ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Coda 2021 movie

ऑस्कर विजेता चित्रपट ‘कोडा’ व ‘खामोशी द म्युझिकल’ची कथा जवळजवळ सारखीच

2022 ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेलफास्ट, ड्राईव्ह माय कार आणि पॉवर ऑफ द डॉग या उत्तमोत्तम चित्रपटांना मागे टाकत कोडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. CODA या नावाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे चिल्ड्रन ऑफ डेफ ऍडल्टस आणि दुसरा अर्थ संगीताच्या एका भागाचा शेवट असा होतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सियान हेडर यांनी केले आहे. या चित्रपटाने Apple TV+ च्या सहा ऑस्कर नामांकनांपैकी तीन मिळवले आणि प्रत्येकी एक पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता व सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा असे तीन पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. ट्रॉय कोत्सुरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. तो सहकलाकार मार्ली मॅटलिनसह ऑस्कर जिंकणारा एकमेव कर्णबधिर अभिनेता ठरला. 

कोडामध्ये मूकबधिर व्यक्तींच्या आयुष्याचे दर्शन घडते 

Coda 2021 Film
Coda 2021 Film

मूकबधिर व्यक्तींचे आयुष्य आणि कर्णबधिर कलाकारांना समोर आणणाऱ्या चित्रपटासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. सियान हेडर लिखित आणि दिग्दर्शित कोडा हा  2014 च्या फ्रेंच चित्रपट La Famille Bélier वर आधारित आहे. रुबी रॉसीचे संपूर्ण कुटुंब कर्णबधिर असते. तिच्या कुटुंबातील ती एकमेव अशी व्यक्ती असते जी ऐकू शकते. रुबी तिच्यावर पडलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संगीतावरील तिचे प्रेम यांमध्ये संतुलन साधण्यासाठी संघर्ष करते अशी या चित्रपटाची कथा आहे. ही कथा ऐकून तुम्हाला बऱ्याच वर्षांपूर्वी आलेला मनीषा कोईराला आणि सलमान खान यांचा खामोशी द म्युझिकल चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवला असेल. कारण खामोशीची कथाही काहीशी अशीच होती. हा ऑस्कर विजेता चित्रपट आपल्या हिंदी सिनेमापासून प्रेरित असल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

1996 मध्ये आला होता ‘खामोशी: द म्युझिकल’

Khamoshi The Musical
Khamoshi The Musical

अनेक उत्तमोत्तम व वेगळ्या विषयावरचे चित्रपट देऊन भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारे संजय लीला भन्साळी यांनी ‘खामोशी: द म्युझिकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटात सलमान खान, मनीषा कोईराला, नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा एक म्युझिकल चित्रपट होता. याची कथा व गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत.  खामोशी: द म्युझिकलची कथा देखील वर दिल्याप्रमाणे कोडाच्या कथेच्या जवळ जाणारी आहे.  या चित्रपटात ऍनी (मनीषा कोईराला) ही तिच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जिला ऐकायला येते. तिचे पालक मूकबधिर असतात.  स्वतःच्या आईवडिलांना आनंदी ठेवण्यासाठी ती खूप कष्ट करते. ऍनीला संगीताची आवड असते आणि त्यात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना ती  राज (सलमान खान) च्या प्रेमात पडते.

‘कोडा’ची कथा

एमिलिया जोन्स, ट्रॉय कोत्सुर, डॅनियल ड्युरंट, मार्ली मॅटलिन, युजेनियो डर्बेझ आणि फर्डिया वॉल्श-पीलो यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कोडा’ हा चित्रपट रुबी रॉसीभोवती फिरतो. ती तिच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जी ऐकू शकते. तिचे आई-वडील फ्रँक आणि जॅकी व मोठा भाऊ लिओ कर्णबधिर आहेत आणि रुबीवरच घर चालवण्याची जबाबदारी आहे. कोडा आणि खामोशी अशाच मुलींची कथा सांगतात ज्यांना संगीतात करिअर करायचे आहे. दोघीही घर चालवण्यासाठी प्रत्येक समस्येशी झगडत आहेत. मात्र या कथांमध्ये थोडा फरक आहे. जिथे एकीकडे ऍनी एका पॉइंटला तिच्या आईवडिलांवर नाराज होते तर दुसरीकडे रुबी मात्र नेहमीच तिच्या कुटुंबासाठी उभी राहताना दिसते.

ADVERTISEMENT

कोडाची कथा समोर आल्यापासून लोकांना खामोशी: द म्युझिकल हाच चित्रपट आठवतो आहे आणि भारतीय दर्शक याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

29 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT