ADVERTISEMENT
home / मनोरंजन
यानिया भारद्वाज

मेकअपचा अतिरेक झाल्यामुळे या अभिनेत्रीला गाठावे लागले हॉस्पिटल

 एखादी अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी सगळे काही करत असेल असे आपल्याला वाटते. पण कोणत्याही अभिनेत्रींसाठी सुंदरता टिकवणे हे देखील महत्वाचे असते. पण कधी कधी काही रोल साकारताना आणि त्यासाठी लागणाऱ्या काही खास गोष्टी करताना कलाकारांना अनेक त्रासालाही सामोरे जावे लागते.चित्रपट पाहताना तुम्हाला ते जाणवत नाही. पण कलाकारांच्या अशा गोष्टी ज्यावेळी समोर येतात त्यावेळीच आपल्याला या गोष्टी कळतात. सध्या असेच काहीसे एका अभिनेत्रीसोबत झाले आहे. चित्रपटातील खास भूमिका साकारत असताना करावा लागणारा मेकअप याचा अतिरेक झाल्यामुळे अभिनेत्रीला चक्क डॉक्टरांकडे जावे लागले आहे.

प्रोस्थेटिक मेकअप पडला महागात

  नुसरत भरुचा हिचा नवा चित्रपट ‘छोरी’ हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात मुख्य भूमिका नुसरतची असली तरी यामध्ये लक्षवेधी काम केलेली यानिया. हिने साकारलेली भूताची भूमिका खूप जणांना चांगलीच आवडली. तिने पडद्यावर ज्या पद्धतीने भूत साकारला आहे. त्यासाठी तिचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण तिने हे भूत साकारताना एक वेगळाच मेकअप केला आहे. याला प्रोस्थेटिक मेकअप असे म्हणतात. जो करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि काढण्यासाठी देखील खूप वेळ जातो. आपला अनुभव सांगताना यानिया म्हणाली की, चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान तिला जो मेकअप करावा लागत होता. त्यासाठी तासंनतास जात होते. आणि ते काढण्यासाठी ही कितीतरी तास जायचे. तिला हा लुक करण्यासाठी बराच वेळ लागत होता. तिची ही मेहनत तिलाच जास्त महागात पडली. कारण हा मेकअप सतत केल्यामुळे तिच्या त्वचेवर त्याचे विपरित परिणाम झालेले दिसले. तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, मेकअप काढताना तिच्या शरीरातून रक्त यायचे. या लुकसाठी तिला वॅक्स करावे लागायचे त्यामुळेही तिचे शरीर दुखायचे. या मेकअपला वजन असल्यामुळे तिचे अंग दुखायचे ताप यायचा.इतकेच नाही हा मेकअप केल्यामुळे तिच्या फुफ्फुसाला सूज आली होती. तिला जेवता येत नव्हते. तिचे जेवण उलटून पडायचे. हे ऐकल्यानंतर भूत साकारणे हे कठीण असते हे सगळ्यांनाच नक्की कळून चुकले असेल . 

मराठी चित्रपटावर आधारीत चित्रपट

काहीच वर्षांपूर्वी पूजा सावंत हिचा असाच एक मराठी चित्रपट आला होता. जो चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचे नाव ‘लपाछपी’ होते. याचे पोस्टर ही असेच काहीसे होते. विशाल फुरिया याचा हा चित्रपट मराठीमध्ये आधी आला आणि आता त्याचे हिंदीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये नुसरत ही प्रमुख भूमिकेत दिसत आहे. मराठी चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्कीच पाहायला हवा. आठ महिन्याची गरोदर असलेली एक महिला नवऱ्याच्या गावी येते. ती अशा शेत घरात येते जिथे आजुबाजूला काहीच नसते. पण काहीच दिवसात तिला या ठिकाणी काहीतरी गडबड असल्याचे दिसते. इतकेच नाही तर तिला काही अदृश्य शक्तींचा त्रासही तिला जाणवत असतो आणि शेवटी तिच्यासमोर सत्य येते. हेच सांगणारी ही कथा आहे. 

आता या  भूमिकेसाठी ज्यांनी इतकी मेहनत घेतली त्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा
कतरिना-विकीनंतर श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, पद्मिनी कोल्हापुरेने दिली हिंट

Bigg Boss Marathi: पुन्हा स्नेहा फसेल का जयच्या गोड बोलण्याला

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि विशाल फाले थिरकणार ‘जीव रंगलया’ गाण्यावर

09 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT