करिना कपूर सध्या पाच महिन्यांची गरोदर आहे. मात्र ती तिच्या प्रोफेशनल लाईफबाबत खूपच गंभीर आहे. त्यामुळे पाचव्या महिन्यांची गरोदर असतानाही तिने लाल सिंह चड्ढाचं राहीलेलं शूटिंग नुकतंच पूर्ण केलं आहे. करिनाने स्वतः ही खुषखबर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे लवकरच आमिर आणि करिनाचा ‘लाल सिंह चड्ढा’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आमिर खानसोबत एका शेतात गप्पा मारत असलेला फोटो शेअर करत करिनाने ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोसोबत तिने एक खास मेसेजही दिला आहे. ज्यात तिने तिचा या चित्रपटाचा आव्हानात्मक प्रवास कसा होता हे सांगितलं आहे.
करिनाला या गोष्टींना जावं लागलं सामोरे –
करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आमिर खान आणि तिचा एक शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमधील गेट अपमध्येच आहे. आमिर करिनाला काहीतरी दाखवत आहे तर करिना त्याच्याकडे पाहत गप्पा मारत आहे असा हा फोटो आहे. या फोटोसोबत करिनाने लिहीलं आहे की, ” आज मी लाल सिंह चड्ढा या माझ्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं…खूप कठीण काळ होता… पॅनडेमिक, माझं गरोदर असणं, उदासिनता पण यातलं काहीच आमच्या चित्रपटात काम करण्याच्या पॅशनच्या आड येऊ शकलं नाही. आम्ही शूटिंग पूर्ण करताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे.” करिनाने या कॅप्शनमध्ये पुढे या प्रवासासाठी आमिर खान आणि अद्वैत चंदन ला धन्यवाद दिले आहेत. शिवाय तिने तिच्या टीमचेही आभार मानले आहेत. संपूर्ण शूटिंग क्रूचे आभार मानत तिने त्यांची खूप आठवण येईल असं ही शेअर केलं आहे. वास्तविक हा चित्रपट या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक झालेल्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे शूटिंग बंद करावं लागलं होतं. नोव्हेबर 2019 मध्ये आमिरने त्याचा फर्स्ट लुक शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करायला खूप वेळ लागला ज्यामुळे आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. कोरोनामुळे सर्व काळजी घेत आमिरने या चित्रपटाचं शेवटच्या भागांचं शूटिंग अमृतसर, चंदीगढ. कलकत्ता आणि हिमाचल प्रदेश येथे पूर्ण केलं . करिना आणि आमिरचं शेवटचं शूटिंग दिल्लीमध्ये करण्यात आलं. आता पोस्ट प्रॉडक्शन झाल्यावर लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होईल. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक असणार आहे.
करिना लवकरच होणार दुसऱ्यांदा आई
विशेष म्हणजे करिनाने तिला पाचवा महिना सुरू असतानाही स्वतःची काळजी घेत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ज्यावरून तिचं कामाबाबतचं प्रेम आणि प्रामाणिकपणा दिसून येतो. ऑगस्ट महिन्यात सैफच्या पन्नासाव्या वाढदिवशी सैफीनाने ते दोघं पुन्हा एकदा आई-बाबा होणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा करिनाच्या होणाऱ्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाकडे लागल्या आहेत. करिना आणि सैफचा पहिला मुलगा तैमूरचा लहान वयातच एक खास फॅन फॉलोव्हर आहे. त्यामुळे आता करिनाचं दुसरं होणारं बाळ कसं असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
आमिर खानची मुलगी चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये
रोहीत शेट्टीच्या या आगामी रिमेकमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत
साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सिझन, अहमचा असणार डबल रोल