कपडे घालणे अथवा निवडणे तसं तर सोपं आहे पण त्यासह योग्य दागिन्यांची स्टाईल करणे अनेकांना जमतेच असं नाही. अनेकदा सेलिब्रिटीही यासाठी खास स्टायलिस्टची (Stylist) निवड करतात. कोणत्या कार्यक्रमाला कोणते आऊटफिट्स घालायचे आणि त्यावर कोणते दागिने घालायचे यासाठी आम्ही काही खास टिप्स तुम्हाला देणार आहोत. यासाठी आम्ही टिप्स घेतल्या आहेत, दिनेश दस्सानी, दस्सानी ब्रदर्सचे भागीदार यांच्याकडून. तुमच्या आऊटफिटसाठी योग्य दागिने कोणते आहेत (How to find the best suitable jewelry for your outfit?) आणि ते कसे निवडायला हवेत याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
तुमची स्टाईल ठरवा (Decide Your Style)

प्रत्येकाची आपली अशी एक वेगळी स्टाईल असते, शैली असते. दागिन्यांची स्टाईल करणे हे प्रत्येकासाठी सोपे ठरतेच असं नाही. तुमच्यसाठी काय योग्य आहे आणि तुम्ही तुमच्या आऊटफिट्सवर काय दागिने घालायचे आहे यासाठी मुळात तुम्ही कोणत्या दागिन्यांमध्ये आरामदायी फील करता हे महत्त्वाचे आहे. तुमच्या नेहमीच्या कपड्यांवर तुम्ही पर्ल स्टड (Pearl Stud) अर्थात मोत्यांचे दागिने, नाजूकसे हिऱ्याचे दागिने आणि पेंडंट अथवा ड्रॉप इअररिंग्ज असे दागिने वापरावेत. जे तुम्हाला बटबटीत दिसत नाहीत आणि कोणत्याही कार्यक्रमासाठीही आणि अगदी ऑफिसमध्ये चांगले शोभून दिसतात. साडी असेल तर आकर्षक चोकर (Choker), स्टेटमेंट पेंडंट, इअर कफ आणि पोल्की झुमके असे दागिने तुम्ही घालू शकता.
असा वापरा नेकलेस (Mind Your Neckless)

तुमचा नेकलेस (Neckless) निवडताना तुम्ही तुमच्या गळ्याच्या आकाराचा विचार करायला हवा. बोटलाईन नेक असेल अथवा हाय नेक असेल तर तुम्ही लांब चैन अथवा पेंडंट्सचा विचार करा. अधिक आकर्षक लुकसाठी तुम्ही लेअर चैनचाही विचार करू शकता. व्ही नेकलाईन अथवा स्क्वेअर नेक असेल तर तुम्ही लहान चैन्स अथवा लहान पेंडंट्सचा वापर करावा. तुमच्या गळ्यात हे व्यवस्थित दिसायला हवे याची काळजी घ्या. तुम्ही डीप नेकलाईन ठेवणार असाल तर तुम्हाला नक्कीच अशा स्टाईल्सचे नेकलेस सुंदर आणि अधिक आकर्षक दिसतील.
करा स्लीव्ह्जसह मॅच (Match The Sleeves)
इथे तुम्हाला नियम लक्षात ठेवायला हवा की, स्लीव्ह्ज जितका लांब, तितकीच बारीक स्टाईलची बांगडी हवी आणि त्याशिवाय बांगड्यांची संख्याही कमी हवी. टँक टॉप अथवा स्लीव्हलेस ब्लाऊज असेल तर ट्रेंडी बांगड्या यावर अधिक चांगल्या दिसतात. तुम्ही जर साडीवर फुलस्लीव्ह्ज घालणार असाल तर तुम्ही अगदी बारीक ब्रेसलेट यासह स्टाईल करावे. तसंच जर स्लीव्ह्ज लहान असतील अथवा फुल स्लीव्ह्जचा गाऊन ड्रेस असेल तर तुम्ही बांगड्या न घालता ब्रेसलेट निवडावे.
कार्यक्रम आणि ठिकाणही आहे महत्त्वाचे (Occasions And Locations Matter)

तुमच्या लग्नाच्या समारंभापेक्षा ऑफिस पार्टीचे दागिने हे नक्कीच वेगळे असायला हवेत. तुम्ही जेव्हा ऑफिससाठी फॉर्मल ड्रेस घालता तेव्हा त्यावर अधिक दागिने कधीही चांगले दिसत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला मोठे दागिने आवडत असल्यास, तुम्ही हुप्स इअररिंग्ज अथवा डँगलरपर्यंत मर्यांदित ठेवणे योग्य आहे. पार्टीसाठी दागिने घालायचे असल्यास, तुम्ही बोल्ड आणि आधुनिक दागिन्यांचा वापर नक्कीच करू शकता. तसंच यावर तुम्ही सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिनेही स्टाईल करू शकता.
पारंपरिकता आणि आधुनिकतेचा मेळ

तुम्ही जिथे प्रवेश कराल तिथे लोकांच्या नजरा या तुमच्या स्टाईलवर खिळायला हव्यात असं वाटत असेल तर तुम्ही तुमचे स्टाईल स्टेटमेंट ठरवून ठेवणे योग्य आहे. अति दागिन्यांचा वापर करण्यापेक्षा योग्य दागिन्यांचा वापर करणे नेहमीच योग्य ठरते हे लक्षात ठेवा.
तुमची स्वतःची स्टाईल ठरविण्यासाठी तुमच्या कपड्यांसह योग्य दागिन्यांचीही तितकीच गरज आहे हेदेखील तुम्ही लक्षात घ्यायला हवे. तुम्हाला आमच्या टिप्स नक्कीच आवडल्या असतील. या टिप्स फॉलो करा आणि दिसा अधिक सुंदर!