ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रणबीरबद्दल पडू लागेत हे प्रश्न

रणबीर कपूरबद्दल गुगलवर या गोष्टींची होत आहे चर्चा

गुगल हा माहितीचा असा भंडार आहे. ज्याला काहीही विचारले तरी त्या प्रश्नाची उत्तरे मिळतात. आता आलिया (Alia Bhatt )- रणबीरचे (Ranbir Kapoor)  लग्नाची वाट त्यांचे चाहते अनेक दिवसांपासून पाहात होते. त्यांचे लग्न होऊन आता महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या लग्नाची सगळी माहिती तुम्हाला यावर मिळू शकते. त्यांनी चाहत्यांना काही दिवसांपूर्वी गूड न्यूज ही दिली आहे. येत्या वर्षभरात हे दोघे आई-बाबा होणार आहेत. या काळात त्यांचा ‘ब्रम्हास्त्र’ नावाचा चित्रपट येणार आहे. पण या चित्रपटापेक्षाही सध्या रणबीरची चर्चा गुगलवर रंगू लागली आहे. अनेक जण रणबीर कपूरची अधिक माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर करत आहेत. रणबीरसंदर्भात काही असे प्रश्न गुगलला विचारले जात आहेत? ज्यातील काही प्रश्न हे खरंच डोकं खाजवायला भाग पाडणारे आहेत. 

अनिता दातेच्या फोटोमुळे चर्चांना उधाण, राधिकाचा पुनर्जन्म की अजून काय

गुगलवर प्रश्नांचा सुळसुळाट

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.आलिया- रणबीरच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार आहे. पण लोकांना त्यापेक्षाही अधिक उत्सुकता काही वेगळ्या गोष्टींमध्ये असल्याची दिसत आहे. रणबीर संदर्भात असे काही प्रश्न विचारले जात आहेत. ज्याचा त्याच्या आयुष्याशी काहीही संबंध आहे की नाही हे कळत नाही. जाणून घेऊया कोणते प्रश्न आहेत हे नक्की

  1. रणबीर कपूरची पहिली बायको कोणती? 

रणबीरचे कधीही लग्न झालेले नाही. तो आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता. कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, नर्गिस फकरी यांच्यासोबत तो रिलेशनशीपमध्ये होता. पण हे कोणतेही नाते टिकले नाही. 2017 साली त्याचे आलियासोबत प्रेम सुरु झाले. 2022, एप्रिलमध्ये त्याने लग्न केले असून त्यांच्या घरी आता नवा पाहुणा येणार आहे. 

ADVERTISEMENT
  1. रणबीर कपूरला कोणता आजार आहे? 

गुगलवर विचारला जाणारा हा दुसरा प्रश्न देखील चक्रावून टाकणारा आहे. थोडासा शोध घेतल्यानंतर हे लक्षात आले आहे की, त्याला नाकाशी संबंधित काही त्रास होता. त्याचा उल्लेख आता सतत केला जात आहे. त्याला असा आजार आहे ज्यामुळे त्याची वास घेण्याची क्षमता कमी झालेली आहे. 

  1.  रणबीर कपूर इन्स्टावर का नाही? 

हल्ली अनेक सेलिब्रिटी इन्स्टावर अगदी हमखास असतात. त्यामधूनच ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहात असतात. पण असे असताना रणबीरसारखा तरुण कलाकार या प्लॅटफॉर्म का नाही असा प्रश्न त्याला करण जोहरने त्याच्या कॉफी विथ करणमध्ये विचारला होता. त्यावेळी त्याने मी सिक्रेटली या अकाऊंटमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे तो फेक अकाऊंटच्या माध्यमातून सगळीकडे लक्ष देतो असे म्हणायला काहीही हरकत नाही. 

  1.  आलिया रणबीरसोबत खूश आहे का? 

गुगलवर कधी काय विचारण्यात येईल याचा नेम नसतो. पण आलिया रणबीरसोबत खूश आहे का? असा प्रश्न विचारणे म्हणजे जरा अतीच झाले नाही का? पण आलिया -रणबीर यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले त्यामुळे ते आता खुश आहेत. 

तुम्हाला रणबीरसंदर्भात कोणता प्रश्न गुगलला विचारण्याची इच्छा आहे. नक्की कळवा.

ADVERTISEMENT
08 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT