ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मालिकेत दिसणार का रितेश देशमुख

रुपेरी पडद्यावरील हा आणखी एक कलाकार झळकणार मालिकेत

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस तळपदे मालिका विश्वाकडे परतला. सध्या ही मालिका रसिकांच्या मनात घर करुन राहिली आहे. त्यामुळे सध्या या मालिकेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मालिकेत पुन्हा कमबॅक करण्याचा निर्णय घेणे रुपेरी पडद्याच्या कलाकारांसाठी खूप चॅलेंजिग असते. इतकेच नाही तर अनेकांच्या नजरा त्यांच्या कामाकडे असतात. कारण डेलीसोप म्हटले की, तो चेहरा रोज ठराविक तासांसाठी समोर येणार असतो. त्याचे डायलॉग, वागणे प्रत्येक दिवसाला वेगळे असते. त्यामुळे अशा कलाकारांना फार जबाबदारीपूर्व वागावे लागते. आता या यादीमध्ये आणखी एका कलाकाराची भर पडणार असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे. हा चेहरा आणखी कोणी नसून एक मोठा कलाकार आहे.

दोन्ही कुटुंब सांभाळणारी ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीला, शिवानी बावकर मुख्य भूमिकेत

हा कलाकार येणार का मालिकेत

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा मालिकेत येण्यासाठी होत आहे. तो चेहरा किंवा तो कलाकार म्हणजे  रितेश देशमुख. हिंदी- मराठी चित्रपटातून रितेशने काम केले आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर त्याला चांगलेच यश मिळाले आहेत. पण आता तो पुन्हा एका मालिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता तो मालिकेत येणार असल्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंदच आहे. पण याची रितसर घोषणा रितेशने अद्याप केलेली नाही.  त्यामुळे आता ही केवळ अफवा आहे की नुसती अशीच चर्चा होत आहे हे अजून काहीही कळलेले नाही. पण टीव्हीवर कोणतेही काम करण्याची रितेशची ही पहिली वेळ नाही. रितेशने या आधी टीव्हीवर सूत्रसंचालकाची भूमिकाही निभावली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा हा रिअॅलिटी शोमधून येणार आहे का? असा प्रश्न आहे.

अनेकांना पडली मालिकेची भुरळ

 बॉलिवुडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मालिकेतून आपली सुरुवात करुन नंतर चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे असा प्रवास हा अनेकांनी पाहिलेला आहे. पण उलट दिशेने प्रवास होताना फारच कमी वेळा पाहिला गेला आहे. फारच निवडक कलाकार हे थेट चित्रपटातून आलेले आहेत. त्यामुळे असा चेहरा पाहताना खूप जणांना उत्सुकता असते. आता रितेश देशमुखचे नाव आल्यामुळे आता तो कोणता मालिकेत येणार आहे? या बद्दल माहिती शोधण्याचा खूप जण प्रयत्न करत आहेत.

ADVERTISEMENT

श्रेयसच्या मालिकेने घेतली भरारी

सध्या या मालिका विश्वात ज्याच्या मालिकेचे नाव घेतले जात आहे ती मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेतील श्रेयसचे काम खूप जणांना आवडलेले आहे. या मालिकेचा आशय हा खूप जणांना भावलेला आहे. नेहा (प्रार्थना बेहरे) या मालिकेत आपल्या मुलीचा एकटा सांभाळ करत आहे. नवऱ्याने पैशाच्या व्यवहारात गडबड करुन तिला सोडून दिले आहे.  आता तिच्या आयुष्यात जय ( श्रेयस तळपदे) आला असून तो श्रीमंत आहे. या दोघांची रेशीमगाठ कशी जुळेल ते सांगणारी ही मालिका आहे. 

आता रितेश देशमुख नेमका मालिकेत दिसेल की नाही याची प्रतिक्षा सगळ्यांना आहे. 

शमशेराचा फर्स्ट लुक, रणबीर कपूरला ओळखणं आहे कठीण

29 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT