मालिका क्वीन एकता कपूरच्या मागचे शुक्ल काष्ट संपायचे काही नाव घेत नाही. तिच्यावर सतत काही ना काही आरोप लावण्यात येत आहे. आता तिच्यावर लागलेला आरोप हा अत्यंत गंभीर असून तिच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनवर एक याचिका दाखल करण्यात आली असून तिच्यावर अश्लीलता पसरवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे नेमकं प्रकरण काय ते देखील आपण आता जाणून घेऊया
बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो,करण सिंह ग्रोव्हर करतोय कौतुक
कोणी केली एकतावर याचिका दाखल
एकता कपूरवर याचिका दाखल करणारी व्यक्तीही प्रसिद्ध आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक बलजीत सिंह यांनी एकताविरोधात याचिका दाखल केली असून त्यांनी एकताच नाही तर संपूर्ण कुटुंबावर याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे. एकतावर बलजीत यांनी अश्लीलतेचा आरोप लावला आहे.एकता कपूर यांच्या बालाजी प्रोडक्शनने निर्मित केलेल्या एका वेबसिरिजमध्ये भारतीय सेनेवर अत्यंत वाईट असा विनोद करण्यात आला आहे. त्यामुळेच चिडलेल्या बलजीत सिंह यांनी अमृतसर येथील चीफ जुडिशिअल कोर्टामध्ये एकता आणि बालाजी प्रोडक्शनविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी कधी होईल हे अद्याप कळले नाही.
नवोदित गायक आणि संगीतकारांसाठी हिमेश रेशमियाचा खास सल्ला, आत्मनिर्भर व्हा
बालाजी शब्दाचा एकताला विसर
बलजीत हे फक्त एका वेबसिरिजची तक्रार करुन थांबले नाहीत. तर त्यांनी पुढे एकता कपूरला या याचिकेच्या माध्यमातून विचारणा केली आहे. ‘बालाजी’ या शब्दाचा कदाचित एकताला विसर पडला असावा किंवा तिला याचा अर्थ माहीत नसावा. कारण ज्या देवाच्या नावाखाली ती हे सगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम तयार करते ते अश्लील असतात असेही बलजीत यांनी सांगितले आहे. बलजीत सिंह यांच्या वकिलाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बलजीत यांनी एकताला प्रोडक्शन हाऊसचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.
हिंदू संघटनांकडे केली ही मागणी
एकता कपूरच्या या प्रोडक्शन हाऊसविरोधात हिंदू संघटनांनी एकत्र येण्याची मागणी बलजीत यांनी केली आहे. एकत्र येऊन अशा प्रवृत्तीला ठेचले पाहिजे असे देखील ते म्हणाले आहेत. एकता कपूरच्या ट्रिपल X वरही या आधी खूप गंभीर आरोप लागले आहेत. यातील एक सीन अनेकांना खटकला होता. त्याविरोधात हिंदुस्तानी भाऊने देखील आवाज उठवला होता.त्यानेही यातून अश्लीलता पसरत आहे असा आरोप केला होता. पण आता बलजीत सिंह यांनी चक्क कोर्टात धाव घेत एकता कपूरला धडा शिकवायचे ठरवले आहे.
प्रेक्षकांनीही उठवला आवाज
इतकेच नाही तर प्रेक्षकांनीही एकता कपूरविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनीही तिला अशापद्धतीने भारतीय सेनेला अपमानित करण्यावरुन ट्रोल करेले आहे. इतकेच नाही तर काहींनी एकता कपूरला जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यानंतर हा आक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. हा सीन काढून टाकण्यावर तिनेही त्यावेळी होकार दर्शवला होता.
सध्याच्या बोल्ड विश्वात स्वत:ला बोल्ड करु पाहणाऱ्या एकता कपूरला मात्र आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा व्हिडिओ वायरल