ADVERTISEMENT
home / मनोरंजन
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘विठ्ठला विठ्ठला’ प्रेमगीत प्रदर्शित

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘विठ्ठला विठ्ठला’ प्रेमगीत प्रदर्शित

आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच… या दिवशी पंढरपूरामध्ये भक्तगणांचा अक्षरशः पूर पाहायला मिळतो. सर्वत्र टाळमृदुंगाचा आणि विठ्ठल नामघोषाचा गजर ऐकू येत असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूरच्या वारी हे जणू एक स्वप्नच होऊन बसलं आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तगण घरातूनच विठ्ठलाची पूजाअर्चा करत आहेत. आणि लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढण्यासाठी साकडं मागत आहेत. सर्वांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही यंदादेखील घरी राहून जाणून घ्या आषाढी एकादशी माहिती मराठी (Ashadhi Ekadashi Information In Marathi) आणि  सर्वांना द्या या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha). असं असलं तरी यंदा एक वेगळाच प्रकार या आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पहायला मिळत आहे. कारण यंदाच्या आषाढी एकादशीला एक प्रेमवीर चक्क विठ्ठलाकडे एक वेगळंच साकडं मागताना दिसणार आहे. पाहूया हा प्रेमवीर कोण आणि तो नेमकं विठ्ठलाकडे काय मागतोय….

विठ्ठला विठ्ठला गाणं

चित्रपट अथवा चित्रपटांची गाणी नेहमीच शुभमुर्हूतावर प्रदर्शित केली जातात. असंच एक गाणं आषाढी एकादशीच्या शुभदिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल आहेत “विठ्ठला विठ्ठला प्रेमात पडलोय तार तुझ्या लेकरा”… पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे भक्ताचा मायबाप. आषाढी एकादशीला विठ्ठलाकडे भक्तगण अनेक मागणी मागत असतात. संसारातील अडीअडचणी दूर करण्यापासून, सुख, समाधान, समृद्धी, पैसा, यश, किर्ती, आरोग्य अशा गोष्टी भक्तगण नेहमीच विठू रायाकडे हक्काने मागतात. मात्र हा पठ्ठ्या प्रेमात इतका आखंड बूडाला आहे की त्याला प्रेमात तारण्याशिवाय विठ्ठलाकडे काहीच मागावसं वाटत नाही आहे. म्हणूनच की काय तो देवाकडे चक्क प्रेमाची नौका पार करण्याबाबत साकडं मागताना दिसत आहे. हे गाणं तेजस भालेराव द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित आहे. पी बी ए म्युसिक द्वारा हे गाणं सर्वांसाठी प्रसारित करण्यात आलं आहे. पुणे फिल्म सिटी द्वारा प्रदर्शित हे गाणं आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. विठ्ठला विठ्ठला गाणं राम बावनकुले यांनी गायलं असून अक्षय जोशीने हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.

विठ्ठला विठ्ठला पहिले प्रेमगीत

” विठ्ठला विठ्ठला ” गाणं आजच्या तरूणपिढीचे प्रतिनिधित्व करणारं गाणं आहे. तरूणपिढीमध्ये सध्या मजेशीर गाण्यांचा ट्रेंड दिसून येत आहे. त्यानुसार विठ्ठला विठ्ठला गाणं तयार करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे मनमोहक बोल आणि आश्चर्यकारक नृत्य दिग्दर्शनामुळे हे गाणं कोणालाही नक्कीच आवडू शकतं. अभिनेता रोहन मानेने स्वतः हे गाणे नृत्यदिग्दर्शन केले आहे, नृत्य करण्यासोबत नृत्य दिग्दर्शनामध्येही तो पारंगत आहे. या गाण्यामध्ये रोहन माने, तेजस्विनी वाघ या जोडीचा रोमान्स दाखवण्यातत आला आहे. या गाण्याबाबत अभिनेता रोहन मानेने शेअर केलं की, ” मी जेव्हा हे गाणं ऐकले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो कारण खरोखरच हे गाणं अतिशय लक्षवेधी आहे. मी स्वत: कोरिओग्राफर असल्याने हे गाणं मी सादर करण्यासोबत  कोरिओग्राफ करायचंही ठरवलं आणि तेजस्विनी वाघ ही एक चांगली अभिनेत्री आहे तिच्यासोबत हे गाणं शूट करताना खूपच मजा आली. शूटच्या वेळी तेजस सर आणि वैभव लोंढे इतके समर्थ आणि समजूतदारपणे आमच्यासोबत वागत होते की त्यामुळे आमच्यामध्ये पटकन एक उत्तम बॉण्ड तयार झाला. मला आशा आहे की प्रेक्षकांना हे गाणे आवडेल कारण हे माझे वैयक्तिक आवडते गाणे आहे आणि आम्ही या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.”  

19 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT