घरासाठी फर्निचर हे फार पूर्वी घरात बनवून घेतले जात असे. शिवाय जर एखादी छोटी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी आधी फर्निचर मार्केट फिरावं लागत असे. पण सध्याचा जमाना हा ऑनलाईन शॉपिंगचा आहे. त्यामुळे एवढा वेळ आणि कष्ट कोणालाच द्यायचे नसतात. शिवाय आजकाल अनेक होम डेकोर कंपन्यांनी ऑनलाईन फर्निचरचे विविध प्रकार बाजारात आणले आहेत. त्यामुळे तुम्ही एका क्लिकवर तुमचे घर सहज सजवू शकता. पण असं असलं तरी तर घरासाठी ऑनलाईन फर्निचर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या टिप्स जरूर फॉलो करा.
ऑनलाईन फर्निचर खरेदी करण्यापूर्वी काय लक्षात ठेवाल
फर्निचर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन हा पर्याय सहज सोपा आणि स्वस्त असला तरी त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या.
ब्रॅंडनुसार गुणवत्ता तपासा
बऱ्याचदा वेबसाईटवर दिसणारे रंग आणि गुणवत्ता मूळ प्रॉडक्टपेक्षा वेगळी असते. प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या प्रॉडक्टचा ब्रॅंड, गुणवत्ता, प्रॉडक्टखाली दिलेली माहिती जरूर वाचा. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. घरी फर्निचर आल्यावरही तुम्ही ते आधी तपासून घ्या आणि मगच वापरण्यास सुरवात करा. कारण जर त्यामध्ये काही बिघाड असेल तर तुम्हाला तुमची वस्तू पुन्हा एक्सेंज करून मिळू शकते.
तुमच्या गरजा ओळखा
ऑनलाईन फर्निचर खरेदी करण्यापूर्वी थोडा रिसर्च करा. तुमच्या घरातील जागा, तुमच्या गरजा, घराची रंगसंगती या सर्व गोष्टी साजेशा असतील असेच फर्निचर निवडा. कारण तुम्हाला ऑनलाईन फोटो आवडले म्हणून जर तुम्ही एखादं फर्निचर निवडलं आणि ते तुमच्या घरात शोभलं नाही तर तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.
घरी इंटेरिअर करण्याचा विचार करत असाल तर असा वाचवा पैसा
ऑनलाईन रिटेलरशी संवाद साधा
ऑनलाईन फर्निचर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्या वस्तूची माहिती, सर्व्हिस, मेंटेनन्स, वॉरंटी, शिपिंग कॉस्ट, डिलिव्हरी कशी होणार अशा गोष्टी माहीत असायला हव्या. एक जबाबदार ग्राहक या नात्याने तुम्हाला ही सर्व माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही याबाबत माहिती ऑनलाईन रिटेलरकडून घेऊ शकता.
कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो
रिव्ह्यू वाचा
प्रत्येक वेबसाईटवर वस्तूच्या खाली त्या वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया असतात. असे रिव्ह्यू वाचल्यामुळे तुम्हाला इतरांचे अनुभव कळतात. यातील एखादा अनुभव तुमच्या घरातील वातावरणाशी मिळता जुळता असू शकतो. ज्यामुळे तुम्हाला ते फर्निचर खरेदी करावं की नाही याचा अंदाज लावता येऊ शकतो. यासोबतच वेबसाईटवरील सर्व माहिती नीट वाचा आणि घरातील इतर सदस्यांचा सल्ला घ्या.