिक काळ टिकतात. तसंच याचे क्रिमी टेक्स्चर तुमचे ओठ कोरडे पडू देत नाही. जे जास्त महत्त्वाचे आहे. यामध्ये मोरिंगा तेल आणि विटामिन ई चा वापर करण्यात आल्यामुळे ओठांवर या लिपस्टिकचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ही लिपस्टिक पॅराबेन फ्री असून पर्समधून कॅरी करणेही सोपे आहे. ओठांना व्यवस्थित मॉईस्चराईज करून अधिक काळ हायड्रेट राखण्यास मदत करते.
ऑफिसमध्ये जाताना एकदा ही लिपस्टिक न्यूड शेड लावली की तुम्हाला पुन्हा पुन्हा टच अपची गरज भासत नाही. अधिक काळ ही लिपस्टिक टिकते. तसंच याचे मॅट फिनिश हे दुप्पट प्राईमरसह आहे. क्रिमी असल्यामुळे ही लिपस्टिक लावणेही सोपे आहे. 20 वेगवेगळ्या शेड्स आणि मॅट शेड्समध्ये ही लिपस्टिक उपलब्ध असून कोणत्याही स्किन टोनवर ही उत्तम दिसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या लिपस्टिकच्या न्यूड शेड्समध्ये या लिपस्टिकचा नक्कीच समावेश करून घेऊ शकता.
सटल लुक हवा असल्यास, तुम्ही यापैकी कोणत्याही लिपस्टिक शेड्सचा वापर करून पाहा. तुम्हाला नक्कीच अधिक आकर्षक लुक देण्यासाठी या शेड्स मदत करतील.