ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘रसोडे मै कौन था’ मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर

‘रसोडे मै कौन था’ मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर

लॉकडाऊनमध्ये लोकांना काही काळासाठी खळखळून हसवले असेल आहे ते ‘रसोडे मै कोन था’ या मीम्स व्हिडिओने. औरंगाबाद येथे राहणाऱ्या एका इंजिनीअर- म्युझिक डिरेक्टर यशराज मुखातेने एक भन्नाट मीम व्हिडिओ पोस्ट केला. पाहता पाहता हा व्हिडिओ इतका हिट झाला की, कोकिलाबेन घराघरात जाऊन पोहोचल्या. अनेकांनी या मीमला थोडे आणखी मजेशीर करण्याचाही प्रयत्न केला. अगदी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत हे मीम लोकांना इतके आवडले की, सध्या ‘रसोडे मै कौन था’ असं म्हटल्यावर आपसुकच राशीबेन आल्यावाचून राहात नाही. याच मीम व्हिडिओची भूरळ आता सरकारलाही पडली आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या कोकिलाबेनच्या व्हिडिओचा उपयोग त्यांनी काही खास जनजागृती करण्यासाठी केला आहे. नेमका याचा वापर कुठे आणि कसा करण्यात येणार आहे ते जाणून घेऊया.

PUBG मधून झाली अनेकांची सुटका, ट्विटरवर मीम्सचा पाऊस

असा केला जात आहे वापर

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने याचा वापर थोडा वेगळ्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. लोकांनी पोषण आहाराचे सेवन करायला हवे यासाठी याचा उपयोग असा काही करण्यात आला आहे की, अनेकांना त्यामुळे आणखीच ही जाहिरात जवळची वाटू लागली आहे. कोकिलाबेनचा रागातील फोटो वापरण्यात आला असून ‘कोकिलाबेनला राग का आला?’ याच्या उत्तरादाखल कोकिलाबेनने आज प्रोटीन असलेले चणे खाल्ले नसतील असे उत्तर देत स्वस्थ राहाचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. म्हणूनच अशा पद्धतीने या मीम्सचा उपयोग हा करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या मीम्समुळे #PoshanMaah #gopibahu #instagram असे काही हॅशटॅगही आता  चांगलेच ट्रेंड होऊ लागले आहेत. 

गौहर खान लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, व्हिडिओमुळे चर्चेला सुरूवात

ADVERTISEMENT

लोकांनीही केली तारीफ

कोकिलाबेनचे हे मीम अशापद्धतीने वापरल्याचा आनंद सर्वसामान्य लोकांनाही झाला आहे. त्यांनी सरकारने उचललेल्या या नव्या बदलाचा आनंद अनेकांनी व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या नव्या बदलाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या एका निर्णयावर टीका न करता तारीफ केली जात असल्याचा आनंदच आहे. 

सोशल मीडियावर अचानक हिट झाले मीम्स

 दिवसभरात कितीतरी मीम्स सोशल मीडियावर येतच असतात. पण काहीच मीम्स असे असतात जे सोशल मीडियावर इतके प्रसिद्ध होतात. असेच होते हे कोकिलाबेनचे मीम. साथी साथ निभाना या मालिकेतील एक डायलॉग पॅच उचलून यशराज मुखातेने त्याला संगीतबद्ध करण्याचे काम केले. हे मीम पाहायला गेले तर फारच साधे होते. पण तरीही या मीमने एक वेगळीच मजा सोशल मीडियावर आणली आहे. या एका मीमवरुन आणखी काही मीमही तयार होत आहे. 

आदिपुरुष’चा खलनायक असणार सैफ अली खान, साकारणार लंकेश

साथी साथ निभाना 2

टीव्ही विश्वासातील ‘साथी साख निभाना’ ही मालिका काहीवर्षांपूर्वी संपली होती. पण पुन्हा एकदा ती नव्या रुपात येणार आहे. या मीमनंतर या नव्या सीझनचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या मालिकेच्या ट्रेलरलाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.

ADVERTISEMENT

आता या मीमचा उपयोग आणखी किती आणि कसा केला जाणार आहे हे पुढील काळात कळेलच.

03 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT