सध्या काम हा सगळ्यांचीच गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण सगळेच घरी बसून काम करत आहोत. घरी काम करणे खूप जणांना आवडू लागले आहे. पण घरी काम करताना कामाच्या वेळा यांचा अंदाज आपल्याला येत नाही. काम करता करता कधी कधी किती तास काम होते याचा अंदाज न आल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभावू लागतात. जर तुम्ही या कडे दुर्लक्ष केले तर त्याचा त्रास भविष्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच आरोग्य समस्या टाळायच्या असतील तर तुम्ही आताच काही गोष्टी कटाक्षाने पाळा.
घरी बसलेल्या मुलांची वजन वाढू देऊ नका, होतायत हे त्रास
पाठीच्या समस्या
कामाचे अति तास म्हणजे जास्त वेळ बसून राहणे. अर्थात त्यामुळे पाठीच्या समस्या उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. जास्त वेळ बसल्यामुळे मणक्याचे त्रास संभावतात. पाठीच्या त्रासासोबतच शरीराला जडत्व येते.जर तुम्ही 10 तासांहून अधिक काळासाठी बसत असाल तर हा त्रास होणे अगदी नक्कीच आहे. कामांच्यामध्ये ब्रेक घेऊन तुम्ही थोडा व्यायाम करा. शरीराची हालचाल करा. त्यामुळे वजनही वाढणार नाही.
डोळ्यांच्या समस्या
हल्ली कामाचे स्वरुप म्हणजे लॅपटॉप आलाच. कॉम्पुटर स्क्रिनकडे सतत बघून बघून सुद्धा डोळ्यांच्या समस्या होऊ शकतात. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे असे काही त्रास त्यामुळे होऊ शकतो. डोळ्यांच्या समस्या उद्भवल्या असतील तर तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांशी निगडीत इतर समस्या उद्धभवणार नाही.
कोरोनाच्या काळात दररोज सकाळी का करायला हवं मेडिटेशन
बद्धकोष्ठतेचा त्रास
सतत एका जागी बसून होणारा आणखी एक त्रास म्हणजे बद्धकोष्ठता. बसून बसून आणि एकाच जागी बसून खाल्ल्यामुळे पोटाचे पचन अगदी व्यवस्थित होत नाही.त्यामुळेच हा त्रास खूप वाढू लागतो. ज्याचा परिणाम हा नंतर संपूर्ण आरोग्यावर होऊ लागतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ लागला असेल तर तुम्ही आताच खूप कामाची सवय सोडा.
इतर गोष्टींची आवड कमी होणे
पूर्वी ऑफिसची वेळ संपली की, घरी जाण्याची ओढ असायची पण आता तसे मुळीच होत नाही. घरी जाण्याची घाई नाही, ट्रेन-बस पकडायची नाही यामुळे जितकं जास्त काम करता येतं. आपण करत राहतो. त्यामुळे इतर काही गोष्टी करण्याची आवड राहात नाही जी मुळीच चांगली नाही. काहीही करण्याचा त्यामुळे कंटाळा येतो. इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही म्हटल्यावर तुमचा संवादही कमी होतो.
नात्यात अंतर येणे
कामाला कुठेतरी ब्रेक लागणे गरजेचे असते. जर असा ब्रेक लागला नाही तर घरातील इतरांसोबतचे तुमचे नाते खराब होते. जोडीदाराला योग्य वेळ दिला नाही की, त्यामध्ये ताण तणाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काम थांबवा त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होण्यास मदत मिळेल.
आता काम वेळीच आवरा आणि येणाऱ्या समस्या टाळा.