POPxo कोणाला माहीत नाही. 2018 मध्येच POPxo ने सहा भाषांमध्येदेखील आपलं पाऊल टाकलं असून या सहा भाषांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच POPxo ने पाच वर्ष पूर्ण केली आहेत. वास्तविक हा यशाचा एक टप्पा आहे आणि आता अजून अनेक टप्पे तुमच्या सहाय्याने पूर्ण करत यश गाठायचं आहे हे मात्र नक्की. पण अर्थात हे यश मिळतं ते सर्वांच्या प्रयत्नाने आणि एकत्र काम केल्याने आणि एका टीममुळे. त्यामुळे यावेळी आम्ही इतर स्टोरीजसह तुमच्याशी आमच्या ऑफिसमधले काही क्षणदेखील शेअर करत आहोत आणि त्याशिवाय मागच्या वर्षी आम्ही केलेल्या स्टोरींपैकी TOP 5 स्टोरीज आणि व्हिडिओजदेखील आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. लवकरच आमच्या इतर भाषांमधील व्हिडिओजदेखील तुम्ही बघू शकणार आहात. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगली माहिती पोहचवणं हाच आमचा उद्देश आहे.
2014 मध्ये जेव्हा POPxo सुरु झालं तेव्हा केवळ पाच माणसं काम करत होती. दिल्लीतील लहानसं गाव हौझ खास इथे हे ऑफिस सुरु झालं. पाच वर्षांनंतर आता आमचं 180 माणसांचं मोठं कुटुंब झालं आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी मोठ्या ऑफिसमधून POPxo चं काम होतं. चला तर बघूया मग मागच्या वर्षात आम्हाला किती आणि कसं यश मिळालं आहे.
2018 मध्ये सर्वात जास्त वाचल्या गेलेल्या स्टोरीज
1. Shame, Shame, Shame! Kasautii Zindagii Kay Delivers The Most Sexist Episode Of This Season
कसौटी जिंगदी की या मालिकाने गेल्या दोन महिन्यामध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे आणि त्यामुळेच यावर आम्ही स्टोरी लिहायचं ठरवलं. खरं तर आम्हालादेखील ही मालिका अगदी मनापासून आवडली कारण यावर लिहिण्यासारखं बरंच काही होतं.
2. #DeepVeerKiShaadi: EVERYTHING You Need To Know About Deepika’s Bridal Looks!
तुम्हाला अर्थातच टायटलवरून स्टोरी काय आहे लक्षात आलंच. दीपिका तिच्या लग्नात अप्रतिम दिसत होती. सब्यासाचीने डिझाईन केलेला लेहंगा हा दीपिकाच्या लग्नातील सर्वात मोठा चर्चेचा विषय होता. त्याहीपेक्षा चर्चा होती ती तिच्या दुपट्ट्यावर लिहिण्यात आलेल्या संदेशाची. याचं महत्त्व ओळखून आम्ही यावर स्टोरी केली.
3. Dear Bride, 13 Super Cool Things Sonam Kapoor Did At Her Wedding That You Should Too!
#SonamKiShaadi अर्थात मागच्या वर्षाची सुरुवातच झाली ती सोनम कपूरच्या लग्नाने. बॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि अप्रतिम लग्न होतं. शिवाय या लग्नात बॉलीवूडची ग्लॅमडॉल कशी दिसणार याचीही सर्वांना उत्सुकता होती. त्यामुळेच आम्हाला सोनम कपूर आहुजासारखं दिसायचं असल्यास, तुम्ही काय करायला हवं ही स्टोरी करावी वाटली आणि तुम्हीदेखील अगदी ती आवडीने वाचलीत.
4. #WomensDay: 84 Ways To Remind Yourself That You Are BEAUTIFUL!
वूमन्स डे अर्थात महिला दिन. POPxo वर्षभर हा दिवस साजरा करत असतं हे तर तुम्हाला आमच्या स्टोरीवरून लक्षात येत असेलच. पण हा दिवस महिलांसाठी स्पेशल असतो त्यामुळेच आम्ही तुम्हाला तुमची खासियत जाणवून देण्यासाठी केली होती स्टोरी.
5. Dear ‘The Cut’, Did You Really Just Call Nick Priyanka’s ‘Forever Bitch’?
जेव्हा ‘द कट’ ने प्रियांका आणि निक जोनासबद्दल स्टोरी लिहिली तेव्हा त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला आणि त्यानुसार ही स्टोरी लिहिली आणि तुम्ही सर्वांनी ती वाचून आम्हाला आम्ही योग्य केलं याची जाणीव करून दिलीत.
आमचे व्हायरल झालेले व्हिडिओज
1. Types Of People In An Elevator (लिफ्टमध्ये भेटणारे वेगवेगळे लोक)
असे लोक लिफ्टमध्ये तुम्हाला सापडले तर तुम्ही काय करणार?
2. Types Of Golgappa Eaters (पाणीपुरी खाणारे वेगवेगळे लोक)
अगदी ‘मिस पॉश’पासून ते ‘स्पाईसी लव्हर’ या सगळ्या प्रकारची पाणीपुरी खाणारी माणसं आपल्याला माहीत असतात. या व्हिडिओमधून शोधा की, तुम्ही नक्की कसे आहात?
3. Quick And Easy Hairstyles For Oily Hair (तेलकट केसांसाठी अगदी सोप्या हेअरस्टाईल्स)
तुमचे केस अजिबात तुम्हाला आवडत नसतील आणि तुमच्या केसांचं काहीच होत नसेल तर या हेअरस्टाईल्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. नक्की करून बघा.
4. Annoying Things Girls With Big Boobs Will Totally Get (मुलींचे स्तन मोठे असल्यास, काय होते त्यांची अवस्था)
मोठे स्तन असणाऱ्या मुलींना कधीही अशा प्रकारे बोलू नये.
5. Thoughts Every Girl Has While Getting A Bikini Wax (बिकिनी वॅक्स करत असताना प्रत्येक मुलीच्या मनात येतात कोणते विचार)
हा व्हिडिओ बघताना तुम्ही तुमचे इअरफोन घालायला विसरू नका.
इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे मीम्स
1. आयुष्यात कायम होणारा ट्रोल
2. देवा नक्की काहीतरी चमत्कार घडव रे बाबा!
3. आयुष्यभराचा भुकेला
4. ग्लूटन ऑफ द ईअर
5. प्रत्येक स्त्री चं सिक्रेट शस्त्र
POPxo आता सहा भाषांमध्ये उपलब्ध
इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये महिन्याला आमचे 39 लाख वर्गणीदार सर्व प्लॅटफॉर्मवर अर्थात सोशल मीडिया चॅनेल्सवर वाढत आहेत. त्यामुळे आम्ही 2018 मध्ये एकाच वेळी चार नव्या भाषांमध्ये उडी घ्यायची ठरवली आणि त्या भाषा आहेत – मराठी, बंगाली, तामिळ आणि तेलुगू.
यामागचा खरा विचार हाच की POPxo च्या प्रेक्षकांनी तुमची बोली बोलावी.
मोठं सरप्राईज…
आतापर्यंत एक सिक्रेट होतं. पण आता आम्ही तुम्हाला एक मोठं सरप्राईज सांगणार आहोत (खरं तर दोन मोठ्या गोष्टी). खरं तर आमच्याही पोटामध्ये ही गोष्ट राहात नाहीये. पण तरीही थोडीशी वाट बघा…हे सरप्राईज आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
तुम्ही जर अजूनही आमची साईट फॉलो करत नसाल तर प्लीज आम्हाला फॉलो करा आणि डाऊनलोड करा POPxo अॅप Android आणि iOS वर आताच्या आता.
POPxo आता सहा भाषांमध्ये उपलब्ध: English, Hindi, Tamil, Telugu, Marathi आणि Bangla.