ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Criminal Justice 3

क्रिमिनल जस्टिस 3 – अपूर्ण सत्य उघड करण्यासाठी पंकज त्रिपाठी पुन्हा तयार 

अपराध आणि न्याय हे असे दोन पैलू आहेत ज्यांचा नेहेमीच एकमेकांशी संबंध असतो. अनेक वेळा गुन्हेगार स्वत:ला वाचवण्यासाठी लाख प्रयत्न करतो, पण शेवटी विजय न्यायाचाच होतो. बॉलिवूड सुपरस्टार पंकज त्रिपाठी यांच्या आगामी वेब सीरिज क्रिमिनल जस्टिस 3 ची अशीच काहीशी कहाणी आहे. नुकताच या वेब सीरिजचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या मालिकेची अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘क्रिमिनल जस्टिस’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज केला आहे. माधव मिश्राच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा कमबॅक करण्यास सज्ज झाले आहेत. बुधवारी रिलीज झालेल्या टीझरमध्ये पंकज त्रिपाठी वकील बनून अपूर्ण सत्य उघड करताना दिसणार आहेत. माधव मिश्रा पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सुमारे अर्धा मिनिटांच्या या टीझरमध्ये पंकज त्रिपाठी अधुऱ्या सत्याचे रहस्य उलगडताना दिसत आहेत.

उलगडणार अपूर्ण सत्याचे रहस्य

Criminal Justice 3
Criminal Justice 3

टीझर पाहून असे दिसते की वकील माधव मिश्रा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण केस लढण्यास तयार आहेत. रोहन सिप्पी दिग्दर्शित, ‘क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच’ ही वेब सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित केली जाईल. या मालिकेत पंकज त्रिपाठी हे माधव मिश्रा या पात्र साकारत आहेत. या कथेत माधव मिश्रा आपली बुद्धिमत्ता आणि रणनीती वापरून सत्याचा शोध घेताना दिसणार आहेत. मालिकेच्या या सीझनमध्ये श्वेता बसू प्रसाद सुद्धा दिसणार आहे. श्वेता या मालिकेत लेखा हे पात्र साकारणार आहे. लेखा ही सुद्धा वकील असून ती ​​माधव मिश्रा यांच्याविरुद्ध खटला लढताना दिसणार आहे. टीझरमध्ये माधव मिश्रा म्हणताना दिसतात की “विजय तुमचा किंवा माझा नसावा; फक्त न्यायाचा विजय झाला पाहिजे.”

क्रिमिनल जस्टिस 3 चा टीझर व्हिडिओ जबरदस्त

क्रिमिनल जस्टिस वेब सीरिजचे या आधीचे दोन्हीही सिझन दमदार होते. या दोन्ही सीझनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी आपल्या दमदार कामगिरीमुळे चाहत्यांचे कौतुक मिळवले. हे दोन्ही सिझन प्रेक्षकांना आवडले. जर तुम्ही क्रिमिनल जस्टिस 3 चा टीझर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दिसेल की पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्राच्या भूमिकेत आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. यावेळी क्रिमिनल जस्टिसची टॅग लाईन “अधुरा सच” अशी आहे. यातही माधव मिश्रा आपल्या क्लायंटला वाचवताना दिसत आहेत.क्रिमिनल जस्टिस 3 चा हा टीझर व्हिडिओ रिलीझ झाल्याझाल्याच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

क्रिमिनल जस्टिस 3 कधी रिलीज होणार 

पंकज त्रिपाठी स्टारर क्रिमिनल जस्टिस 3 चा हा दमदार टीझर पाहिल्यानंतर चाहते या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा स्थितीत ही धमाकेदार वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार याची सर्वत्र चर्चा आहे. निर्मात्यांनी अद्याप क्रिमिनल जस्टिस 3 कधी प्रदर्शित होणार याची अधिकृत तारीख दिलेली नाही. पण पंकज त्रिपाठी यांची ही मालिका पुढील महिन्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT