सुंगधी राहावे असे अनेकांना वाटते. त्यासाठी वेगवेगळे परफ्युम लावणे अनेक जण पसंत करतात. परफ्युम निवडताना ते लाँग लास्टिंग असावे असे अनेकांना वाटते. त्यासाठी खूप जण ते खरेदी करायला गेल्यानंतर लाँग लास्टिंग परफ्युम कोणते? असे विचारतात. पण तुम्हाला माहीत आहे का? परफ्युम जर योग्य ठिकाणी लावले तर ते जास्त काळासाठी टिकू शकते. शरीराच्या काही विशिष्ट भागांवर परफ्युम मारण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण असे की या भागावर परफ्युम मारल्यामुळे त्याचा गंध जास्त काळ राहतो. यालाच परफ्युम पाईंट्स असे म्हणतात. तुम्हाला या परफ्युम पाँईट्सची माहिती नसेल तर चला घेऊया जाणून
परफ्युम पाँईंट्स म्हणजे काय?
ज्या प्रमाणे मेकअप अधिक काळ टिकण्यासाठी ते लावण्याची एक ट्रिक असते अगदी त्याच प्रमाणे परफ्युम लावताना ते भारंभार न लावता योग्य ठिकाणी लावले तर ते चांगले टिकते. याच पॉईंट्सला परफ्युम पॉईंट्स असे म्हणतात. अगदी थोडासा परफ्युम तुम्ही त्या ठिकाणी लावला की, तो जास्त काळ टिकतो. तुम्ही अगदी कुठेही जाणार असाल तर तुम्हाला सतत परफ्युम लावाला लागणार नाही. शक्यतो सगळे जण परफ्युम काखेत मारतात. पण हे वाचल्यानंतर तुम्ही काखेत परफ्युम लावायचे विसराल इतकेच नाही तर तुमचे परफ्युम जास्त काळ टिकेल.
परफ्युम पॉईंट्स
शरीरावर असे काही पाँईंट्स असतात जिथे परफ्युम लावल्यामुळे तो परफ्युम अधिक काळ टिकून राहतो.
कानाच्या पाठी : कानाच्या पाठी परफ्युम लावण्याची खरी जागा आहे. हा असा भाग आहे जिथे आपला हात फार काळ जात नाही. त्यामुळे आपला सुंगध जास्त काळ टिकून राहते. अगदी जरासा परफ्युम तुम्ही कानाच्या पाठी लावला तर तो परफ्युम अगदी रात्रीपर्यंत टिकून रहते. त्यामुळे दोन्ही कानाच्या पाठीमागे तुम्ही परफ्युम लावा. ज्यावेळी तुम्हाला कोणी मिठी मारतं त्यावेली तुमचा सुगंध दरवळतो.
मानेच्या खाली: मानेच्या खाली हा देखील परफ्युम पाँईट आहे. त्याठिकाणी जरी तुम्ही परफ्युम लावले तरी ते जास्त टिकून राहते. मानेच्या खाली अगदी थोडासा स्प्रे करा. हा स्प्रे केल्यामुळे परफ्युम जास्त काळ टिकतो. शिवाय हा पॉईंट असा आहे ज्यामुळे तुम्ही मारलेल्या परफ्युमचा सुगंध दरळत राहतो.
हाताचा आतला कोपरा: हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या भागात तुम्हाला परफ्युम लावायचे असते. हा असा परफ्युम पॉईंट आहे जो खूप जास्त काळासाठी परफ्युम होल्ड करु शकतो. त्यामुळे तुम्ही या पॉईंटवरही परफ्युम अगदी हमखास लावा.
मनगट: कोणतेही परफ्युम ट्राय करायचे असेल तर ते तुमच्या मनगटाला लावले जाते. परफ्युम मनगटाला लावल्यामुळेही त्याचा सुगंध जास्तीत जास्त येत राहतो. त्यामुळे मनगटालाही परफ्युम लावायला विसरु नका. मनगटाला परफ्युम लावायला अजिबात विसरु नका
आता या पॉईंट्सवर परफ्युम लावा आणि दिवसभर सुगंधी राहा