एखादा अभिनेता जरा वेगळा दिसू लागला की, त्याचा बदल हा त्याचे चाहते पटकन ओळखतात. असाच काहीसा बदल अभिनेता सोहेल खानमध्ये दिसू लागला आहे. त्याचा एक नवा व्हिडिओ काहीच दिवसांपूर्वी पोस्ट झाला.यामध्ये हाच तो सोहेल खान आहे असे ओळखणे देखील कठीण झाले. सोहेल खानच्या चेहऱ्यात इतका बदल झाला आहे की, तो तोच आहे हे खरंच ओळखता येत नाही. सोबल खान असा का दिसतो यावर अनेक चर्चा सध्या होताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ नेमका आहेतरी काय? चला घेऊया जाणून
सोहेल खानचा चेहरा असा का झाला?
पापाराझी सेलिब्रिटींचे फोटो कायमच क्लिक करत असतात. सोबेल खान जीमवरुन येतानाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. यामध्ये सोहेल खानचा चेहरा सुजलेला दिसत आहे. सोहेल खानचा चेहरा इतका सुजलेला आहे की, अनेकांनी त्याच्या या बदलत्या रुपावर कमेंट केली आहे. इतकेच नाही तर सोहेल त्यानंतर ईदच्या पार्टीमध्ये दिसला. या पार्टीदरम्यान त्याचा चेहरा तुलनेत बरा दिसला असला तरी देखील आधीचा सोहेल आणि आताचा सोहेल यामध्ये बराच फरक दिसल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
वय की आणखी काही
सेलिब्रिटी स्वत:ला मेंटेन करण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण चित्रपटापासून सोहेल दुरावल्यानंतर तो फारसा कुठेही दिसला नाही. सोहेलच्या या बदलत्या रुपामुळे त्याचे वय की त्याला काही आणखी काय झाले आहे? अशी देखील चर्चा होताना दिसत आहे. पण त्यामागे नेमके कारण काय? हे अद्याप कोणालाही कळलेले नाही.
सोहेलचे चित्रपट करिअर फारसे नाही चालले
सलमानने इंडस्ट्रीवर चांगलेच राज्य केले आहे. अजूनही त्याच्या नावाचा दबदबा आहे. पण त्याचे दोनही भाऊ चित्रपटात आपले नाव कमावू शकले नाही. सोहेल आणि अरबाज यांना अनेक चित्रपट मिळाले असले तरी देखील त्याला म्हणावी तितकी प्रसिद्धी अजिबात मिळाली नाही. काही चित्रपटांमधून त्याने चांगले काम केले असले तरी देखील त्याची तुलना ही सतत सलमानशी झाल्यामुळे त्याचे चित्रपट चालले नाही. अरबाज खानच्याबाबतीतही असेच झाले.अरबाजने बऱ्यापैकी चित्रपटांमधून आपले नशीब आजमावून पाहिले .पण सोहेलला तितक्या संधीही मिळालेल्या दिसत नाहीत. सोहेल खान 51 वर्षांचा असून अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती करण्याचे काम त्याने केले आहे.
सोहेल खानची मुले पदार्पणासाठी सज्ज
सोहेल खानने सीमा सचदेवाशी लग्न केले असून त्याला दोन मुले आहेत. ही दोन्ही मुलं देखील अनेकदा सोशल मीडियावर दिसून येतात. ही दोन्ही मुलं खूपच सुंदर असून त्यापैकी एकाला चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. त्यामुळे आता सोहेल खान त्यांचे पदार्पण नेकमे कसे करेल याची उत्सुकता अनेकांना आहे.
तुम्हाला सोहेलला पाहून नेमके काय वाटले ते आम्हाला नक्की कळवा.