ADVERTISEMENT
home / आरोग्य
pre-menopause-weight-loss-remedy

मेनोपॉजमुळे होतात समस्या, वेळीच कमी करा वजन

महिलांना साधारण 45 व्या वर्षानंतर शरीरामध्ये अनेक बदल जाणवू लागतात. विशेषतः सर्वात मोठा बदल होतो तो म्हणजे मेनोपॉजचा. मेनोपॉज महिलांच्या आयुष्यातील एक असा चरणा आहे, जिथे पोहचल्यानंतर महिलांना मासिक पाळी येणे बंद होते. यादरम्यान शरीरामध्ये अनेक हार्मोन्सचे बदल घडून येत असतात. मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर मुरूमं येणे हे तर अत्यंत कॉमन आहे. या बदलांमुळे त्वचा आणि केसांवरही परिणाम होतो इतकंच नाही तर तुमच्या हाडांवरही मेनोपॉजचा परिणाम होतो. तर दुसऱ्या बाजूला महिलांचे मेटाबॉलिजम बिघडते. ज्यामुळे वजन वाढण्याची अथवा वजन कमी होण्याची शक्यता असते. अधिक प्रमाणात महिलांना मेनोपॉजदरम्यान वजन वाढण्याची समस्या जाणवते. या दरम्यान साधारण 15-20 किलो वजन वाढण्याचीही शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूपच कठीण आहे. पण तुम्ही मेनोपॉज येण्याच्या दरम्यान आपल्या डाएटमध्ये बदल करून वजन नियंत्रणात आणू शकता. अगदी पहिल्यापासून आपण याची काळजी घेतली तर हे वजन नियंत्रणात राहणे शक्य होते. याबाबत नक्की काय करायला हवे ते जाणून घ्या. 

काय करावा उपाय 

मेनोपॉजच्या (Menopause) आधी तुम्ही काही गोष्टी केल्यात अथवा नियमित आचरणात आणल्यात तर तुम्हाला वजनावर नियंत्रण करण्यात यश मिळते. अधिक वजन असल्यास, तुम्ही साधारण 50 व्या वर्षात आल्यानंतरच तुम्हाला गुडघेदुखी अथवा अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही लहान लहान प्रयत्न करून तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांशिवाय चांगला उपाय असूच शकत नाही.  

प्रि – मेनोपॉज वजन घटविण्यासाठी वापरा रेसिपी 

साहित्य 

  • 2-3 मोठे चमचे सुकलेल्या पपयाची पावडर
  • 4-5 लहान चमचे भाजलेली जिरे पावडर
  • 2 लहान चमचे लहान वेलची 
  • ½ लहान चमचा वाटलेली लवंग पावडर
  • 4-5 लहान चमचे हळद पावडर 

कसा करावा उपयोग 

ADVERTISEMENT
  • वर देण्यात आलेले सर्व साहित्य मिक्स करा आणि पावडर तयार करा. ही पावडर एका एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवा 
  • रोज सकाळी नाश्ता केल्यानंतर, दुपारी जेवल्यावर आणि रात्री जेवल्यावर एक लहान चमचा ही पावडर घ्या आणि पाण्यात मिक्स करून प्या 

काय आहेत फायदे 

  • वजन कमी करण्यासह प्री – मेनोपॉज वेटलॉस पावडरचे नियमित सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला नैराश्याचा त्रास असेल तर तुम्ही या पावडरच्या सेवनामुळे नक्कीच चांगला फरक स्वतःमध्ये करून घेऊ  शकता
  • तुम्हाला रात्री झोप येत नसेल तरीही तुम्ही या पावडरचे सेवन करा 
  • हीट फ्लॅशेस आणि पायाच्या तळव्यावर जळजळ समस्या असेल तर तुम्ही या पावडरचे सेवन करावे 

अन्य टिप्स – 

  • रोज सकाळी अर्धा लहान चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून ते पाणी प्या. असं केल्यामुळे शरीरातील असणारी घाण फ्लशआऊट होते. यामुळे तुमचा मेटाबॉलिज्म रेटही वाढतो 
  • साय आलेल्या दुधामध्ये पाणी मिक्स करून त्याचे सेवन करा. असं केल्याने कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते आणि शरीरात चरबी जमून येत नाही
  • सकाळी नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि प्या. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसंच मेटाबॉलिज्म रेट चांगला राहातो. 

तुम्हाला मेनोपॉजमुळे काही समस्या उद्भवत असतील आणि वजन वाढत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. तुमच्या आई अथवा आजूबाजूला कोणालाही या समस्येने वेढले असेल तर त्यांना नक्की हे सुचवा. तसंच याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांनाही एकदा विचारून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT