ADVERTISEMENT
home / पालकत्व
योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत

योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत

स्त्रियांच्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमता देखील बदलत असते. उशीराने होणारी गर्भधारणा ही धोकादायक ठरत असून योग्य वेळी गर्भधारणा करणे फायदेशीर ठरत आहे. वाढत्या वयातील गर्धारणेकरिता तसेच मातृत्वाचा आनंद घेण्याकरिता अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. एखाद्या महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतेचा विचार केल्यास तसेच जीवशास्त्रीयदृष्ट्या स्त्रीसाठी गर्भवती होण्याचे योग्य वय 20 ते 30 वर्षे वयोगट. वाढत्या वयानुसार स्त्रियांमधील प्रजनन क्षमता देखील कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. 45 पर्यंत, प्रजनन क्षमता इतकी कमी झाली आहे की नैसर्गिकरित्या गर्भवती होणे स्त्री साठी कठीण होते. आर्थिक अस्थिरता, करिअरच्या दृष्टीने घेतलेली झेप, उशीरा लग्न किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे स्त्रियांनी गरोदरपणात उशीर केल्यामुळे वंधत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. हे घटक एखाद्याच्या गर्भधारणेमध्ये प्रजनन क्षमता वाढविण्यास उशीर करतात. यासंदर्भात आम्ही तज्ज्ञांचे मत घेतले.

गरोदरपणात फॉलो करा सोप्या ब्युटी टिप्स, दिसा सुंदर
 

उशीरा गर्भधारणा होणे अवघड

उशीरा गर्भधारणा होणे अवघड

Freepik

ADVERTISEMENT

पुण्याच्या मदरहुड हॉस्पिटल येथील वरिष्ठ सल्लागार, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. महिलांमधील अंड्याचे प्रमाण जन्मजातच मर्यादित असते. आईच्या गर्भातील स्त्री भ्रूणामध्ये १ दशलक्ष अंडी असतात व बाळाचा जन्म होईपर्यंत केवळ ४०० ते ५०० उपयुक्त अंडी उरतात. ऋतूप्राप्तीनंतर दर महिन्याला एक किंवा दोन अंडी गर्भाशयात सोडली जातात. स्त्रीची मेनोपॉजची स्थिती येईपर्यंत गर्भाशयातील अंड्यांची संख्या कमी कमी होत जाते. काही वेळा स्त्रीची पाळी नियमित येते परंतु तिच्यातील अंड्यांचा साठा पूर्णपणे संपलेला असतो. विशीच्या अखेरीस किंवा तिशीच्या सुरुवातीला महिलांची प्रजनन क्षमता झपाट्याने घटू लागते. वय वाढ लागल्यावर तिच्यातील अंड्यांची गुणवत्ता देखील घटू लागते आणि ती पूर्वी इतक्या वारंवारपणे ओव्ह्युलेट होत नाही. उशीरा आई होताना अंड्यांमध्ये क्रोमासोमोल एबनॉर्मिलिटी (गुणसूत्रातील दोष ) असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते किंवा गरोदर असताना गर्भपात असण्याची भीती असते.  स्त्रिया जेव्हा 30 आणि 40 च्या दशकात प्रवेश करतात तेव्हा डाऊन सिंड्रोम सारख्या गुणसूत्र विकृतीचा धोका वाढतो कारण स्त्री जसजशी मोठी होते तसतसे अंडीही मोठी होतात. डॉ. पवार पुढे सांगतात याशिवाय वय वाढण्याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते आणि परिणामी कमी प्रजनन होईल किंवा जर गर्भधारणा झाली तर अशा परिस्थितीत गर्भधारणेची गुंतागुंत ही जास्त असते. 

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

अँटी मूल्यरियन हार्मोन चाचणी महत्वाची

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुण्याच्या फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या , जर तुम्ही सहा महिने ते एक वर्षभर गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही अँटी मूल्यरियन हार्मोन (एएमएच) चाचणी करुन घ्यावी. असे केल्याने, एखाद्या महिलेस गर्भधारणेची योजना केव्हा आणि कशी करावी याबद्दल कल्पना येईल. आधुनिक उपचार पध्दतीनुसार एग फ्रीझिंगचा पर्याय निवडून गर्भधारणा पुढे ढकलता येऊ शकते. तुमच्याही आजूबाजूला कोणाला आई व्हायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक स्त्री ला आई व्हायची इच्छा असते. पण सध्या करिअरच्या मागे धावता धावता वय वय निघून जाते. पण आई होणं अवघड असलं तरीही अशक्य नक्कीच नाहीत. 

गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT