ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सनी देओल आणि पूजा भट चोविस वर्षांनी येणार एकत्र

सनी देओल आणि पूजा भट चोविस वर्षांनी येणार एकत्र

अभिनेता सनी देओल अनेक वर्षांपासून बॉलीवूड चित्रपटांपासून दूर गेला आहे. ज्यामुळे सनीचे चाहते त्यांच्या कमबॅकची आतूरतने वाट पाहत आहेत 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘यमला पगला दिवाना’ मध्ये सनी देओल शेवटचा झळकला होता. त्यानंतर मागच्या वर्षी त्याने त्याच्या मुलाला करण देओलला ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून सर्वासमोर आणलं. स्वतः मात्र या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली,  सनीने आता त्याचा कमबॅक मनावर घेत चीनी कम फेम आर बाल्कीला आगामी चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. दिग्दर्शक बालाकृष्णन म्हणजेच आर बाल्की सध्या एका नव्या थ्रिलर चित्रपटाच्या तयारीत आहे. आर बाल्की पहिल्यांदाच अशा थ्रिलर प्रकारचा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओल, दुलकर सलमान, श्रेया धनवंतरी  आणि पूजा भट असणार आहेत. पहिल्यांदाच थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे आर बाल्कीला दिग्गज कलाकारांसोबतच हा चित्रपट करायचा होता. आता सनी आणि पूजाने होकार कळवल्यामुळे लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली जाणार आहे. 

चोविस वर्षानंतर सनी आणि पूजा एकत्र

सनी देओल प्रमाणेच पूजा भटदेखील बऱ्याच वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर होती. मात्र मागच्या वर्षी तिने भट बॅनरच्या  ‘सडक 2’ आणि ‘बॉम्बे बेगम’ या वेबसिरिजमधून कमबॅक केला आहे. त्यामुळे आता आर बाल्कीच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा  सनी आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला मिळेल. याआधी 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘अंगरक्षक’ आणि 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’मध्ये सनी आणि पूजाने एकत्र काम केले होते. आता या आगामी चित्रपटात तिसऱ्यांदा सनी आणि पूजा एकत्र येत आहेत. जवळ जवळ चोविस वर्षांनी या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

कसा असेल आर बाल्कीचा आगामी थ्रिलर

आर बाल्की त्याच्या आगामी थ्रिलर चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. त्याच्या मते सनी आणि पूजा त्याच्या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असतील. या दोघांचं चित्रपटात असणंच या चित्रपटाला यश मिळवून देईल. या कलाकारांचा स्क्रिन प्रेझेंस जबरदस्त आहे. शिवाय अनेक वर्षांनी पुन्हा सनी देओल या चित्रपटातून अभिनयाकडे वळत आहेत. ज्यामुळे चाहत्यांसाठी ही एक नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. बाल्कीच्या चित्रपटांच्या यादीत एक आणखी सुपरहिट चित्रपट त्यामुळे शामील होणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. 

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार भन्साळी यांचा ‘हीरामंडी’

ADVERTISEMENT

स्वातंत्र्यदिन विशेष’ – कर्मवीरमध्ये दिसणार सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी

एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका

12 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT