Advertisement

बॉलीवूड

निक जोनाससोबत पिग्गी चॉप्स आली भारतात,शेअर केला फोटो

Leenal GawadeLeenal Gawade  |  Feb 27, 2019
निक जोनाससोबत पिग्गी चॉप्स आली भारतात,शेअर केला फोटो

लग्नाचे सगळे सोहळे आटोपल्यानंतर पिग्गी चॉप्स अर्थात  प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. लग्नानंतर ती निकसोबत अमेरिकेत परतली होती. पण काल ती मुंबईत परतली असून तिने तिचा एक फोटो देखील शेअर केला आहे. इन्स्टावर हा फोटो शेअर केला असून तिने त्या फोटोखाली एक सुंदर कॅप्शनदेखील लिहली आहे. Best travel buddy ever..hello Delhi.. so good to be back.. ❤️🇮🇳💋 @nickjonas असे तिने लिहले आहे. प्रियांका मायदेशी कोणत्या कारणासाठी परतली आहे. हे स्पष्ट झाले नसले तरी प्रियांकाच्या फॅन्सना आनंद झाला आहे.

श्रीदेवींचा ‘मॉम’ चित्रपट होणार दिल्लीत रिलीज

 
 
 
View this post on Instagram

 
 

Best travel buddy ever..hello Delhi.. so good to be back.. ❤️🇮🇳💋 @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 26, 2019 at 10:05am PST

प्रियांकाची देशवारी

नोव्हेंबरमध्ये जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियांकाचा दिमाखदार शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर मुंबई, दिल्ली असे त्यांचे रिशेप्शनदेखील झाले. त्यानंतर निक जोनाससोबत अमेरिकेत परतलेली पिग्गी अखेर काल भारतात दाखल झाली आहे. तिचे निकसोबत मायदेशी परतण्याचे कारण कळले नसले तरी ती कामानिमित्त आल्याची चर्चा देखील केली जात आहे. तिने हा फोटो शेअर केल्यामुळेच तिच्या फॅन्सना ही बातमी कळली. निकसोबत अफेअर्सच्या चर्चेनंतर तिने या नात्याला दुजोरा देणारे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. ती निकसोबतच्या प्रत्येक गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता हा फोटोही तिच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे. कारण तिच्या फॅन्सनी निक आणि प्रियांकाचे स्वागत केले आहे.

नेहा कक्करने केली हिमांशूची पाठराखण

प्रियांका इन्स्टावर अॅक्टिव्ह

सोशल प्लॅटफॉर्म सेलिब्रिटींसाठी एक मुक्त व्यासपीठ असते. इन्स्टा हे सध्या सगळ्यांचेच आवडते आहे. त्यात सेलिब्रिटी काही मागे नाहीत. प्रियांकादेखील इन्स्टाग्रामवरुन सतत काहीना काही शेअर करत असते. तिने तिचे अनेक फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. अगदी नुकताच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यासाठी ती निकसोबत रेड कारपेटवर आली होती. त्यावेळी तिने घातलेला गाऊन सुंदर होताच. पण  त्यापेक्षाही अधिक सुंदर त्या दोघांचे फोटोज तिने तिच्या अकाऊंटवरुन शेअर कलेले आहेत.

priyanka nick

शुटींगमध्ये व्यग्र

अनेक हॉलीवूड प्रोजेक्टसमध्ये सध्या प्रियांका व्यग्र आहे. नुकतीच नेटफ्लिक्सवर तिची ‘Isnt it Romantic?’ ही सीरिज रिलीज करण्यात आली. ही सीरिज नेटफ्लिक्सवरदेखील काही देशांमध्येच रिलीज करण्यात आली. आता प्रियांकाच्या हाती आणखी काही प्रोजेक्ट असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.     

priyanka nick2

 ‘तिकिट टू हॉलीवूड’

मिस वर्ल्डचा खिताब जिंकलेल्या प्रियांकाने दर्जेदार हिंदी चित्रपटात कामे केली आहेत. त्यांनतर तिला तिकिट टू हॉलीवूड मिळाले आणि ती सातासमुद्रापार अमेरिकेत जाऊन वसली. प्रियांका अमेरिकेत गेली असली तरी तिने हिंदी चित्रपटात काम करण्याचे सोडलेले नाही. तिने हिंदी चित्रपटात काम करणे सुरुच ठेवले. आता ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे शुटींग सुरु झाल्यानंतर ती देशात पुन्हा येण्याची शक्यता आहे. या चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसली  तरी ही जोडी या आधीही आपण सगळ्यांनीच पडद्यावर पाहिलेली आहे.

का आलेत आलिया-रणबीर लाईमलाईटमध्ये?

(फोटो सौजन्य- Instagram)