सध्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर घरी राहण्याची वेळ आली आहे. गेल्यावर्षी हा वेळ तुम्ही सत्कारणी लावला नसेल तर यंदा मिळत असलेला फावला वेळ अजिबात वाया घालवू नका. कारण यंदा कोव्हिडशी लढण्याची अनेक तयारी झाल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने शिकता येणे हे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे घरी बसून नुसते कंटाळू नका किंवा फोनवरच आपला अधिक वेळ घालवू नका. त्याऐवजी त्याच फोनचा उपयोग करुन ऑनलाईन नवनव्या गोष्टी शिकायला घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ऑनलाईन तुम्ही काय शिकायला हवं.तर चला पाहूया काही निवडक कोर्स आणि ते कुठे करायचे याची माहिती
ब्युटीपार्लर किंवा सलोन निवडताना महत्त्वाच्या आहेत या गोष्टी
टाय डाय :
जर तुम्ही फॅशनचे चाहते असाल आणि त्यामध्ये नवीन काहीतरी करावे असे वाटत असेल तर तुम्हाला टाय डायचा कोर्स करता येईल. अगदी एक ते दोन तासांचा लेसन घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीने टिशर्ट किंवा शर्ट रंगवता येतात आणि त्यांना एक वेगळा लुक देता येतो. इतकेच नाही तर असे कपडे तुम्ही विकू देखील शकता. या कोर्ससाठी लागणारे साहित्यही फार सहज मिळते. त्यामुळे तुम्हाला हा कोर्स तुम्ही अगदी सहज मिळू शकते.
https://www.skillshare.com/browse/tie-dye
फॉरेन लँग्वेज
जर तुम्हाला वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकायला आवडत असतील तर आताचा हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला आहे. राहून गेलेली ही आवड तुम्हाला घरी राहून पूर्ण करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या लेव्हल असतात ज्या तुम्हाला घरी राहून आणि सराव करुन करता येतात. ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सहज सोपी अशी ही भाषा शिकवली जाते. तुम्हाला हवं तितक्या वेळ तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला शिकण्यास अडथळा येत नाही.
https://clnk.in/pNbd
तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा (Hobbies That Make Money In Marathi)
बेकिंग क्लासेस
जर तुम्हाला केक शिकायची इच्छा असेल तर तुम्ही केक किंवा बेकिंगचा कोर्स करु शकता. हे कोर्स हल्ली सगळीकडे उपलब्ध आहेत. केकसाठी लागणारे सामानही आता सगळीकडडे सहज मिळते. त्यामुळे तुम्ही केक बेकिंगचा कोर्स आणि आयसिंगचा कोर्स करु शकता. हल्ली इन्स्टा किंवा फेसबुक पेजवर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला किमान 10 जण तरी अशा पद्धतीने कोर्स घेताना दिसतील. अत्यंत माफक अशा दरात तुम्ही एखादा कोर्स करु शकता. मायक्रोव्हेव शिवाय किंवा मायक्रोव्हेवमध्ये तुम्हाला अशाप्रकारे केक करता येतात. उद्योग म्हणूनही तुम्ही याकडे पाहू शकता. खूप जण याचा उपयोग बिझनेससाठी करतानाही हल्ली दिसत आहेत.
आता घरी राहून हे काही कोर्स करा आणि तुमचे लॉकडाऊन दिवस आनंदात घालवा.
फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असल्यास जाणून घ्या टीप्स (English Speaking Course In Marathi)