बोल्ड व्हिडिओ/ फोटो आणि विचित्र स्टेटमेंटसमुळे कायम चर्चेत असलेली पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने काहीच दिवसांपूर्वी सॅम बॉम्बेशी लग्न केले आणि अगदी काहीच दिवसात त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत तिने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. हनीमूनसाठी गेलेल्या या दोघांमध्ये असे काय झाले की, पूनम पांडेने थेट नवऱ्यावर लैंगिक शोषण, हाणामारीचे आरोप केले. गोवा पोलिसांत सॅम बॉम्बे विरोधात तक्रार केली आणि आता दोन दिवसांनी तिने तिचे सॅमसोबतचे रिलेशनशीपमध्ये आता व्यवस्थित झाल्याचे सांगितले. पण तिचे असे वागणे हे बिग बॉस14 साठी सुरु आहे का? अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरु झाली आहे.
बिग बॉस’ मराठीमधील टफ फाईट देणारी अभिनेत्री प्रेमात, सोशल मीडियावर केले असे जाहीर
12 दिवसातच लग्न मोडल्याचे केले नाटक
पूनम पांडेने लग्न केल्याच्या बातम्या ज्या दिवशी आल्या. त्याच दिवशी अनेकांना धक्का बसला होता. तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये कायम दिसणाऱ्या सॅम बॉम्बेशी ती अचानक लग्न अशा पद्धतीने लॉकडाऊनमध्ये करेल असे वाटले नव्हते. पण तिने लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. लग्नानंतर ती हनीमूनसाठी गोव्यामध्ये गेली होती. पण त्या दरम्यान सॅमने तिचे शोषण केले सांगत तिने गोवा पोलिसांत धाव घेतली. सॅमवर तिने मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. तिने एक भलीमोठी पोस्टही या संदर्भात टाकली होती. जी नंतर तिने काढून टाकली. अगदी 12 दिवसातच तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला असताना आता सॅम आणि तिच्यामध्ये सगळं काही आलबेल असल्याचे तिनो सांगितले आहे. पण आता एवढा मोठा तमाशा कशासाठी ? असा प्रश्न देखील पडू लागला.
बिग बॉससाठी घातला घाट
हिंदीतली सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉस 14 आता लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये कोण असणार याची जोरदार चर्चा सध्या होत आहे. यामध्ये पूनम पांडेचे नाव देखील जोडले गेले आहे. पूनम पांडे हे सगळे बिग बॉसमध्ये जाण्यासाठी करत असल्याचा दावा अनेकांनी केला. पण प्रत्यक्षात पूनमची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी तिने दिलेले उत्तर अधिक धक्कादायक होते. ती म्हणाली, मी बिग बॉसमध्ये अजिबात जात नाही. बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मी अजूनही लहान आहे. त्यामुळे ही अफवा आहे. यात काही तथ्य नाही
फिगर पेक्षा टॅलेंट महत्वाचं, वजनदार डान्सिंग क्वीन्सच्या नृत्यकलेचा प्रवास
पूनम पांडे आणि तमाशा
पूनम पांडे कॉन्ट्राव्हर्सी क्विन म्हणूनच कायम ओळखली जाते. तिचे बोल्ड व्हिडिओ आणि तिच्या अदा अनेकांना सोशल मीडियावर घायाळ करत असतात. तिच्या न्यूड व्हिडिओजचे अनेक फॅन्स आहेत.तिच्या याच व्हिडिओमुळे ती कायम चर्चेत असते. सॅम बॉम्बेशी लग्न केल्यानंतर गोव्यात हनीमूनसाठी गेलेल्या पूनमने तेथील काही ग्लॅमरस फोटोही शेअर केले होते. पण अचानक त्यांच्यात बिघडले आणि बिघडलेले पुन्हा नीट झाले, हे मात्र लोकांना अद्याप कळलेले नाही.
आता पूनमने कितीही नकार दिला तरीही तिची ही तयारी फक्त बिग बॉससाठी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे