ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Vegetable gardening in summer

एप्रिल महिन्यात बागेत लावा या भाज्या, पटापट वाढतील

एप्रिल महिना हा भाजीपाला लावण्यासाठी चांगला हंगाम आहे. ज्या भाज्या वाढण्यासाठी चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज असते, आणि ज्या उबदार हवामानात चांगल्या वाढतात  त्या आपल्या कडक भारतीय उन्हाळ्यातही अगदी व्यवस्थित वाढतात. उन्हाळी भाज्यांची चांगली गोष्ट म्हणजे त्याच भाज्या पावसाळ्यातही चांगल्या वाढतात.जर तुम्हाला तुमच्या बागेत भाजीपाला लावण्याची आवड असेल तर तुम्ही एप्रिल महिन्यात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची, लाल भोपळा, काकडी, दुधी भोपळा, भेंडी ही रोपे सहज लावू शकता.त्यांना वेळच्या वेळी पाणी व खत घातले की त्यांचे उन्हाळ्यातही चांगले पीक येऊ शकते. फक्त या झाडांची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला माहित असले पाहिजे.

पण उन्हाळा आला की झाडांची पाने सुकायला लागतात, झाडांना जास्त पाणी आणि खताची गरज असते. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या बागेत बरेच बदल करावे लागतात. अनेक लोक उन्हाळ्यात भाज्या लावणे पसंत करतात. उन्हाळ्यात भाज्या खाणे खूप फायदेशीर असते आणि जर भाज्या ताज्या असतील तर जेवणाची चव आणखी वाढते. जर तुम्हालाही तुमच्या बागेत भाजीपाला लावायचा असेल तर एप्रिल महिन्यात तुम्ही काही भाज्यांच्या बिया लावू शकता. या भाज्यांच्या बिया खरं तर तुम्ही प्रत्येक ऋतूत लावू शकता, पण एप्रिल महिन्यात या भाज्या पेरल्या तर त्यांची चांगली वाढ होते. 

सिमला मिरची 

टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची या भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बागेत सिमला मिरची देखील लावू शकता. सिमला मिरचीचे रोप जरी सदाहरित असले तरी एप्रिल महिन्यात झाडाची वाढ चांगली होते असे म्हणतात. सिमला मिरचीचे झाड लावणे फार कठीण नाही, आपण ते बियांच्या मदतीने सहजपणे लावू शकतो. एप्रिलमध्ये तुम्ही त्याचे बियाणे पेरू शकता. कंटेनरमध्ये तीन बिया पेराव्यात आणि सर्वात कमकुवत झाड काढून टाकले पाहिजे. 

Vegetable Gardening In Summer
Vegetable Gardening In Summer

कांदापात 

जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाण्याची आणि वाढवण्याची आवड असेल तर तुम्ही या हंगामात तुमच्या बागेत हिरवा कांदा म्हणजेच कांदापात लावू शकता. या हंगामात कांदा पिकवणे चांगले मानले जाते कारण झाडाची वाढ चांगली होते. हिरवा कांदा पिकवणेही खूप सोपे आहे, तुम्ही तो फक्त मातीतच लावू शकत नाही तर फक्त पाण्यातही वाढवू शकता. तुम्ही माती किंवा पाण्याच्या मदतीने भांड्यात, प्लास्टिकच्या बाटलीतही हिरवा कांदा वाढवू शकता.

ADVERTISEMENT
Vegetable Gardening In Summer
Vegetable Gardening In Summer

बीटरूट 

बीटरूट ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. तुम्ही तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीतही बीटरूट कोणत्याही हंगामात लावू शकता, परंतु प्रत्येक हंगामात रोपाची वाढ चांगली होईलच असे सांगता येत नाही. पण मार्च आणि एप्रिल महिन्यात बीटरूट पेरणे उत्तम मानले जाते. बीटरूट सहजपणे घरामध्ये बाल्कनीत किंवा बाहेर अंगणात वाढू शकते. बीट क्लस्टर्स एक इंच खोल आणि एकमेकांपासून तीन इंच अंतरावर पेरावे जेणे करून त्यांची वाढ चांगली होईल. बीटरूटसह तुम्ही या महिन्यात तुमच्या बागेत मुळा देखील लावू शकता. 

Vegetable Gardening In Summer
Vegetable Gardening In Summer

मका 

तुम्ही तुमच्या बागेत मक्याचे  रोप सहज लावू शकता. मक्याचे झाड लावणे आणि ते वाढणे फारच कठीण आहे असा अनेकांचा समज आहे, परंतु असे नाही कारण मक्याचे झाड आपण कंटेनर किंवा कुंडीतही सहजपणे लावू शकतो. हे झाड लावण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश, कमी हवा आणि माती ओलसर ठेवण्याची क्षमता असलेल्या जागेची आवश्यकता आहे. हे झाड लावण्यासाठी तुम्हाला बियाणे, माती, कंपोस्ट आणि योग्य कंटेनर लागेल . 

या भाज्या लावण्यासाठी एका भांड्यात 50% कोको-पीट आणि 50% गांडूळ खत किंवा शेणखत घ्या आणि दोन्ही चांगले मिसळा. नंतर ते कुंडीत भरा आणि नंतर त्यात भाज्यांच्या बिया लावा व योग्य प्रमाणात पाणी घाला. याप्रकारे तुम्ही उन्हाळ्यातही भाज्या लावू शकता. 

Photo Credit – unsplash, istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

13 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT