ADVERTISEMENT
home / आरोग्य
पेन किलर नाही ‘पेन मॅनेजमेंट थेरपी’ने दूर करा वेदना

पेन किलर नाही ‘पेन मॅनेजमेंट थेरपी’ने दूर करा वेदना

कामाची दगदग आणि सध्या कोरोनाच्या भीतीमुळे असलेला ताणतणाव याचा परिणाम नकळत शरीरावर होत असतो. घरात राहूनही बऱ्याचदा तुमचे पाय, डोके, पाठ, कंबर, पोट  असे अवयव दुखू लागतात. तुम्ही घरातून काम करा अथवा घराबाहेर जाऊन शारीरिक वेदना कोणालाही जाणवू शकतात. बऱ्याचदा लोक मग या वेदनेपासून पटकन आराम मिळावा यासाठी एखादी पेनकिलर घेतात. पुढे अशा गोळ्या घेण्याची त्यांना सवयच लागते. खरंतर वारंवार पेनकिलर घेणं आरोग्यासाठी मुळीच हिताचं नाही. कारण त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ वेदनेपासून सुटका मिळू शकते. मात्र पुढे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले की इतर शारीरिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. यासाठीच जाणून घ्या वेदनेपासून सुटका देणाऱ्या पेन मॅनेजमेंट थेरपीबद्दल

पेन मॅनेजमेंट थेरपी

वेदना या दोन प्रकारच्या असतात हलक्या आणि तीव्र स्वरूपाच्या. सुरुवातीला हलक्या स्वरूपाच्या वेदना जाणवू लागतात. ज्या बऱ्याचदा त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी कमी होतात. मात्र तीव्र स्वरूपाच्या वेदना खूप दिवस जाणवतात आणि त्यामुळे तुमचे दैनंदिन जीवन बिघडू शकते. हलक्या स्वरूपाच्या वेदनेकडे लक्ष न दिल्यास ती तीव्र स्वरूप धारण करू शकते. यासाठी वेळीच वेदनेवर योग्य ते उपचार करायला हवेत. सध्या या वेदनेवर उपचार करण्यासाठी पेन मॅनेंजमेंट थेरपी प्रभावी ठरत आहे. 

pixels

ADVERTISEMENT

पेन मॅनेजमेंट थेरपीची कोणाला असू शकते गरज

जर तुम्हाला सतत उठता बसताना पाय अथवा शरीरात दुखणे जाणवत असेल, एखादी जड गोष्ट उचलताना त्रास होत असेल, शांत झोप लागत नसेल, सतत थकवा जाणवत असेल, प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, अथवा ताणतणाव वाढला असेल, वारंवार भीती वाटत असेल, वेदना होत असलेल्या  ठिकाणी सूज येत असेल तर तुम्हाला पेन मॅनेजमेंट थेरपीची गरज आहे हे ओळखा. पेन मॅनेजमेंट थेरपीमध्ये आधी रुग्णाची आरोग्य तपासणी करून त्या वेदनेवर औषध दिले जाते. शिवाय वेदनेचे मूळ शोधत त्याच्यावर उपचार केले जातात. यासाठी तुमचा एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी, बायोकेमिस्ट्री केली जाते. ज्यामुळे वेदनेचे खरे  कारण  समजते. मात्र या टेस्ट करूनही जर काही कारण समजले नाही तर मिनिमल इनवेसिव्ह प्रक्रियेद्वारे वेदनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा रूग्णांचे शरीर योग्य आहार, पंचकर्म, पोटली मसाज, शिरोधारा अशा आयुर्वेदिक उपचारांनी डिटॉक्स करण्याचा सल्ला दिला जातो. रूग्णांनी नियमित व्यायाम, प्राणायाम आणि आयुर्वेदिक उपचार घेतल्यास शारीरिक वेदनेपासून आराम मिळू शकतो. कारण वात,पित्त,दोष हे त्रिदोष असंतुलित झाल्यामुळे तुमच्याा शारिरिक क्रियेत अडचणी येतात. ज्यामुळे हळूहळू या वेदना जाणवू लागतात. अशा वेदना कमी करण्यासाठी पारंपरिक आणि आर्युवेदिक उपचार प्रभावी ठरतात. आयुर्वेदिक उपचारांमुळे मिळणारे परिणाम उशीरा जाणवत असले तरी ते दीर्घ काळ टिकतात. ज्यामुळे जर तुम्हाला सतत एखाद्या अवयवामध्ये वेदना जाणवत असतील तर पेनकिलर घेऊन थांबू नका. वेदनेचे मूळ शोधा आणि त्याचा समूळ नाश करा. 

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात सतत होत असेल डोकेदुखीचा त्रास, वापरा घरगुती उपाय

प्रत्येक आजारावर खात असाल ‘पेनकिलर’ तर वेळीच सावध व्हा

11 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT