ADVERTISEMENT
home / Uncategorized
peeing mistakes you should avoid as a women

लघवीला जाताना महिलांनी चुकूनही करू नये या गोष्टी

लघवीच्या माध्यमातून दररोज शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जात असतात. त्यामुळे वेळच्या वेळी लघवीला जाणं फार गरजेचं आहे. मात्र महिलांनी लघवीला जाताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कारण पुरुषांपेक्षा महिलांना लघवीच्या जागी इनफेक्शन होण्याचा त्रास जास्त जाणवतो. बऱ्याचदा महिलांना सार्वजनिक ठिकाणी लघवीला जावे लागते. मात्र अशा वेळी लघवीला गेल्यास अथवा लघवी रोखून धरल्यास एखादी छोटीशी चूक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी जाणून घ्या लघवी करताना महिलांनी कोणत्या चुका करणं टाळावं.

लघवीची जागा चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करणं

महिलांनी अथवा मुलींनी लघवी केल्यानंतर लघवीची जागा साफ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जसं की काही जणी पाठीमागून पुढच्या दिशेने लघवीची जागा स्वच्छ करतात. असं केल्यामुळे गुद्द्वारामार्फेत आलेले जीवजंतू तुमच्या लघवीच्या जागी शिरतात. सहाजिकच यामुळे लघवीच्या जागी इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. युरिनरी ट्रॅक इनफेक्शन झाल्यास त्या जागी जळजळ आणि वेदना जाणवतात.

प्रायव्हेट पार्टची अति स्वच्छता करणे

काही जणींना अति स्वच्छतेची सवय असते. ज्यामुळे आपले प्रायव्हेट पार्ट सतत स्वच्छ करत असतात. मात्र जर तुम्ही अति प्रमाणात या भागांची स्वच्छता केली तर ते कोरडे पडतात. या भागांना पुरेसा ओलावा गरजेचा असतो. मात्र अति  कोरडेपणामुळे  प्रायव्हेट भागांना जास्त खाज येते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

लघवी रोखून धरणे

लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जात असतात. यासाठी वेळच्या वेळी लघवीला जाणं गरजेचं असतं. मात्र बाहेर गेल्यावर संकोचामुळे अथवा इतर काही कारणांमुळे महिला लघवीला जाणे टाळतात. आपल्या मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठून राहिली तर त्यामुळे मूत्रमार्गाला इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. असं वारंवार केलं तर यामुळे मूत्राशयाचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

अति प्रमाणात पाणी पिणे

पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. ज्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत होतात. मात्र यासाठी अति प्रमाणात पाणी पिऊ नये. कारण अति प्रमाणात पाणी पिण्यामुळे तुमच्या मूत्राशयावर जास्त ताण येतो. यासाठी दिवसभरात दोन ते तीन लीटर पाणी प्या. त्यापेक्षा जास्त पाणी पिल्यास लघवीच्या जागी इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT