ADVERTISEMENT
home / मनोरंजन
महाराष्ट्रात दरवळणार ‘परफ्युम’

महाराष्ट्रात दरवळणार ‘परफ्युम’

मराठी चित्रपटात नेहमीच नवे विषय हाताळण्यात आले आहेत. यावर्षी मराठी चित्रपटांमध्ये वैविध्य दिसून आले आहे. त्यानुसारच आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे ‘परफ्युम’. या चित्रपटातून वेगळी प्रेमकहाणी 1 मार्चला प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार आवर्जून उपस्थित राहिले होते. ‘हलाल’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लेथ जोशी’ या चित्रपटाची प्रस्तुती केलेल्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

perfume 1
सस्पेन्स – थ्रिलर प्रेमकहाणी

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रीलर प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकामध्ये नक्की काय काय वळणं असतील याची उत्सुकता नक्कीच या पोस्टरवरून प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्याशिवाय पोस्टरवरील रंगसंगतीमुळे ही कथा अत्यंत रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट असेल असाही अंदाज प्रेक्षकांना आला असेल. त्यामुळे आता अजून वेगळं आणि अद्भूत या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे ते लवकरच कळेल. नुकतंच पोस्टर लाँच झालं असून आता याच्या ट्रेलरची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

अनुभवी कलाकारदेखील चित्रपटात

ADVERTISEMENT

दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले असून चित्रपटाची कथा किशोर गिऱ्हे यांनी लिहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हीना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळतो हे लवकरच कळेल.

13 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT