ADVERTISEMENT
home / Uncategorized
popxo review

#POPxoReviews: ड्रामाक्वीन लुकसाठी या पॅलेटने करा ग्लॅमरस स्मोकी आईज

जेव्हा मी माझ्या आय मेकअपचा लुक ठरवते, तेव्हा थोडं ट्राय अॅंड टेस्टेड कॉम्बिनेशन करत आकर्षक आयशॅडोचे रंग वापरून मेकअप करण्यासारखी दुसरी मजा नाही. मॅटेलिकमध्ये विविध शेड्स असतात ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेकअप करू शकता. मग तुम्हाला एखादा कॅज्युअल ग्लॅम लुक करायचा असो वा एखादा बोल्ड लुक… न्यूड शेड्सनी तर तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या आय मेकअप लुकचा बेस करू शकता. जर तुम्ही त्याला काळ्या आयशॅडोची जोड दिली तर त्याहून आकर्षक दुसरं काहीच नाही. त्यामुळे असं विविध रंगाचं एखादं कॉम्पॅक्ट आयशॅडो पॅलेट आपल्या जवळ ज्यात या सर्व शेड्स असतील ही आज काळाची गरज झाली आहे. फायनली जेव्हा तुमच्या हातात असं मेकअप किट येतं तेव्हा तुम्ही या पॅलेटशिवाय घरातून बाहेर जाऊच नाही. आपली हिच इच्छा पूर्ण करण्यासाठी POPxo ने परफेक्ट आय शॅडो पॅलेट्स बनवले आहेत, जे नुकतेच लॉंच करण्यात आलेले आहेत. 

POPxo ने संपूर्ण नव्या मेकअपचं कलेक्शन ग्राहकांसाठी सादर केलं आहे. ज्यात आहे हे आकर्षक कॉम्पॅक्ट आयशॅडोचे किट… याच उत्सुकतेपोटी मी देखील यातील ड्रामा क्वीनचं चार शेड असलेले POPxo आयशॅडो पॅलेट घेतले . सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की हे इतके भारी आय पॅलेट आहे. ज्यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही आकर्षक स्मोकी आईज लुक करू शकता.

काय आहे हे ?

या मेकअप किटमध्ये आहेत चार प्रकारचे आकर्षक आयशॅडो शेड्स, POPxo ड्रामा क्वीनचे चारही आयशॅडो शेड वापरून तुम्ही तुमचे स्मोकी आईज करू शकता. या किटमध्ये आहेत तीन प्रकारच्या मॅट आयशॅडो. ज्यात ब्राऊन, डार्क ब्राऊन आणि काळ्या रंगाची शेड आहे. शिवाय शिमर लुकसाठी एक मॅटॅलिक गोल्ड शेडही आहे.

आम्हाला हे आयशॅडो पॅलेट का आवडले

कारण यात आहेत ट्रॅव्हल फ्रेंडली पॅलेटसोबत गरजेच्या आयशॅडो शेड्स, ज्याला पटकन तयार व्हायला आवडतं अशा प्रत्येकासाठी हे परफेक्ट आहे. यातील प्रत्येक शेड हायली पिंगमेंटेडेट आणि लॉंग लास्टिंग आहे. शिवाय यात तुम्हाला जबरदस्त रंगछटा मिळतात. व्हिटॅमिन ईने युक्त, क्रुअल्टी फ्री आयशॅडोचं हे पॅलेट वापरण्यास सोप्पं आणि सहज ब्लेंड होणारं आहे.

ADVERTISEMENT

रेटिंग 

रंगछटा – 10/10

पॅकेजिंग – 10/10

फॉर्म्युला – 10/10

कसे वापराल 

मेकअपसाठी पापण्या तयार केल्यानंतर, तुमचा आयशॅडो ब्रश घ्या आणि मेकअपला सुरूवात करा. बेस तयार करण्यासाठी संपूर्ण पापणीवर न्यूट्रल आयशॅडो लावा. डोळ्यांच्या कोपऱ्यावर मॅट ब्राऊन शेडने कौन्टोर करा. पापणीच्या कडेला काळी आयशॅडो ब्लेंड करत लुक परफेक्ट करा. तुम्ही याचा वापर पिंगमेंटेड आयलायनर प्रमाणे करू शकता.मॅटेलिक शिमर शेडने तुमच्या डोळ्याच्या आतील कोपरा हायलाईट करा. वास्तविक तुम्ही यातील सर्व शेड पापणीवर निरनिराळ्या ठिकाणी वापरून मेकअपचे काही प्रयोग देखील करू शकता. कारण या किटमुळे तुमचा प्रयोग फसण्याची शक्यता फारच कमी  आहे.

ADVERTISEMENT

हे उत्पादन कसं दिसतं

जर तुम्ही या स्मोकी आईजच्या प्रेमात पडला असाल तर लगेच कार्टमध्ये हे आयशॅडो किट जमा करा.

फिटर इमेज – Eden Norohna

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT