ADVERTISEMENT
home / आरोग्य
pregnant rahanyasathi upay in marathi

गरोदर राहण्यासाठी उपाय, महत्त्वाची माहिती (Pregnant Rahanyasathi Upay In Marathi)

कोणत्याही महिलेसाठी गरोदर राहणे आणि बाळाला जन्म देणे या गोष्टी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. आजकालची बदलती लाईफस्टाईल आणि बदलते विचार असले तरीही बाळाला जन्म देणे आणि गरोदर राहणे या गोष्टी मात्र तितक्याशा बदलेल्या नाहीत. आजही आई होणे हे सर्वोच्च परमसुख समजण्यात येते. पण प्रत्येक महिलेचा गर्भारपणाचा अनुभव हा वेगळा असतो. प्रत्येक महिलेसाठी गरोदरपणाची लक्षणे, गरोदर आहोत की नाही समजून घेणे, गरोदरपणाच्या महिन्यात कशी काळजी घ्यायची या आजही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याआधी सध्याची लाईफस्टाईल पाहता अनेकांना गरोदर राहण्यासाठी उपाय (pregnant rahnyasathi upay) करावे लागतात. याविषयी आपण या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत. गरोदर राहण्यासाठी घरच्या घरी काय उपायस(pregnant rahanyasathi upay in marathi) करता येतील याविषयी जाणून घेऊया. 

नैसर्गिकरित्या गरोदर राहण्यासाठी उपाय मराठी (Naturally Pregnant Rahanyasathi Upay In Marathi)

pregnant rahanyasathi upay in marathi
pregnant rahanyasathi upay in marathi

कोणत्याही महिलेसाठी नैसर्गिकरित्या गरोदर राहणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आरोग्याच्या आणि अगदी बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील. पण नैसर्गिकरित्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपण घरगुती उपाय वापरू शकतो. गरोदर राहण्यासाठी काही नैसर्गिक उपाय (pregnancy rahnyasathi upay) आहेत त्याचीच माहिती घेऊ.  

1. तुळस (Tulsi)

tulsi
Tulsi

आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी आपल्याकडे तुळस वापरण्यात येते. तुळस ही वनस्पती नेहमीच फायदेशीर ठरते. पण तुम्हाला माहीत आहे का? नैसर्गिक गरोदरपणासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. महिलांमधील वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी तुळशीचा वापर करण्यात येतो. तुळशीची साधारण तीन ते चार पाने रोज तुम्ही चावून खावीत आणि त्यानंतर एक ग्लास दूध प्यावे. यामुळे तुमची गर्भधारणेची शक्यता वाढते असे आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. तसंच तुम्ही तुळशीच्या बिया खाल्ल्यास, प्रजननक्षमता वाढण्यासही मदत मिळते.  

2. डाळिंब (Pomegranate)

डाळिंबामध्ये व्हिटामिन सी आणि के चे प्रमाण अधिक असते आणि यातून अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फॉलेट आणि पोटॅशियम शरीराला मिळते. तसंच गरोदर राहण्यासाठी आवश्यक असणारा रक्तप्रवाह डाळिंबामुळे ओटीपोटाच्या दिशेने वाढतो. यामुळे महिलांची प्रजननक्षमता वाढून गर्भाशयाच्या भित्तीका जाड होण्यास मदत मिळते. त्यामुळे गरोदर राहिल्यास गर्भपाताचा (miscarriage) धोकाही टळतो. तुम्ही गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करत असाल तर डाळिंबाच्या झाडाची साल आणि बिया समप्रमाणात घेऊन त्याची पावडर करा आणि आठवडाभर रोज ही पावडर एक चमचा खा. यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या मदत मिळते. 

ADVERTISEMENT

3. खजूर (Khajur) 

khajur
dates

गर्भधारणेसाठी लागणारी सर्वात पोषक तत्वे खजूरमध्ये आढळतात. यामध्ये विटामिन बी, विटामिन के, फोलेट, पोटॅशियम, लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि इतरही तत्वे आहेत. त्यामुळे खजूर खाल्ल्याने गर्भधारणेसाठी मदत मिळते. गरोदर राहण्यासाठी उपाय करताना (pregnant rahanyasathi upay in marathi) तुम्ही खजूराचा नक्की वापर करा. साधारण 10-12 खजूर हे बी काढून मिक्सरमधून वाटून घ्या. ही पेस्ट तुम्ही गाईच्या दुधामध्ये मिक्स करा आणि ते दूध उकळून प्या. मासिक पाळी संपल्यानंतर एक आठवडा उलटला की, तुम्ही हा उपाय करा. यामुळे तुमची प्रजननक्षमता वाढण्यास मदत मिळते. गर्भधारणेत अडचणी येत असल्यास याचा वापर करा. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत.

4. माका (Maca)

महिला आणि पुरूषांची प्रजनन क्षमता वाढवायची असेल तर माका या वनस्पतीचा उपयोग करण्यात येतो. याची मुळे यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. यामध्ये विटामिन बी आणि सी, लोह आणि पोटॅशियमचा उत्तम भरणा असतो. माका रूटमुळे शुक्रजंतूंची संख्या (sperm count) आणि हालचाल वाढते. अनेक जणांना माका रूट पावडरची माहिती असेल. पण त्याचा उपयोग कसा करायचा याची माहिती नसते. तर गरम पाण्यात अथवा दुधामध्ये तुम्ही अर्धा चमचा माका रूट पावडर मिक्स करा आणि ते प्या. काही महिन्यांसाठी ही पावडर वापरा. गर्भधारणा झाल्यावर ही पावडर घेणे बंद करा. 

5. लसूण (Garlic)

garlic
pregnant rahnyasathi upay – Garlic

गरोदर राहण्यासाठी अजून एक घरगुती उत्तम उपाय म्हणजे लसूण खाणे. लसूण खाल्ल्यामुळे महिला आणि पुरूष या दोघांमधीलही प्रजननक्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळेच नेहमी सेक्स वाढविण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला देण्यात येतो. लसूण खाल्ल्याने स्पर्म्स अर्थात शुक्रजंतू आणि स्त्रीबीजातील गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते. तुम्ही 4-5 पाकळ्या लसूण सोलून घ्या आणि चाऊन खा. त्यानंतर एक ग्लास गरम दूध प्या. हे तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात करू शकता. यामुळे स्त्री च्या प्रजननक्षमतेमध्ये सुधारण होऊन गरोदर राहण्यास मदत होईल.  

6. दालचिनी (Cinnamon)

cinnamon

घरात आपल्या मसाल्यासाठी दालचिनी नेहमी आपण वापरतो. दालचिनीचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे महिलांमधील वंध्यत्व कमी करण्यास याची मदत मिळते. ज्या महिलांना पीसीओएससारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी दालिचिनीचा वापर करणे आवश्यक आहे. अन्नपदार्थात याचा वापर करतोच पण त्याशिवाय, एक कप पाण्यात दालचिनी पावडर घालून याचा चहा करून तुम्ही प्या. गर्भधारणा होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. 

ADVERTISEMENT

7. जायफळ (Nutmeg)

गरोदर राहण्याचे उपाय (pregnant rahnyasathi upay) करत असाल तर तुम्ही जायफळाचादेखील उपयोग करून घेऊ शकता. महिलांची प्रजननक्षमता वाढविण्यासाठी हा मसाल्यातील उपयुक्त पदार्थ आहे. जायफळ पावडर (पूड) आणि पिठी साखर तुम्ही समप्रमाणात एका वाटीत घ्या. एक कप गाईच्या दुधात हे दोन्ही मिक्स करा आणि तुमची मासिक पाळी चालू असेल तेव्हा हे दूध तुम्ही चार दिवस प्या. गर्भधारणा होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीत तुम्ही हा उपाय करू शकता. 

जाणून घेऊया गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या

8. लोणी आणि बडिशेप (Butter And Fennel)

कमी वजन असणाऱ्या आणि जास्त वजन असणाऱ्या महिलांना गरोदर राहण्यासाठी समस्या उद्धवतात. अशा महिलांना गरोदर राहण्यासाठी हा चांगला उपाय समजण्यात येतो. लोण्यामध्ये साधारण 5 ग्रॅम बडिशेप पावडर मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही तीन ते चार महिने नियमित खा. गरोदर राहण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल. गरोदर राहण्याची शक्यता यामुळे प्रभावीपणे वाढण्यास मदत मिळते. 

9. रॉक सॉल्ट (Rock Salt)

गरोदर राहण्याची शक्यता वाढावी यासाठी तुमच्या आहारात तुम्ही रॉक सॉल्टचा समावेश करून घ्या. यामध्ये असणारे कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम तुम्हाला गरोदर राहण्यासाठी फायदा करून देतात. साधारण पाऊण लीटर पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट तुम्ही मिक्स करा आणि सूर्योदयापूर्वी तुम्ही हे पाणी प्या. याचा तुम्ही फायदा मिळेल. 

ADVERTISEMENT

10. तुरटी (Alum)

गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर घरगुती उपयांमध्ये तुरटी हा अत्यंत चांगला उपाय आहे. तुमची पाळी नियमित आहे पण तरीही तुम्हाला गरोदर राहण्याची समस्या असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करून पाहा. कापसात अगदी छोटासा तुरटीचा तुकडा गुंडाळा आणि त्वचेला लागणार नाही अशा पद्धतीने रात्री गुंडाळून योनिमार्गामध्ये ठेवा. असे तोपर्यंत करा जोपर्यंत कापूस स्वच्छ बाहेर येत नाही. कापूस बाहेर काढल्यावर ज्या दिवशी दुधाळ थर दिसणार नाही, त्याअर्थी आता तुम्ही गर्भधारणेसाठी तयार आहात. 

प्रेग्नंन्सी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Pregnancy Rahnyasathi Tips)

Pregnancy Rahnyasathi Tips
pregnancy rahnyasathi upay

गरोदर राहण्यासाठी नक्की काय करायला हवे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही रोजच्या गोष्टी पाळल्यात तर गरोदर पटकन राहण्यास नक्कीच मदत होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही याचा वापर करा. 

कॅफिनचे सेवन प्रमाणात करा (Caffeine Use)

Caffeine Use

बऱ्याच महिलांना सतत चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. पण यातील कॅफिनमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कॅफिनमुळे शरारीतील लोह शोषून घेतले जाते आणि यामुळे डिहायड्रेशन समस्यादेखील होते. यामुळे महिलांमध्ये वंध्यत्व निर्माण होते आणि गरोदरपणासाठी उशीर होतो.  

पुरेसे पाणी प्यावे (Water Drinking)

दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे असे सगळेच सांगतात. पण तुम्ही गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाण्यामुळे गर्भाशय निरोगी तर राहतेच पण गर्भाशयाच्या मुखाच्या द्रववाढीसाठीही याची मदत होते. शुक्राणू आत जाऊन गर्भाशयाच्या मुखाच्या घट्ट स्रावाला चिकटून राहतात आणि त्यामुळे गरोदर राहण्यासाठी फायदा होतो. 

ADVERTISEMENT

साखर खाणे टाळा (Avoid Sugar)

Avoid Sugar

साखरेमध्ये कर्बोदके असतात. साखरेने वजन वाढते आणि त्रासही होतो. आवश्यकतेपेक्षा जेव्हा अधिक साखर शरीरामध्ये जाते तेव्हा शरीरातील इन्शुलीनची पातळी बिघडते. साखरेसाठी पर्याय म्हणून तुम्ही नैसर्गिक फळांचा उपयोग करा. तुमच्या नियमित आहारातून साखरेचे सेवन कमी करा. त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा लवकर होण्यास मदत मिळेल. 

निरोगी राहणे महत्त्वाचे (Be Healthy)

गरोदर राहण्यासाठी निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे शरीर निरोगी असेल तर तुमचे होणार बाळ सुदृढ जन्माला येते. त्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही गरोदर राहण्यासाठी वजनदेखील कमी करायला हवे. वजन कमी केल्यानंतर गरोदर राहणे अधिक सोपे होते. तसंच तुम्ही अति बारीकही असता कामा नये. शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर गरोदर राहण्यास मदत मिळू शकते. 

तणाव टाळा (Avoid Stress)

तुम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ताणतणाव घेणे टाळायला हवे. तणावामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. तसंच बाळ होण्यामध्येही समस्या उद्भवतात. तणावाच्या वाढीमुळे महिलांमध्ये अंडायशयातून अंडी सोडण्यास कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे ओव्ह्युलेशनचीदेखील समस्या निर्माण होते. त्यामुळे सहसा आनंदी राहायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला योग्य परिणाम मिळतो. 

चांगली झोप घ्या (Take Proper Sleep)

Take Proper Sleep

प्रत्येकाला आठ तासांच्या झोपेची गरज असते. शरीराला विश्रांती देणेही गरजेचे आहे. तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर तुमचे शरीर थकते आणि शरीराला विश्रांतीचीही गरज असते हे लक्षात घ्या. अनियमित झोपेमुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही चांगली आणि योग्य झोप घ्यायला हवी. 

ADVERTISEMENT

धुम्रपान आणि दारूचे सेवन टाळा (Avoid Smoking And Drinking Alcohol)

Avoid Smoking And Drinking Alcohol

ज्या महिला धुम्रपान करतात अथवा दारूचे सेवन करतात त्यांना गरोदर राहण्यास समस्या येतात असे बरेच वेळा डॉक्टरांकडूनही सांगण्यात आले आहे. तुम्हाला गरोदर राहण्यासाठी धुम्रपान अथवा दारूचे सेवन टाळावे लागेल. धुम्रपान करणाऱ्या महिलांचे बाळ अनुवंशिक अथवा कोणत्याही त्रासासह जन्माला येण्याची शक्यता असते. तर दारूमुळे अनियमित मासिक पाळी, ओव्ह्युलेशनची समस्या उद्भवते. हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात.

तुमच्या ओव्ह्युलेशनच्या दिवसांवर द्या लक्ष (Monitor Your Ovulation Days)

मासिक पाळीच्या तारखेपूर्वी साधारण 15 दिवस आधी ओव्ह्युलेशन दिवस सुरू होतात. मासिक पाळी नियमित असेल तर तुम्हाला या दिवसांकडे लक्ष देणे शक्य होते. पण तुमचे मासिक पाळीचे दिवस पुढे मागे होत असतील तर तुम्हाला हे नक्कीच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे या दिवसांकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

ओव्ह्युलेशनच्या दिवसात रोज संभोग करा (Have Sex During Ovulation Period Everyday)

प्रजननाचे एकूण 6 दिवस असतात. ओव्ह्युलेशनच्या पाच दिवस आधी सेक्स केल्याने गरोदर राहण्याची शक्यता वाढते. तसंच तुम्ही दोन दिवस आधीही सेक्स केलं तरीही तुम्ही गरोदर राहू शकता. एका सर्व्हेनुसार ज्या कपल्सने ओव्ह्युलेशनदरम्यान प्रत्येक दिवशी सेक्स केले आहे, त्यांचे गरोदर राहण्याचे प्रमाण अधिक आहे. पण अधिकतम डॉक्टर्स हे एक दिवस आड सेक्स करण्याचा सल्ला देतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणेही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. गरोदर राहण्यासाठी योग्य वय कोणते?

ADVERTISEMENT

गरोदर राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्वात योग्य वय म्हणजे 20 – 35 च्या दरम्यान आहे. पण सहसा तिशीच्या मध्यामध्ये बाळाला जन्म देण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली असते. 

2. गरोदर होण्यासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का?

गरोदर राहण्यासाठी तुम्ही निरोगी राहणं गरजेचे आहे. तसंच जंक फूड आणि अरबट चरबट अन्नपदार्थ खाण्यापेक्षा सलाड, निरोगी अन्नपदार्थ आणि घरचे ताजे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी राहून गरोदर राहण्यास अधिक मदत मिळते. 

3. मासिक पाळी नियमित असणे किती गरजेचे वाटते?

ADVERTISEMENT

गरोदर राहण्यासाठी तुमची मासिक पाळी ही नियमित असणे अत्यंत गरजेचे आहे. काही महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो. पण तो त्रास तुम्ही वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करून घ्यावा. त्यावर उपचार न केल्यास, गरोदर राहण्यासाठी ही मोठी अडचण ठरू शकते. 

06 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT