प्रभास आणि दीपिका पदुकोण या आठवड्यात त्यांचा आगामी चित्रपट प्रोजेक्ट के या चित्रपटाचे दुसऱ्या शेड्यूलसाठीचे चित्रीकरण पुन्हा सुरू करणार आहेत. या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सध्या सुरू आहे. आता हे चित्रीकरण हैद्राबादमध्ये केले जाणार आहे. या शेड्युलमध्ये प्रभास व दीपिकाच्या मुख्य सीक्वेन्सचे शूटिंग पूर्ण होईल असा अंदाज आहे. महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात असल्याची चर्चा आहे.
रामोजी फिल्म सिटीमध्ये उभा केला जातोय भव्य सेट
नाग अश्विनच्या या प्रोजेक्ट के चित्रपटासाठी, प्रभासने तब्बल 200 दिवसांच्या डेट्स दिल्या आहेत. यात दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत आहेत. प्रोजेक्ट के चित्रपट वैजयंती मुव्हीज द्वारे निर्माण केला जातो आहे. चित्रपटाच्या निर्मात्या सी. अश्विनी दत्त आहेत तर सहनिर्मात्या स्वप्ना आणि प्रियांका दत्त आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. या चित्रपटाचे आधीचे शूटिंगही हैद्राबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले आहे. या चित्रपटासाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये खास नवा सेट उभा करण्यात आला आहे. हा आजपर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले जाते आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभास आणि दीपिकावर चित्रित केलेल्या शॉटचा व्हिडिओ बाइट जारी केला होता. व्हिडिओमध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोण धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.
अधिक वाचा – कपिल शर्मावर नाराज आहे अक्षय कुमार, कपिल शर्मा शोममध्ये येण्यास दिला नकार
प्रोजेक्ट के हा सायन्स फिक्शन चित्रपट
प्रोजेक्ट के हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असेल. नाग अश्विन यांची ही अशा प्रकारची पहिलीच कथा आहे. या चित्रपटासाठी भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात मोठ्या नावांपैकी प्रभास, दीपिका व अमिताभ बच्चन हे एकत्र आले आहेत. चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी ही खरोखरच दुर्मिळ संधी आहे. 2018 साली वैजयंती मूव्हीजद्वारे महानती हा चित्रपट निर्मित झाला होता. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या दिग्गज अभिनेत्री सावित्री यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील नाग अश्विन यांनीच केले होते. यानंतर प्रोजेक्ट के हे वैजयंती मुव्हीजच्या निर्मात्या आणि संस्थापक अश्विनी दत्त यांनी बघितलेले एक मोठे स्वप्न आहे.
अधिक वाचा – आईच्या मांडीवर स्वर्गाची अनुभूती, सलमान खान झाला भावुक
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शूटिंग सुरु होणार
अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण ही नावे आज भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या नावांमध्ये गणली जातात. त्यामुळे ही ड्रीम कास्ट असलेला आणि सिने विझार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाग अश्विन यांच्या नेतृत्वाखाली,हा भव्यदिव्य चित्रपट तयार होतोय. असा चित्रपट यापूर्वी कधीही आलेला नाही हा अंदाज आपल्याला प्रोजेक्ट के चे ट्रेलर बघून लगेच येतो. प्रोजेक्ट के चे आगामी शूटिंग शेड्युल फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हैदराबादमध्ये सुरू होईल. प्रभास आणि दीपिका पदुकोण या शेड्यूलमध्ये भाग घेणार आहेत. हे शेड्युल मोठे असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. काही काळापूर्वी दीपिका पहिल्या शूटिंग शेड्युलसाठी हैद्राबादला गेली होती आणि ते शेड्युल झटपट पूर्ण झाले होते.
अमिताभ बच्चन यांची यात महत्वपूर्ण भूमिका असली तरीही ते या चित्रपटासाठी कधी शूटिंग सुरु करणार आहेत याची माहिती अजून तरी उघड झालेली नाही. शूटिंगच्या पुढील शेड्युलमध्ये ते टीमला सामील होतील असा अंदाज आहे. एक अत्यंत भव्य-दिव्य साय-फाय प्रोजेक्ट असलेल्या या चित्रपटात दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी दर्शकांच्या मनात खूप उत्सुकता आहे.
फोटो सौजन्य -अभिनेता प्रभास यांचे इंस्टाग्राम प्रोफाइल व इतर वेबसाईट्स
अधिक वाचा – गायिका आर्या आंबेकरने यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ची घेतली जबाबदारी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक