ADVERTISEMENT
home / मेकअप
POPxo चे आयशॅडो पॅलेट

तुमच्या व्हॅकेशनचे फोटो येतील परफेक्ट जर तुमच्याकडे असेल हे Eyeshadow Palette

प्रवासात सुंदर फोटो काढायचे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगले कपडे आणि चांगला मेकअप हा महत्वाचा असतो. मेकअपचे साहित्य निवडताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण कोणतेही मेकअप प्रॉडक्ट सगळ्याच कपड्यांवर किंवा सगळ्या लुकवर जातील असे होत नाही. लिपस्टिकचे शेड निवडणे, आयलायनर निवडणे, आयशॅडो पॅलेट निवडणे या सगळ्या गोष्टी निवडताना  नुसताच प्रवास नाही तर डेटिंग, सणोत्सव, पार्टी या सगळ्याचा विचार करावा लागतो. सध्याच्या ट्रेंडनुसार तुम्हाला डोळ्यांचा मेकअप हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. या ट्रेंडनुसार तुम्हाला जर एक परफेक्ट Eyeshadow Palette पॅलेट हवे असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक परफेक्ट पॅलेट शोधून काढले आहे. जे पॅलेट तुमच्या कोणत्याही कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट आहे. 

 आज मी तुमच्यासाठी शोधून काढले आहे असे आयशॅडो पॅलेट ज्याची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. हे पॅलेट आहे POPxo चे Squad goals palette पॅलेट. तुमच्या मोबाईलच्या आकाराहूनही लहान असलेले पॅलेट सध्याच्या ट्रेंडी रंगाचे आहे. तुमच्या कोणत्याही इव्हेंटसाठी तुम्हाला हे पॅलेट वापरता येईल. शिवाय याचे पॅकिंग इतके सुंदर आणि कमीत कमी जागेत बसणारे आहे की, ते तुम्हाला अगदी कुठेही घेऊन जाता येईल असे आहे. 
विश्वास ठेवा, तुम्हाला मेकअप आवडत असेल तर Squad goals palette  परफेक्ट आहे

विश्वास ठेवा, तुम्हाला मेकअप आवडत असेल तर Squad goals palette  परफेक्ट आहे

हे काय आहे?


सध्या कोणत्याही मेकअप प्रॉडक्ट असलेल्या दुकानांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती  POPxo  च्या Squad goals paletteची. या पॅलेटमध्ये 12 वेगवेगळे शेड्स आहेत. ज्यामध्ये न्युट्रल शेड्स आणि तुमच्या पार्टीला ग्लॅम आणणारे पॉप असे शेड्स आहेत.  त्यामुळे तुम्हाला स्मोकी आईजपासून ते  वॉश निऑन पिंक  असा कोणताही ट्रेंड फॉलो करण्यासाठी हे पॅलेट उत्तम आहे. इतक्या कमी पैशात मिळणारे हे पॅलेट असून तुम्ही ते अजून तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये घातले नसेल तर तुम्ही आताच ते खरेदी करायला हवे असे आहे.

ADVERTISEMENT

हे आम्हाला का आवडले?

12 वेगवेगळे शेड्स आणि तेही फक्त रुपये 449/- मध्ये ऐकून धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण हे खरे आहे. तुम्हाला इतक्या कमी किंमतीत हे पॅलेट मिळत आहे. कोणत्याही आयशॅडो पॅलेटकडून हीच अपेक्षा असते की, कोणत्याही कार्यक्रमासाठी एकच पॅलेट कामी यावे आणि  आयशॅडो जास्ती जास्त काळासाठी टिकावा. या पॅलेटमध्ये असलेले रंग, त्यामधील शिमर आणि शाईन तुमच्या आयमेकअपला उठाव आणते. यामध्ये वापरण्यात आलेले घटक इतके स्मुथ आहेत की ते खडूप्रमाणे दिसत नाही. तर डोळ्यावर चांगले पसरते आणि लुक क्रिएट करण्यास मदत करते. 

त्यामुळे खरंच विश्वास ठेवा आणि डोळे बंद करुन हे पॅलेट खरेदी करु शकता. 

रेटिंग्ज

रंग  : 9/ 10 
पॅकिंग :9/ 10
फॉर्म्युला :9/ 10

असा करा वापर?

तुम्हाला एव्हरी डे लुक करायचा असेल तर तुम्ही एक फ्लफी ब्रश किंवा आयशॅडो ब्रश घेऊन तुमचा आवडीचा रंग घ्या. डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूने सुरुवात करुन तुम्ही तो लावायला घ्या.तुम्हाला थोडा प्रयोग करायचा असेल तर तुम्ही एक  डोम्ड आकाराचा ब्लेंडीग ब्रश घेऊन दुसरा रंग निवडा आणि तुमच्या क्रिसलाईनवर लावा. याशिवाय  क्रिस लाईन ब्रश, फ्लॅट शेडर ब्रश, अँगल्ड ब्रश आणि स्मज ब्रश वापरुन मस्त लुक तयार करु शकता. 

ADVERTISEMENT

 असे दिसते हे पॅलेट

हे  आहे तुमचे कार्ट हे पॅलेट खरेदी करण्यासाठी त्यामुळे लगेच क्लिक करा आणि प्रॉडक्ट खरेदी करा

05 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT