ADVERTISEMENT
home / भविष्य
Pisces zodiac

मीन राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये घ्या जाणून

मीन राशीच्या (Pisces) व्यक्तींचा जन्म महिना हा 19 फेब्रुवारीपासून ते  20 मार्चपर्यंत असतो. या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. मीन राशीच्या व्यक्ती खूपच सामाजिक अर्थात सोशल असतात. स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्याचा यांचा स्वभाव असतो. अतिशय हसऱ्या आणि आपल्याशा करणाऱ्या स्वभावामुळे या व्यक्ती सर्वांना आपलेसे करतात. तुमच्या जवळची कोणतीही व्यक्ती मीन राशीची असेल तर तुम्ही नक्की हा लेख वाचा आणि त्यांना टॅग करा. जाणून घ्या कसा आहे मीन राशीचा स्वभाव. 

अधिक वाचा – कशा असतात धनू राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव (Pisces sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म हा एका विशिष्ट वेळी, तारखेला आणि ठिकाणी होत असतो. त्यानुसार त्याचा स्वभाव आणि वागणे ठरते. यावरूनच त्या व्यक्तीची रास ठरते आणि त्याची आवड निवड, चांगुलपणा – वाईटपणा ठरत असतो. आपण आता मीन राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 

अधिक वाचा – मकर राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, नेहमी राहतात मनाने तरूण

ADVERTISEMENT
  • जिथे लोकांचा विचार करणे बंद होते, तिथपासून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते. जेव्हा संकटात इतर राशीच्या व्यक्ती हार मानतात. मीन राशीच्या व्यक्तींकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा उपाय हा असतोच. इतरांनी याचा विचारही केला नसेल असे उपाय या व्यक्तींकडे असतात. कोणतीही कंटाळवाणी गोष्ट अधिक मजेशीर कशी करायची हे या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे. 
  • मीन राशीच्या व्यक्तींना प्रवास करणे खूपच आवडते. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही थकवा असला तरीही फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात. यांच्या फिरण्याच्या स्वभावामुळेच या व्यक्तींना निसर्गात रमायला आणि साहसी गोष्टी करायला आवडतात 
  • मीन राशीच्या व्यक्ती थोड्या लाजाळू असल्या तरीही त्या रोमँटिक असतात. प्रेम करणे या व्याखेच्याच जणू या व्यक्ती प्रेमात आहेत. आपली संपूर्ण संवेदनशीलता आणि आपला स्वभाव आपल्या जोडीदाराला या व्यक्ती अर्पण करतात
  • प्रेमात सर्व काही अर्पण करण्याची यांची ही वृत्ती त्यांना कधी कधी धोकादायकही ठरते. त्यामुळे प्रेमात धोका मिळण्याची शक्यता जास्त असते. मीन राशीच्या व्यक्ती जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्हाला त्याची पटकन जाणीव होते आणि जेव्हा प्रेम करत नाहीत त्याचीही त्यांच्या वागण्यातून जाणीव होते. तुम्ही न बोलता तुमच्या भावना मीन राशीच्या व्यक्ती जाणून घेऊ शकतात. 
  • परफेक्ट मॅचच्या बाबतीत सांगायचे झाले तर मीन आणि कर्क ही अगदी योग्य जोडी आहे. कारण या दोन्ही राशी अत्यंत भावनिक राशी आहेत. एकदुसऱ्याचे दुःख पटकन समजून घेण्याऱ्या या राशी आहेत. जोडी म्हणून ही उत्तम आहे. दोघेही अत्यंत रोमँटिक असून एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली वाईट गोष्ट अथवा वाईट बोलणे आवडत नाही. अत्यंत इमानदार आणि संवेदनशील या दोन्ही व्यक्ती असतात. कोणाचाही विरोध करण्यासाठी यांना शक्य नसते. आपण जे सांगत आहोत त्याचा समोरची व्यक्ती चुकीचा समज करून घेईल का अशी भीती कायम त्यांच्या मनात असते. 
  • मार्च महिन्यात जन्म झाल्याने यांचा ग्रह गुरू असतो. त्यामुळे या व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असतात. कला यांच्या अंगात असते. संगीत, ललित कलांमध्ये या व्यक्ती प्रसिद्ध असतात. त्यामुळेच देशातील अनेक महान व्यक्ती तुम्हाला मीन राशीच्या दिसून येतील 
  • अत्यंत मेहनती आणि नेहमी काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या या व्यक्तींना कामात नेहमीच प्रगती मिळते. आपल्या योग्यतेनुसार या व्यक्तींना कामात प्रगती मिळते 
  • मीन राशीच्या व्यक्तींना शो ऑफ करण्याची जास्त सवय असते. तसंच बचत करण्यामध्ये या व्यक्ती खूपच मागे असतात कारण या व्यक्ती खर्चिक असतात. स्वतःचा स्टेटस जपणे या व्यक्तींना जास्त महत्त्वाचे वाटते. 
  • या व्यक्तींना रहस्यमयी गोष्टींमध्ये खूपच रस असतो. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी या व्यक्ती उत्सुक असतात. पण या व्यक्तींवर विश्वास ठेवणे जरा कठीणच असते कारण दुसऱ्या कोणाचेही सिक्रेट या व्यक्तींना ठेवता येत नाही. तर सिक्रेट जाणून घेतल्यावर त्याला मसाला लाऊन त्याचे गॉसिप करण्यात यांना अधिक रस असतो. 

भाग्यशाली क्रमांक – 3, 7, 9
भाग्यशाली रंग – पिवळा, हिरवा, गुलाबी
भाग्यशाली वार – रविवार, सोमवार आणि शनिवार
भाग्यशाली खडा – पुखराज अर्थात गुरू 

मीन राशीचे बॉलीवूड स्टार्स – श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, आमिर खान, आलिया भट्ट, अनुपम खेर, उर्वशी राउतैला, भाग्यश्री, अभय देयोल

मराठी स्टार्स – शिवानी बावकर 

अधिक वाचा – कुंभ राशीच्या व्यक्तींची वैशिट्ये, काय आहेत यांचे गुण आणि दोष

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT