ADVERTISEMENT
home / Diet
pcos

PCOS बरा करण्यासाठी आर्युवेदामार्फत आहार (PCOS patients diet)

सध्याच्या काळामध्येभारतातील प्रत्येक 10 स्त्रियाांमधील / मुलींनमधील एक स्ञी /मुलगी PCOS / PCOD या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार गर्भशयाला जोडून ज्या 2 बीजग्रंथी असतात , त्यावर पाण्याच्या गाठी तयार होऊ स्ञी शरीरातील सांप्रेरकांचे असंतुलन झाल्यामुळे होतो. व्यायामाचा अभाव ,बैठी जिवनशैली मानसिक  ताणतणाव चुकीचा आहार आणि पाळीच्या दिवसांमध्ये आर्युवेदाने जे नियम सांगितले आहेत यालाच रजस्वला परिचर्या असे म्हणतात. त्याचे पालन न करणे कारणामुळे PCOS / PCOD होतो. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. ज्योत्स्ना गोखले, आयुर्वेद आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी, वेदिक्यूर हेल्थकेअर आणि वेलनेस पुणे यांच्याकडून. 

कोणता आहार घेतला तर PCOS / PCOD मुळापासून बरा होतो 

Freepik – PCOS problem

नाष्ट्यामध्ये पोहे, उपमा, भाजणीचे थालीपीठ, व हिरवे मूग भिजवून केलेले घावण दलिया असे पांरपारीक पदार्थ घ्यावे. दुपारचे  घरी बनविलेले ताजे गरम जेवन असावे. त्यामध्ये  मूगाचे डाळीचे पातळसर सार कि ज्याला हळद, कढीपत्ता, हिंग मोहरी, जिरे, याची गाईच्या साजूक तुपामध्ये फोडणी केलेली असावी. यासोबत एखादि फळभाजी म्हणजेच दुधीभोपळा, लालभोपळा, पडवळ, घोसाळे, दोडका, तोंडली, भेंडी, फरसबी, मुळा, शेंगा, पत्ताकोबी, मेथी, तांदुळ, चाकवत, पालक, घोळ, कांदा , कोहळा, गाजर, काकडी, इ. परंतु सेंद्रिय असाव्यात. तसेच गहू, ज्वारी गिरणीतून दळून आणून, या पिठापासून तयार केलेले फुलके/ भाकरी खावी. पॅकेट बंद पिठामधून मैदा पोटामध्ये जाण्याची शक्यता असते. भात  वर्ज करावा. जर खायचा असेल तर थोड्या प्रमाणात तांदूळ भाजून बनलेला असावा. यासोबत काळेतीळ, जवस, सूर्यफुलाचे  बीज याची कोरडी चटणी घ्यावी. यामुळे  स्ञी शरीरातील बीजशक्ती वाढण्यासाठी मदत होते. दुपारच्या जेवणानंतर  पातळसर ताक जे घरी बनिवलेले गाईच्या दह्याचे असेल. फलाहांरामध्ये बहुबीजीय फळ म्हणजेच पेरू, डांळिब, पपई, अंजीर, इ. संञी , मोसंबी, आवळा,  कवठ यांचा समावेश  ऋतूनुसार करावा.

कोणता सुकामेवा ठरतो उपयोगी 

सुकामेव्यामध्ये  लाल भोपळ्याचेबी, अक्रोड, काळा मनुका चारोळी , बदाम, खारीक, सुके अंजीर यापैकी एकाचा तरी समावेश  रोज नित्याने आहारात असावा. शक्यतो नाष्टा, दुपारचे, रात्रीचे जेवण यांच्या वेळा ठराविकच असाव्यात अधेमधे काहीही खाण्याची सवय शक्यतो ठेवू नये. अगदि क्वचितच  भूक लागल्यास पचायला हलकां भाजक अन्न म्हणजे साळीच्या लाह्या, ज्वारीच्या राजगऱ्याच्या लाह्या खाव्यात रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो वरील  भाज्याांपैकी कोणत्याही भाजीचे सार/ सूप असे माफकच अन्न घ्यावे . तेही रात्री ८ च्या आतमध्ये खूप उशिरा जेवण रात्रीचे जाग्रण याने PCOS लवकर बरा होत नाही. PCOS / PCOD मध्ये काय खावे या बरोबरच काय खाऊ नये याला खूप महत्व आहे. म्हणूनच बेकरीचे आंबलेले, तळलेले, मैद्याचे पदार्थ टाळावेत. साखर, गोड पदार्थ, डबा बंद /पॅकेट फूड, कोल्ड drinks साबुदाणा, खारिलेले पदार्थ अजिबात  घेऊ नये. 

व्यायाम गरजेचा 

शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित करा 5 व्यायाम प्रकार
exercise

यासोबत रोज 30 ते 45 मिनटे व्यायाम करावा. यामध्ये सूर्यानमस्कार, योगासने, चालणे, सायकलिंग हे प्रकार करावे. मानसिक  ताण असल्यास त्यापासून दूर राहावे.किंवा प्राणायाम योगसाधना याची मदत घ्यावी. रोज किमान ८ तास शाांत झोप घ्यावी .जागरण न करता शक्यतो 10.30 ला झोपण्याची सवय करावी . अशाप्रकारे आहारासोबत या सोबत सर्व गोष्टीचे  पालन केलेतर PCOS पूर्णतः  बरा होतो. तसेच आर्युवेदामध्ये पंचकर्म  आणि औषधी चिकित्सा करायला सांगितल्या आहेत. गरजेप्रमाणे जवळच्या वैद्याचा सल्ला मार्गदर्शन . शतावरी, अश्वगंधा, पुर्ननवा,अशोक अशा आर्युवेद वनस्पती यांचा वापर प्रकृतीनुसार गरजेप्रमाणे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरल्यास PCOS लवकर बरा होतो. आणि सोबतच आहार विहाराचे पथ्य अचूक पाळल्यास पुन्हा होत नाही.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT