जेवण चमचमीत असावे असे कोणाला वाटणार नाही. रोज अगदी मनासारखे जेवण मिळाले की, पोट आणि मन दोन्ही सुखावते. प्रत्येकाची जेवणाची चव ही वेगवेगळी असते. काहींना तिखट काहींना मध्यम आणि काहींना गोड जेवण आवडते. मिठाच्या बाबतीतही काही जणांचे अगदी असेच आहे. खूप जणांना वरुन मीठ खाण्याची सवय असते. मीठ वरुन खाण्याची ही सवय अनेक डॉक्टरर्सही चांगली नाही असे सांगतात. काळे मिठ खाण्याचे फायदे असले तरी त्याचे प्रमाण योग्य असायला हवे.
एकदा एका पंगतीत जेवताना मी एका महिलेला सोबत मिठाची वाटी घेऊन बसलेले पाहिले. सुरुवातीला ही महिला सहज मीठ घेऊन बसली असावी असे वाटले होते. पण नंतर तिने जशी मिठात बोटं बुडवली आणि ती जेवणावर घ्यायला सुरुवात केली तसं मी तिच्याकडे पाहात राहिले. कारण चिमूटभर मीठही जेवणाचा स्वाद वाढवू शकते. पण इकडे तर या महिलेने अगदी मिठाची वाटी घेऊन सतत भसाभसा मीठ घेणे सुरुच ठेवले होते. त्यावरुनच हा विषय सुचला आहे. खूप जणांना सतत खूप खारट किंवा मीठ असलेले पदार्थ खाण्याची सवय असते. असे सतत मीठ खाणे हे आरोग्यासाठी खूपच घातक असते. चला जाणून घेऊया मीठ अति खाण्यामुळे नेमके काय होते?
ह्रदय विकाराची शक्यता
अति मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढतो. वाढलेला रक्तदाब हा ह्रदयावर अति ताण आणतो. ज्यामुळे ह्रदयरोगाची शक्यता वाढते. जर तुमच्या घरी आधीच उच्च रक्तदाबाची भिती असेल तर अशांनी रोजच्यापेक्षा 5 ग्रॅम मिठ हे कमी खाल्लेले कधीही चांगले. त्यामुळे या भयावह आजाराची भिती असेल तर तुम्ही मिठाचे सेवन कमी करा.
मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता
मिठाचे अति सेवन हे मूत्रपिंडासाठीही हानिकारक असते. मिठाच्या अति सेवनामुळे तुमचे मूत्रपिंड निकामी होण्याची भिती असते. त्यामुळे असे कोणतेही त्रास नको असतील तर तुम्ही मीठ कमी खा.
हाडं होतात ठिसूळ
अति मीठ खाणे हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. मीठाच्या अतिसेवनामुळे व्हिटॅमिन D शरीरातून कमी होऊ लागते. त्याचा परिणाम हाडं ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे अंगदुखी, गुडघेदुखी ही आधी जाणवली नाही तरी ती कालांतराने जाणवू लागते.
वजन होते कमी
खूप जण ही फार किडकिडत असतात. त्यांचे किडकिडीत किंवा कुपोषित असणे यामागे खूप मीठ खाणे असू शकते. खूप वेळा अति मिठ खाणाऱ्यांची शरीरप्रवृत्ती ही फार बारीक असते. जर शरीरातील पोषकत्वे कमी झाली तर शरीर अशा पद्धतीने सुकते.
पोटाच्या कर्करोगाची शक्यता
मिठाचे अति सेवन हे पोटाच्या आरोग्यासाठीही हानिकारक असते. कारण पोटात सतत मीठ गेल्यामुळे पोटामध्ये अल्सर होण्याची शक्यता असते. पण त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण त्याचे रुपांतर पोटाच्या कर्करोगात होण्याची भिती असते असे सांगितले जाते.
मिठाचे अति सेवन करत असाल तर तुम्ही आताच मिठाचे असे अति सेवन करणे टाळा.